उत्पादन निर्माण करणारा व्यवसाय असो किंवा सेवा प्रदान करणारा व्यवसाय असो, दोन्ही प्रकारात व्यवसायाच्या संपूर्ण जीवनकाळात लघु उद्योजकांना अनेक अडचणी येतात. व्यवसायाच्या विस्तारात अडथळे येऊ नये म्हणून त्यावर मात करण्याची तयारी वेळेपूर्वीच करणे उचित असते.
दीर्घकाळ टिकणार्या व यशस्वी व्यवसायासाठी चिंतन करावे लागते व मेहनत घ्यावी लागते.
कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे माहिती झाल्यावर त्यासाठी नियोजन करणे शक्य होते.
लघु उद्योजकांना सामान्यपणे येणाऱ्या समस्या खालील प्रमाणे आहेत:
१. कंपनीचे रेजिस्ट्रेशन/नोंदणीकरण
लघु उद्योजकांसाठी कंपनीची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया लांबलचक व खर्चिक असते.
२. निधी/अकाउंटिंग
निधी उभा करणे अथवा फायनॅन्स ही लघु उद्योगात मोठी समस्या असते. पर्याप्त निधी नसल्यास कुठलाही व्यवसाय चा विणे अवघड जाते. कर्ज पटकन उपलब्ध नसते, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कर्ज मंजूर होत नाही, किंवा कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता नसते. अशा परिस्थितीत तुम्हाला वाढीव व्याज दरात कर्ज घ्यावे लागते ज्याचा परिणाम म्हणून तुमची आर्थिक परिस्थिती व पात्रता अधिक खालावते. बँकांच्या अटी व शर्ती लवचिक नसतात व उद्योग चालवणे अवघड होत जाते.
अकाउंटिंगचे ज्ञान नसल्यास व्यवसायाचे अकाऊंट्स ठेवणे देखील लघु उद्योजकांना अवघड होते.
३. कच्चा माल
प्रत्येक व्यवसायाला कच्चा मालाची गरज असते. माल पर्याप्त मात्रेत नसला, चांगल्या दर्जाचा नसला किंवा वेळेवर मिळाला नाही तर अडचण निर्माण होऊ शकते आणि उद्योग/उत्पादनात बाधा येते.
४. ऑफिसची जागा
ऑफिस स्थापित करणे महत्वाचे असून त्यासाठी योग्य जागा सापडणे अनेकदा अवघड जाते.
५. टेकनॉलॉजी/ तंत्रज्ञान
अनेकदा लघु उद्योगांना नवीनतम टेकनॉलॉजी वापरणे अवघड जाते. कारण जुन्या मशीनरी व उपकरण बदलून नवीन तंत्रज्ञानानुसार असलेल्या मशीन आणण्यासाठी संसाधने उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो व निकृष्ट दर्जाची व अधिक किंमतीची उत्पादने निर्माण होतात जी बाजारातील प्रतिस्पर्धक उत्पादनांपुढे कमी पडतात.
६. मार्केटिंग/ जाहिरात
अनेकदा प्रतिस्पर्धी कंपनी, ग्राहकांची पसंती व चालू ट्रेंड बाबत माहिती मिळणे अवघड असते. त्यामुळे लघु उद्योगांना बाजारातल्या मागणी व गरजेप्रमाणे वस्तूंचे निर्माण करणे अवघड होते.
लघु उद्योग अनेकदा मार्केटिंग योजना तयार करत नाही व जाहिरातींच्या नवकल्पनांचा वापर करत नाहीत. अशाने संभाव्य ग्राहकांचे लक्ष आकर्षित होत नाही.
७. इन्फ्रास्ट्रकचर/पायाभूत सुविधा
व्यवसायासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा नसल्यास अडचण होते. उद्योग चालवणे अवघड जाते व उत्पादन क्षमता व प्रक्रियेत बाधा येते.
८. इन्फ्लेशन/ महागाई
महागाईमुळे कर्जाचा व्याज दर वाढतो व कर्ज मिळवणे देखील कठीण होते.
९. क्षमतेचा योग्य वापर न करणे
लघु उद्योग मशिनरी व उपकरणांचा उचित वापर करू शकत नसल्याने व्यवसायाच्या विस्ताराचा वेग कमी होतो.
१०. प्रकल्पाचे नियोजन नसणे
प्रकल्पाची उचित योजना नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. बरेचदा उद्योजक बाजाराचा अभ्यास, मागणी, जागेची उपलब्धता व पायाभूत सुविधांचा अभ्यास न करता व्यवसाय सुरु करतात.
योग्य योजना तयार केल्याने प्रकल्पात काय करावे व टाळावे ह्याची जाणीव होते व लक्ष्य गाठण्याची प्रक्रिया देखील स्पष्ट दिसू लागते.
१२. कुशल मनुष्यबळ नसणे
नवीन अथवा अनुभव नसलेले कर्मचारी असल्यास अनेक समस्या व धोके निर्माण होतात. त्या उलट अनुभवी कर्मचारी जास्त पगार व इतर भत्ते मागू शकतात. दोन्ही परिस्थितीत उत्पादनक्षमता खालावते व मालाचा दर्जा खालावल्याने व्यवसायाच्या फायद्यावर परिणाम होतो.
१२. काम वाटून न देणे
एकच व्यक्ती सगळे काम करत असेल तर तणाव वाढतो. विविध कर्मचाऱ्यांना विविध कार्य नेमून द्यावी जेणेकरून सर्व कार्य उत्तम रित्या पूर्ण होतील आणि तुमचे कर्मचारी एका टीम सारखे काम करतील.
१३. सुसंघटित राहणे
सुसंघटित राहणे मोठे आव्हान असते. व्यवसायाच्या सुरुवातीला ते अवघड वाटू शकते म्हणून त्यावर मेहनत करणे महत्वाचे असते. आवश्यक असल्यास तज्ञाची मदत घेतली तर तुमचा उद्योग सुरळीतपणे चालू राहील.
१४. स्पर्धात्मक राहणे
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे नक्कीच महत्वाचे असते. परंतु स्पर्धकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करणे तेवढेच महत्वाचे असते. असे करता आले नाही तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार होणे शक्य नसते.
ग्राहकांना टिकवून ठेवले आणि त्यांना समाधानी ठेवले तर तुमचा व्यवसाय यशस्वी होईल.
१५. ट्रेंडप्रमाणे बदलणे
काही उद्योजकांना बाजारातील ट्रेंडची कल्पना नसते. मात्र, लघु उद्योजकांना ट्रेंडची माहिती करून घेणे अतिशय महत्वाचे असते.
१६. जीएसटी फाईल करणे
लघु उद्योजकांना जीएसटीचे नियम व कायदा समजणे कठीण जाते. सरकारने दिलेल्या हेल्पलाईन सुविधेचा वापर केल्यास ही समस्या सोडवता येते.
१७. जीएसटी प्रक्रिया ऑनलाईन आहे
इंटरनेट कनेक्शन व इतर तांत्रिक सुविधा नसल्यास लघु उद्योजकांना ऑनलाईन जीएसटी प्रक्रिया करणे अवघड जाते.
१८. कार्यकारी भांडवल (वर्किंग कॅपिटल)
टॅक्स डिपार्टमेंट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक लेजर मधले कार्यकारी भांडवल (वर्किंग कॅपिटल) अडकल्यास अडचण होते. सर्व टॅक्स देयकाबद्दलची माहिती देखील ह्या ठिकाणी संग्रहित केली जाते.
समस्यांवर मात करण्यासाठी काय करावे:
१. खर्चावर बारीक लक्ष ठेवणे
दैनिक खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वस्त दरातली जागा घ्यावी, टेलेफोन कनेक्शनची संख्या कमी करावी,ऑफिसमध्ये काही भाग वापरला जात नसेल तर बँकेला एटीएम साठी भाड्याने द्यावी, थोक खरेदी करू नये, मार्केटिंगच्या पारंपारिक पद्धती वापरू नये, स्टॉक वर बारीक लक्ष ठेवावे, ऑनलाईन विक्री करावी, कर्जाच्या रकमेवर लक्ष ठेवावे, योग्य लोकांना कंपनीत नोकरी द्यावी, टॅक्सची योजना करावी.
२. माल व साठा याचे पूर्वनियोजन करणे
माल व साठा याचे पूर्वनियोजन करणे उचित रणनीती असते. अशाने कॅशफ्लोला नुकसान पोहचवणारे मेन्टेनन्स खर्च वाचतात.
३. टेकनॉलॉजीचा वापर करणे
पॉईंट ऑफ सेल (पीओएस) सिस्टिम वापरावी व त्याबरोबर बारकोड स्कॅनर व क्रेडिट कार्ड मशीन पण वापरावी म्हणजे तुम्हाला विक्रीचे विश्लेषण करता येते, व विक्रीचा इतिहास पाहता येतो.
झिपबुक सारखे अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरल्याने किती टॅक्स देय आहे, किती डेबिट रक्कम थकीत आहे, किती रक्कम इतरांकडून यायची आहे, इंवेंटरी व्यवस्था, इन्व्हॉईस ई. वर नियंत्रण ठेवता येते.
मोबाइल वॉलेटमध्ये पैसे टाकले की तुम्हाला ते अनेक ठिकाणी वापरता येतात व वस्तू विकत घेता येतात.
४. मार्केटिंग/जाहिराती करिता सोशल मीडियाचा उपयोग करा
फेसबुक (पेज, ऍड), लिंक्डइन, ट्विटर, यूट्यूब (तुमच्या प्रॉडक्ट/सेवांबद्दल विडिओ) सारख्या सोशल मीडिया साधनांचा उपयोग करून जाहिरात करा.
५. बिझनेस प्लॅन तयार करा
लघु उद्योगासाठी बिझनेस प्लॅन अतिशय महत्वाचा असतो. प्लॅन मध्ये टीम बद्दल माहिती (कामाचा अनुभव, कौशल्य, शैक्षणिक पातळी), उद्योगाचे उद्दिष्ट, उद्योगाचा सारांश (उत्पादन, सेवा, पुरस्कार), सध्याच्या अडचणी व त्यावर उपाय, उद्योगाचा मार्केट शेयर, प्रतिस्पर्धी व भविष्यातल्या आर्थिक कामगिरी बद्दल माहिती व अंदाज (उलाढाल, फायदा) नमूद असले पाहिजे.
६. कमीत कमी कर्मचारी ठेवा
अधिक कर्मचारी नोकरी वर ठेवण्याऐवजी, विद्यमान कर्मचार्यांचा वापर करून उद्योगाचा विस्तार करणे शक्य असते. असे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व आधार द्यावा, उद्योगाच्या विविध प्रक्रियेत प्रशिक्षण द्यावे, प्रभावी संवाद कसा करावा याचे प्रशिक्षण द्यावे व अडचणी सांगण्यास प्रोत्साहित करावे, हार्डवेअर व सॉफ्टवेअरचा वापर करावा, आवश्यक असल्यास काही काम आऊटसोर्स करावे, ध्येयाशी एकनिष्ठ राहावे, टीमवर्कवर भर द्यावा, कार्याचे उचित वाटप करावे, लोकांचा आदर करावा व अनादर सहन करू नये.
७. स्पर्धकांच्या पुढे राहणे
स्पर्धकांकडून बरेच काही शिकता येते. उदाहरणार्थ निधी उभा करण्याची पद्धत, त्यांनी कोणते गुंतवणूक पर्याय निवडले, ते यशस्वी अथवा अयशस्वी का झाले, त्यांची कॅश फ्लो नियंत्रणाची प्रक्रिया काय आहे, व्यवसायाच्या कामगिरीच्या विश्लेषणासाठी कोणते तंत्र वापरतात. स्पर्धक काय करतात त्यानुसार उत्पादन, आऊटसोर्सिंग किंवा खरेदीचे निर्णय घ्यावे, स्पर्धक कमीतकमी टॅक्स भरण्यासाठी जी पद्धत वापरतात ती वापरावी, स्पर्धक आर्थिक अभिलेख ठेवण्यासाठी जी पद्धत वापरतात व अकाउंटिंगची जी प्रक्रिया वापरतात ती वापरावी, स्पर्धक कोणाकडून (बँक अथवा एनबीएफसी) कर्ज घेतात हे पाहावे आणि आपल्या व्यवसायात आवश्यकता असल्यास आपण पण कर्ज घ्यावे.
८. वर्किंग कॅपिटल कर्ज/ फायनॅन्सिंग
व्यवसायाचे दैनंदिन कार्य सुरळीत चालण्यासाठी वर्किंग कॅपिटल कर्ज वापरले जाते. ह्या कर्जासाठी काही तारण ठेवणे आवश्यक नसते, कर्जाच्या अटी लवचिक असतात, कर्जाच्या रकमेच्या वापरावर बंधन नसते. हंगामी चढ उतार झाल्यास असे कर्ज अतिशय उपयोगी पडते. व्यवसायाच्या दैनंदिन खर्चासाठी पुरेसा निधी अथवा भांडवल नसल्यास वर्किंग कॅपिटल कर्ज उपयुक्त ठरतात.
तुम्हाला विनातारण आणि वाजवी व्याज दरावर वर्किंग कॅपिटल कर्ज हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!