डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट वापरणे सोयिस्कर व जलद असल्यामुळे आपला वेळ वाचतो!
डिजिटल पेमेंटचे पर्याय स्वस्त व सोपे असल्याने ग्राहकांना पसंत असतात आणि ते लघु उद्योगांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. ईकॉमर्स, लॉयलटी योजना व ऑनलाइन खरेदी करताना ग्राहक डिजिटल पेमेंटचा उपयोग करतात ज्यामुळे व्यवसायाचे उत्पन्न आणि विक्री वाढते.
डिजिटल पेमेंटचे हे ५ प्रकार लक्षात ठेवा!
1. मोबाइल वॉलेट
मोबाइल वॉलेटमध्ये तुमचे सर्व तपशील सुरक्षितपणे साठवले जातात. तुम्हाला वॉलेटमध्ये पैसे टाकता येतात किंवा त्यातून काढता येतात व वस्तूंची खरेदी वॉलेट वापरुन करता येते. पे-टीएम, फ्रीचार्ज, मोबीक्विक ही मोबाइल वॉलेटची उदाहरणे आहेत.
मोबाइल वॉलेट वापरल्यामुळे तुम्हाला बँकेच्या कार्डचे सीव्हीव्ही किंवा ४ अंकी पिन लक्षात ठेवावा लागत नाही. अनेक बँकांनी सरलपणे डाऊनलोड करता येणारे स्वतःचे मोबाइल वॉलेट विकसित केले आहेत.
2. एईपीएस (आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम – आधार वर चालणारी पेमेंट व्यवस्था):
एईपीएस वापरुन पैसे काढणे, बॅलन्स जाणून घेणे, पैसे डिपॉझिट करणे, इतर लोकांना पैसे पाठविणे इत्यादी बँकेची कामे करता येतात. आधार कार्डची पडताळणी करून सगळे व्यवहार रोख न वापरता करता येतात.
तुम्हाला ही सुविधा बंकेत रजिस्टर केलेल्या आधार कार्डाद्वारे करता येते आणि बँकेत जायची गरजच नसते.
3. यू एस एस डी (अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्विस डेटा)
कोणतेही मोबाइल अॅप डाऊनलोड न करता ही सेवा वापरुन भारतात डिजिटल उलाढाली करता येतात. ह्या सेवेला एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया) यांचा पाठिंबा आहे. यूएसएसडी हिन्दीमध्ये पण उपलब्ध असून कोणाला पैसे पाठवणे, बँकेचे स्टेटमेंट मिळवणे व बॅलेन्स रक्कम तपासणे असे सर्व व्यवहार ही सेवा वापरुन करता येतात.
4. यूपीआय (यूनीफाईड पेमेंट इंटरफेस)
कोणत्याही बँकेत खाते असले तरी ग्राहक यूपीआय अॅप वापरू शकतो. तुम्हाला एकापेक्षा अधिक बँक खाती यूपीआय अॅपला जोडता येतात व पैशांचे व्यवहार करता येतात.
ही सेवा वापरण्यासाठी फक्त बँक खाते आणि बँकेत तुमचा मोबाइल नंबर रजिस्टरर्ड असणे गरजेचे असते. तुम्ही यूपीआय मधून पैसे पाठवू व प्राप्त करू शकता. यूपीआयचे सर्व व्यवहार निशुल्क असतात. यूपीआय आयडी व पासवर्ड हरविला तर सहजपणे परत मिळविता येतो.
5. बँकेचे कार्ड
डिजिटल पेमेंटचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. विसा, मास्टरकार्ड, रुपे सारखे कार्ड प्रसिद्ध आहेत. ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन व्यवहार व पीओएस मशीनमध्ये बँकेचे कार्ड वापरता येतात.
ग्राहकांना डिजिटल पेमेंट करायचे पर्याय दिल्यास एक लघु उद्योजक म्हणून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
उद्योगाचा विस्तार करण्याचा अजून एक उत्तम मार्ग म्हणजे उपलब्ध असलेले भांडवल वाढवणे. तुम्हाला उद्योग वाढवायचा असेल आणि रु १० लाखापेक्षा कमी रकमेचे कर्ज हवे असेल तर आजच ग्रोमोर फायनॅन्सशी संपर्क साधा.