तुम्हाला बिझनेस लोन हवे असेल तर अर्ज करताना कर्ज देणारी प्रत्येक कंपनी आधार कार्ड मागते. तुम्ही आधारसाठी अर्ज केला असेल आणि अजून आधार मिळाले नसेल किंवा हरवले असेल किंवा तुम्हाला ईआयडी किंवा आधार क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ते ऑनलाइन प्रिंट करू शकता.
विविध कारणांसाठी तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन प्रिंट घेऊ शकता:
तुम्हाला आधार क्रमांक माहिती आहे पण मूळ कार्ड हरवले आहे, किंवा नोंदणी क्रमांक हरवला आहे आणि आधार क्रमांक माहिती आहे (यूआयडी), किंवा नोंदणी क्रमांक व आधार क्रमांक दोन्ही माहिती नाही.
आधार क्रमांक किंवा यूआयडी ऑनलाइन कसे शोधावे?
-
यूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://resident.uidai.net.in/find-uid-eid
-
वर दिसणार्या पर्यायांपैकी आधार क्रमांक (यूआयडी) निवडा.
-
आधार कार्ड अर्जात लिहिले होते तसे संपूर्ण नाव प्रविष्ट करा.
-
नोंदणीकृत ईमेल किंवा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.
-
बॉक्समध्ये कॅपचा किंवा सुरक्षा कोड प्रविष्ट करा – आणि शेवटी गेट ओटीपी क्लिक करा.
-
५ मिनिटे वैध असणारा ओटीपी तुमच्या मोबाइल/ईमेल वर तुम्हाला प्राप्त होईल.
-
ओटीपी प्रविष्ट करा आणि वेरिफाय ओटीपी बटण क्लिक करा.
-
वरील सर्व नीट केले असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवर ‘अभिनंदन! तुमचा आधार क्रमांक (यूआयडी) तुमच्या मोबाइल वर पाठवला आहे!’ असे दिसेल.
तुम्हाला लवकरच आधार क्रमांक असलेला एसएमएस/ईमेल प्राप्त होईल.
तुमचा यूआयडी वापरुन आधार कार्ड कसा डाऊनलोड करावा?
-
यूआयडी इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://eaadhaar.uidai.gov.in/
-
अर्जाच्या वरच्या भागात ‘आय हॅव आधार’ पर्याय निवडा.
-
वर नमूद प्रक्रिया करून मिळवलेला आधार क्रमांक प्रविष्ट करा, आणि तुमच्या पत्त्याचा पिनकोड आणि तुमचे पूर्ण नाव पण प्रविष्ट करा.
-
‘एंटर अबव इमेज टेक्स्ट’/कॅपचा यात स्क्रीनवर दिसणारी अक्षरे प्रविष्ट करा.
-
‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा. तुम्हाला ओटीपी असलेला एसएमएस येईल.
-
ओटीपी बॉक्समध्ये प्रविष्ट करा आणि ‘वॅलिडेट अँड डाऊनलोड’ क्लिक करा.
-
तुमचा आधार कार्ड तुमच्या संगणकावर पीडीएफ रूपात डाऊनलोड होईल.
फाइल उघडण्यासाठी पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि त्यानंतर तुमचे जन्मवर्ष.
चांगला दर्जाचा कागद किंवा फोटो पेपरवर आधार कार्ड प्रिंट करून घ्या. प्रिंट केल्यानंतर आधार कार्डचे आयुष्य वाढवण्यासाठी तुम्ही त्याला लॅमिनेट पण करू शकता.
तुम्हाला विना तारण लोन हवे असल्यास कृपया ग्रोमोरला भेट द्या. ग्रोमोरची अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे, आणि ३ दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत १० लाखापर्यंत लोन मिळू शकते!