प्रत्येक व्यवसायात विविध टप्प्याला भांडवलाची गरज असते. उद्योग स्थापित करण्यासाठी बीज भांडवल लागते. त्यानंतर देखील नवीन उपकरणे विकत घेणे, जागेत गुंतवणूक, नवीन उत्पादने निर्माण करणे, कर्मचार्यांची संख्या वाढवणे, नवीन तंत्रज्ञान वापरणे इत्यादी – अशा सगळ्या कामांसाठी पण भांडवल आवश्यक असते. म्हणून “भांडवलासाठी लागणारे मूल्य” ही संकल्पना नीट समजून घेणे अतिशय आवश्यक आहे.
उद्योगाला अनेक प्रकारे भांडवल उभे करते येते. त्यात प्रामुख्याने २ प्रकार असतात – इक्विटि आणि कर्ज (डेट). इक्विटिमध्ये गुंतवणूकदारांना व्यवसायात झालेल्या नफ्याच्या काही टक्के परतावा मिळतो – म्हणजेच ते व्यवसायाचे भागीदार बनतात. डेटमध्ये बँक, NBFC आणि इतर संस्थांकडून व्यवसाय कर्ज घेतात – आणि कर्जावर व्याज व कर्जाची मूळ रक्कम देऊन परतफेड केली जाते.
भांडवलाचे कुठलेही स्रोत वापरले तरी त्यासाठी विशिष्ट मूल्य मोजावे लागते. ह्या भांडवलाचा उपयोग मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी केला जातो.
“भांडवलासाठी लागणारे मूल्य” ह्याचा दोन दृष्टिकोनातून विचार करता येतो:
- भांडवल उभे करणे
- भांडवलाचा वापर
भांडवल उभे करताना ज्या दराने कर्ज घेतले जात आहे त्याला भांडवलासाठी लागणारे मूल्य म्हणतात. भांडवलाचा वापर करताना गुंतवणुकीवरील परतावा म्हणजे भांडवलासाठी लागणारे मूल्य.
भांडवल उभे करण्यासाठी लागणार्या मूल्याच्या तुलनेत त्याची गुंतवणूक करून मिळणारा परतावा अधिक असेल तरच गुंतवणूक व्यवहार्य आहे असे म्हणता येते.
लघु उद्योगांवर भांडवलासाठी लागणार्या मूल्याचा काय परिणाम होतो ते समजून घेऊ.
लघु उद्योगांसाठी भांडवलासाठी लागणारे मूल्य किती महत्त्वाचे असते
लघु उद्योगांसाठी रोख प्रवाह (कॅश फ्लो) अत्यंत महत्त्वाचा असतो. कॅश फ्लो म्हणजे उद्योगात होणार्या फायद्याचा तो भाग जो व्यवसायाच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम न करता गुंतवणुकीसाठी वापरता येतो. कॅश फ्लोचा एक मुख्य घटक म्हणजे कार्यकारी भांडवल (वर्किंग कॅपिटल). पुरवठादारांना पैसे देणे व ग्राहकांकडून पैसे येणे ह्यातील अवधी, पगार देणे, त्वरित पूर्ण करायच्या ऑर्डर, हंगामी उद्योगांमध्ये उतार चढाव इत्यादीसाठी लागणारी रक्कम वर्किंग कॅपिटल मधून वापरता येते.
मोठ्या उद्योगांमध्ये वर्किंग कॅपिटलच्या व्यवस्थापनेसाठी विशिष्ट टीम नेमली जाते. लघु उद्योगात मात्र ही जबाबदारी मालकाची अथवा प्रमुख लोकांची असते. दैनंदिन गरजांवर लक्ष ठेवणे त्रासदायक असते आणि अनेक वेळा पैशांची गरज व पुरवठा ह्यामध्ये अंतर निर्माण होते.
ही तूट भरून काढण्यासाठी उद्योगाला तत्काल निधीची गरज असते – म्हणून साधारणपणे NBFC अथवा इतर संस्थांकडून व्यावसायिक कर्ज घेतले जाते. अशा परिस्थितीत कर्जावरचे व्याज दर हेच “भांडवलासाठी लागणारे मूल्य” असते. कर्जाची रक्कम गुंतवली तर त्यातून मिळणारा परतावा हा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पर्याप्त असेल का ह्याचे मूल्यांकन उद्योगाला करावे लागते.
उद्योगातील आंतरिक आणि बाह्य घटकांचा भांडवलासाठी लागणार्या मूल्यावर प्रभाव पडतो. ह्या घटकांबद्दल थोडक्यात बघू:
भांडवलासाठी लागणार्या मूल्यावर प्रभाव टाकणारे घटक
१. भांडवलासाठी मागणी आणि पुरवठा:
भांडवलाची मागणी व पुरवठा यांचा भांडवलासाठी लागणार्या मूल्यावर प्रभाव पडतो. अर्थव्यवस्थेत भांडवलाची गरज वाढल्यास, कर्ज देण्यार्या संस्था व्याज दर वाढवतात. गरज कमी झाल्यास हा दर कमी होतो. अर्थव्यवस्थेत निधीची उपलब्धता आणि भांडवलासाठी लागणारे मूल्य हे व्यस्त प्रमाणात असते: निधी उपलब्धता वाढली तर भांडवलासाठी लागणारे मूल्य कमी होते आणि उपलब्धता कमी झाली तर मूल्य वाढते.
२. बाजाराची परिस्थिती:
ज्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करायचे योजले असते त्याच्या परिस्थितीचा भांडवलासाठी लागणार्या मूल्यावर परिणाम होतो. जोखीम असलेल्या प्रकल्पात भांडवलासाठी लागणारे मूल्य वाढते कारण कर्ज देणार्या संस्था अशा जोखिमेसाठी अधिक व्याज दर लावतात. ह्या उलट, बाजाराची परिस्थिती अशी असेल की गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात व सुरक्षित परतावा मिळणार असेल तर जोखीम कमी असते आणि परिणामत: भांडवलासाठी लागणारे मूल्य पण कमी होते.
३. प्रत्येक क्षेत्रातील विशिष्ट धोके:
प्रत्येक गुंतवणुकीत काही विशिष्ट धोके असतात. ते प्रामुख्याने २ प्रकारचे असतात: व्यावसायिक व आर्थिक धोके. कंपनीने घेतलेल्या गुंतवणूक संबंधी निर्णयांमुळे व्यावसायिक धोका निर्माण होतो. भांडवलाबद्दल घेतलेल्या निर्णयांमुळे आर्थिक धोका निर्माण होतो, उदाहरणार्थ: भांडवल उभे करताना इक्विटि व डेटचे प्रमाण. व्यावसायिक धोका आणि आर्थिक धोका ह्या दोन्ही घटकांचा कुठल्याही कंपनीच्या भांडवलासाठी लागणार्या मूल्यावर परिणाम होतो. कंपनीचा व्यावसायिक धोका आणि आर्थिक धोका एकत्रित केला तर त्याला त्या क्षेत्रातील विशिष्ट धोका असे म्हणतात. क्षेत्रातील विशिष्ट धोका वाढला की त्याच प्रमाणात भांडवलासाठी लागणारे मूल्य वाढते.
४. भांडवलाची एकूण रक्कम
भांडवलाची रक्कम खूप जास्त असेल तर त्यासाठी लागणारे मूल्य पण वाढते कारण खर्च आणि जोखीम दोन्ही वाढतात. भांडवलाची रक्कम जास्त असल्यामुळे लिक्विडिटी धोका वाढतो आणि भांडवलासाठी लागणारे मूल्य पण वाढते. कंपनीने कमी प्रमाणात भांडवल उभे केले तर कर्ज देणार्यांना खात्री असते की कर्जाची परतफेड होईल आणि म्हणून भांडवलासाठी लागणारे मूल्य कमी होते.
५. आयकर दर:
विविध करांमुळे उद्योगाच्या भांडवल उभे करण्याच्या निर्णयावर प्रभाव पडतो आणि म्हणून भांडवलासाठी लागणार्या मूल्यावर पण परिणाम होतो. व्याजामुळे करात सवलत मिळते आणि म्हणून भांडवल उभे करण्यासाठी कर्ज घेणे (व्यावसायिक कर्ज) उपयुक्त ठरते. म्हणजेच, भांडवल उभारणी मध्ये कर्जाचा वाटा जितका जास्त तितके भांडवलासाठी लागणारे मूल्य कमी होते.
भांडवलासाठी लागणार्या मूल्याची परिगणना: भांडवल दराची भारीत सरासरी (वेटेड अॅवरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल WACC)
आपण भांडवलासाठी लागणार्या मूल्याचा लघु उद्योगावर होणारा परिणाम व त्यावर प्रभाव टाकणारे घटक बघितले. आता मूल्याची परिगणना नेमकी कशी होते हे बघू:
उद्योगाच्या भांडवल रचनेत भांडवलाचे विविध प्रकार विविध प्रमाणात असतात. ह्या रचनेत डेट व इक्विटि निधीची सरासरी काढून WACC (एकूण भांडवल रचनेचा दर) ठरवता येतो. अशामुळे गुंतवणूक केलेल्या भांडवलावर मिळणारा किमान परतावा परिगणित करता येतो.
कुठल्याही उद्योगाचे मूल्य ठरवण्यासाठी डिसकाऊंट रेट म्हणून WACC ह्याचा वापर करता येतो. (उद्योगात भविष्यात होणार्या रोख प्रवाहाचे आजच्या तारखेला मूल्य परिगणित करण्यासाठी वापरलेला व्याज दर म्हणजे डिसकाऊंट रेट).
इक्विटि रिस्क प्रीमियम:
सरकारी बॉन्डवर मिळणारा परतावा धोका-मुक्त मानला जातो. पण इक्विटि गुंतवणुकीत धोका अधिक असल्यामुळे मिळणारा परतावा पण अधिक असतो. ह्या दोन्ही परताव्यातील फरक म्हणजे इक्विटि रिस्क प्रीमियम.
बीटा:
एकूण इक्विटी बाजारात मिळणार्या परताव्याच्या तुलनेत विशिष्ट स्टॉकच्या परताव्यातील बदल म्हणजे बीटा. बीटामुळे इक्विटिमधील धोका विचारात घेऊन त्याचे मूल्य मोजता येतो.
धोका-मुक्त व्याज दर:
सरकारी सेक्युरिटीवरील परताव्याचा दर म्हणजेच धोका-मुक्त व्याज दर.
कर्जावरील सरासरी उत्पन्न:
कर्ज देणार्याने कर्जावर आकारलेले व्याज दर म्हणजे कर्जावरील सरासरी उत्पन्न.
आयकरात मिळणारी सवलत:
उद्योगाने दिलेले व्याज आयकरातून वजा करता येते. म्हणजेच इतर उत्पन्नासाठी भरपाई म्हणून हे व्याज वापरता येते आणि परिणामत: व्यवसायाला कमी आयकर भरावा लागतो.
सर्वोत्तम भांडवल रचना करण्यासाठी आणि व्यावसायिक कर्जाचा सर्वोत्कृष्ट उपयोग करण्यासाठी भांडवलासाठी लागणार्या मूल्याची माहिती असणे लघु उद्योगासाठी खूप फायदेशीर ठरते.
तुमचा लघु उद्योग असेल आणि तुम्हाला व्यावसायिक कर्ज हवे असेल तर आजच ग्रोमोरशी संपर्क साधा!