दर वर्षी सर्वांनाच जीएसटी फाइल करावा लागतो. सॉफ्टवेअर अथवा अॅप्लिकेशन वापरले तर जीएसटी फाइल करणे अतिशय सोपे असते. त्यासाठी खाली दिलेली सोपी पद्धत वापरा:
ऑनलाइन जीएसटी रिटर्न फाइल करण्याची पद्धत!
- जीएसटी वेबसाइट (https://www.gst.gov.in/) वर रजिस्ट्रेशन करा.
- वेबसाइट वर लॉगिन केले की तुम्हाला जीएसटी स्टेट कोड व पॅन नंबर विचारला जाईल आणि त्यानंतर १५ आकड्यांचा आयडेंटिफिकेशन नंबर तुम्हाला दिला जाईल.
- इनवॉइस अपलोड केले की प्रत्येक इनवॉइस साठी एक रेफेरन्स नंबर दिला जाईल.
- इनवॉइस अपलोड केल्यावर इनवर्ड (आवक), आऊटवर्ड (जावक) व एकूण मासिक रिटर्न ऑनलाइन फाइल करा.
- माहिती सेक्शनमध्ये जीएसटी रिटर्न फॉर्म भरा.
- याचे सर्व तपशील जीएसटीआर–२ए मध्ये दिसतील
- सप्लायरने भरलेले तपशील तपासून बघा, आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करा. डेबिट व क्रेडिट नोट देखील फाइल करणे जरूरी असते.
- जीएसटीआर २ फॉर्ममध्ये (मासिक रिटर्न ज्यात टॅक्सेबल माल व सेवांच्या खरेदीचे वर्णन असते) तुम्ही खरेदी केलेल्या टॅक्सेबल मालाची माहिती भरा.
- तुम्ही बदललेली माहिती पुरवठादाराला (सप्लायरला) स्वीकारता अथवा नकारता येत नाही.
ही पाऊले उचलली की जीएसटी रिटर्न फायलिंग प्रक्रिया सुरळीत होते. प्रक्रिया सोपी असली तरी, कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्राबद्दल शंका असल्यास तुमच्या सीएचा सल्ला घ्या.
तुमच्या लघु उद्योगासाठी तुम्हाला विना तारण कर्ज हवे असेल आणि तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असाल, तर ग्रोमोर फायनॅन्सकडे तुमच्यासाठी पर्याय आहेत! आम्हाला आजच संपर्क करा!