उद्योग लहान असो किंवा मोठा, ग्राहकाशी व्यवहार करताना शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजेच ग्राहकाकडून पैसे घेणे. फक्त कॅश वापरुन पेमेंट करता येण्याचे दिवस गेले. आजकाल ग्राहकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाइन बँकिंग व मोबाइल वॉलेट सारखे पेमेंट करायचे पर्याय हवे असतात.
खरं तर विक्री वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पेमेंट करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देणे. असे पर्याय उपलब्ध असल्यास तुमच्यापासून खूप दूर बसलेल्या ग्राहकालासुद्धा तुमची उत्पादने व सेवा विकत घेता येतात.
मग पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्याची ग्राहकांची मागणी लघु उद्योग कसे पूर्ण करतात आणि त्याच बरोबर ग्राहकांनी दिलेले पैसे उद्योगाच्या खात्यात जात आहेत याची खात्री कशी करता येते?
अशावेळी पेमेंट गेटवेची भूमिका महत्त्वाची असते. चला आपण पेमेंट गेटवे बद्दल जाणून घेऊया.
पेमेंट गेटवे म्हणजे नक्की काय आणि ते कसे काम करते?
विक्रेता व ग्राहक ह्यांच्यात पैशाची ट्रान्सफर मंजूर करण्यासाठी दोन्ही पक्षांमधील दुव्याचे काम पेमेंट गेटवे करते. ग्राहकाने ऑर्डर नक्की करून पेमेंटचे तपशील ऑनलाइन प्रविष्ट केले की ग्राहकाच्या बँक खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यापूर्वी पेमेंट गेटवे अनेक प्रक्रिया करते.
- प्रविष्ट केलेला डेटा एनक्रिप्ट करून सुरक्षित माध्यमाद्वारे पेमेंट प्रॉसेसरला पाठवला जातो. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ही माहिती कधीही इ-कॉमर्स साईटपासून थेट पेमेंट प्रॉसेसरला पाठवली जात नाही.
- पेमेंट प्रोसेसर विक्रेत्याच्या खात्याला माहिती पाठवतो आणि त्याचबरोबर बॅंकेशी झालेला व्यवहार वैध आहे याची खात्री करून घेतो.
- बँकेने व्यवहार मंजूर केला की माहिती परत गेटवेकडे पाठवली जाते व व्यवहार व विक्री पूर्ण होतात.
- विक्रेत्याला ही माहिती मिळाली की उत्पादन ग्राहकाला पाठवले जाते आणि विक्रेत्याला बँकेकडून पैसे प्राप्त होतात.
बाजारात अनेक पर्याय असल्याने योग्य पेमेंट गेटवेची निवड करणे कठीण होते. गेटवे निवडताना तो होस्टेड आहे की इंटीग्रेटेड हे ठरवणे महत्वाचे असते.
पे-पॅल सारखे होस्टेड गेटवे ग्राहकाला पेमेंट प्लॅटफॉर्मच्या प्रॉसेसरकडे नेतात आणि तिथे व्यवहार पूर्ण होतो.
ग्राहक पेमेंट करण्यासाठी तुमची वेबसाइट सोडून दुसरीकडे जात असल्याने तुमच्या व्यवसायाचे नुकसान होऊ शकते.
पण होस्टेड गेटवेचा फायदा म्हणजे ग्राहकाचा डेटा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी गेटवेची असते व हा पर्याय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात उपयुक्त ठरतो.
इंटीग्रेटेड गेटवे तुमच्या ई-कॉमर्स साईट मध्येच एंबेड केले जाते ज्यामुळे ग्राहक तुमची वेबसाइट सोडून जाण्याची भीती नसते.
मात्र ग्राहकाचा डेटा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमचीच असते. केवळ हेच महत्त्वाचे नसून, सायनिंग-अप फी, कराराच्या अटी, करन्सीसाठी आधार, फ्रॉड टाळण्याचे उपाय व प्लॅटफॉर्मतर्फे दिली जाणारी इतर मदत देखील लक्षात घेणे गरजेचे असते.
चला लघु उद्योगांसाठी उपलब्ध असलेले काही पेमेंट गेटवे बघूया
लघु उद्योगांसाठी लोकप्रिय आधुनिक पेमेंट गेटवे
तुमच्या उद्योगात वापरता येतील असे उत्कृष्ट पेमेंट गेटवे!
1. इन्स्टामोजो (Instamojo)
इन्स्टामोजोची सुरुवात डिजिटल प्रॉडक्ट विक्रीने झाली. पण त्यानंतर लवकरच त्याचे रूपांतर लोकप्रिय पेमेंट गेटवे मध्ये झाले.
संस्थापक संपद स्वेन म्हणतात “आमच्या सेवांबद्दल आम्ही स्वतः जागृत व जाणकार झाल्याने आमची ग्राहकांबद्दलची जाणीव वाढली.” सध्या इन्स्टामोजो 350,000 पेक्षा अधिक उद्योगांचे पेमेंट हाताळते व त्यांच्याकडे Yourstory व Urbanclap सारखे ग्राहक आहेत.
त्यांच्या पेमेंटना बॅंकस्तराची सुरक्षितता असून ते PCI-DSS (मोठ्या कार्ड कंपनींच्या क्रेडिट कार्डांचे इन्फॉर्मेशन सुरक्षा प्रमाण) लागू करतात. व्हाट्सअॅप, फेसबूक, एसएमएस, ईमेल द्वारे लिंक शेयर करून एका क्लिक मध्येच पेमेंट होते.
साइन अप: मोफत असून पॅन क्रमांक, बँकेच्या खात्याची माहिती व केवायसी आवश्यक असतात
वार्षिक खर्च: शून्य
शुल्क: प्रत्येक यशस्वी व्यवहारासाठी 2% (डिजिटल साहित्यासाठी 5%) + 3 रुपये + कर
इन्स्टामोजो साठी इथे साइन अप करा.
2. पेटीएम (Paytm)
डिमॉनेटायझेशन नंतर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या पेमेंट गेटवेची, म्हणजेच पेटीएमची सुरुवात ऑनलाइन मोबाइल रिचार्ज व बिल पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून झाली. लवकरच त्याचे परिवर्तन २५ कोटी रजिस्टर्ड यूजर असलेल्या ऑनलाइन बाजारात झाली.
आता पेटीएम मध्ये क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम वॉलेट, ईएमआय अशा अनेक पेमेंट पद्धती उपलब्ध आहेत.
आता पेटीएम आणि तुमच्या वेब प्लॅटफॉर्मचे इंटिग्रेशन करणे शक्य आहे किंवा पेटीएम वापरुन दुकानात QR कोड द्वारे पेमेंट देखील करता येते. Swiggy, Oyo, आणि Idea सारखे लोकप्रिय ब्रॅंड पेटीएम वर चालतात.
साइन अप: मोफत
वार्षिक खर्च: शून्य
शुल्क: प्रत्येक व्यवहारावर १.९९% + कर
पेटीएम वर इथे साइन अप करा.
3. पेयूमनी (PayUMoney)
पेयूमनी मध्ये कस्टम इंटिग्रेशन करणे डेवलपर साठी सोपे असते.
पेयूमनी मध्ये यूपीआय, कार्ड, नेट बँकिंग व वॉलेट सारखे अनेक पेमेंटचे पर्याय वापरता येतात. पेयूमनीचे ३५०,००० पेक्षा अधिक ग्राहक आहेत ज्यात BookMyShow, FoodPanda, SnapDeal, Myntra, Goibibo ह्यांचा समावेश आहे. सर्व व्यवहार १२८ बिट SSL एनक्रिप्शन व टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरून सुरक्षित ठेवले जातात.
साइन अप: मोफत
वार्षिक खर्च: शून्य
शुल्क: प्रत्येक यशस्वी व्यवहारावर २% + कर
पेयूमनी वर इथे साइन अप करा.
4. रेझरपे (RazorPay)
आयआयटी रूर्कीच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या रेझर-पे कंपनीचा उद्देश आहे सुबक व डेवलपर अनुकूल API तयार करणे आणि सोपी इंटिग्रेशन पद्धत प्रदान करणे ज्यामुळे ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात क्रांती घडेल. व्यापारी, शाळा, ई-कॉमर्स व इतर कंपन्यांसाठी ऑनलाइन पेमेंट स्वीकार करायचा जलद, स्वस्त व सुरक्षित मार्ग रेझर-पे मुळे उपलब्ध होतो.
रेझर-पे मधील प्रॉडक्ट रेंज पैकी निवड करून योग्य पेमेंट प्रक्रिया तयार करता येते. ही प्रक्रिया PCI DSS लेवल १ मानकांचे पालन करते. Grofer, Quikr, NIIT आणि अनेक इतर कंपन्या रेझरचे ग्राहक आहेत. लघु उद्योगांसाठी रेझर-पेचे स्टँडर्ड प्लॅन उपलब्ध असून मोठ्या उद्योगांकरिता एंटरप्राइज प्लॅन लागू होतो.
साइन अप: स्टँडर्ड प्लॅनसाठी मोफत
वार्षिक खर्च: स्टँडर्ड प्लॅनसाठी शून्य
शुल्क: प्रत्येक यशस्वी व्यवहारावर (स्थानिक) २%, अमेक्स व आंतरराष्ट्रीय कार्डवर ३% + कर. एंटरप्राइज प्लॅनसाठी आवश्यकतेप्रमाणे विशेष दर उपलब्ध.
रेझरपे वर इथे साइन-अप करा.
5. मोबीक्विक (Mobikwik)
मोबीक्विक हा सोपा पण सक्षम पेमेंट पर्याय असून, तो तुम्हाला ई-वॉलेट म्हणून पण वापरता येतो. ही प्रक्रिया PCI DSS प्रमाणित असून सर्व बँकिंग व व्यवहार डेटा सुरक्षित ठेवला जातो.
मोबीक्विक मध्ये ऑटोफिल, ऑटो कार्ड मेमरी, आणि मोबाइल ऑप्टीमाईस्ड चेकआऊट डिजाइन सारखी वैशिष्ठ्ये खास मोबाइल साठी उपलब्ध असतात.
साइन अप: स्टँडर्ड व एंटरप्राइज प्लॅनसाठी मोफत
वार्षिक खर्च: स्टँडर्ड व एंटरप्राइज प्लॅनसाठी शून्य
शुल्क: प्रत्येक यशस्वी व्यवहारावर १.९%, अमेक्स व आंतरराष्ट्रीय कार्डवर २.९% + कर. एंटरप्राइज प्लॅनसाठी आवश्यकतेप्रमाणे विशेष दर उपलब्ध.
मोबीक्विक साठी इथे साइन-अप करा.
6. पेयूबिझ (PayUBiz)
Jabong, Ola, RedBus, आणि PepperFry सारखे ग्राहक असल्यामुळे तुम्ही पेयूबिझ नावाचे पेमेंट गेटवे वापरलेच असेल.
पेयूबिझ वापरल्यानंतर कायमचे ग्राहक मिळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यात अनेक पेमेंट पर्याय उपलब्ध आहे आणि त्याचे इंटीग्रेशन करणे खूप आहे.
सीव्हीव्ही विना होणारे व्यवहार व मॅजिक रीट्राय पर्यायांसारखे अत्याधुनिक शोध केल्याने पेयूबिझ ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात क्रांती घडवत आहे.
त्यांच्याकडे ४ प्लॅन उपलब्ध असतात: स्टार्टअप, सिल्वर, गोल्ड, आणि प्लॅटिनम. सर्व पेमेंट प्लॅनचा अभ्यास करून तुमच्या उद्योगासाठी योग्य पर्याय निवडणे उत्तम.
पेयूबिझ साठी इथे साइन-अप करा.
7. डायरेकपे (DirecPay)
‘टाइम्सऑफमनी’चा भाग असलेले डायरेकपे भारतातील सर्वात खात्रीच्या पेमेंट गेटवेमध्ये मोजले जाते. फायनॅन्स क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित कंपनींशी संबंध असलेले डायरेक-पे ऑनलाइन व्यापार्यांसाठी उत्तम पर्याय ठरले आहे.
ग्राहकांपैकी काही ओळखीची नावे म्हणजे Google India, PolicyBazaar, Rediff.com, Indiatimes, 100bestbuy. रिस्क व फ्रॅड व्यवस्थापन, अतिशय कडक सुरक्षितता व त्वरित उपलब्ध होणारे MIS ही डायरेकपे सेवेची वैशिष्ठ्ये आहेत.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर शुल्काचे तपशील मिळू शकतात पण वार्षिक शुल्क नक्कीच द्यावे लागते.
डायरेकपे साठी इथे साइन-अप करा.
8. ईबीएस (EBS)
इनजेनीको ग्रुपचा भाग असलेले ई-बिलिंग सोल्यूशन्स प्रा. लि. व्यापार्याच्या वेबसाइट वरील ऑनलाइन खरेदी सुलभ करून ग्राहकाकडून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, ई-वॉलेट ई. वापरून पेमेंट गोळा करते.
त्यांच्या वेबसाइटनुसार “ईबीएस ही पीसीआय डीएसएस ३.० मानक पूर्ण करणारी भारतातली पहिली व्यापारी खाते सेवा आहे. सुरक्षिततेच्या आयएसओ २७००१-२०१३ मानकाचे पालन व ऑडिट द्वारे ईबीएस प्रमाणित केले गेले आहे. जगात सर्वात सुरक्षित ऑनलाइन सेवा प्रदान करणार्या कंपन्यांमध्ये ईबीएसची गणना केली जाते.”
साइन अप: स्टँडर्ड प्लॅनसाठी मोफत
वार्षिक खर्च: पहिल्या वर्षात शून्य व दुसर्या वर्षापासून १२०० रुपये लागू होतात.
शुल्क: ४० पेक्षा अधिक बँक, कार्ड व ईएमआय ह्यांच्या प्रत्येक व्यवहारावर २%, अमेक्स व वॉलेट वर ३%. प्रीमियम प्लॅनसाठी आवश्यकतेप्रमाणे विशेष दर उपलब्ध
ईबीएस साठी इथे साइन-अप करा.
9. फोनपे (Phonepe)
फ्लिपकार्टचे पेमेंट सांभाळणारी कंपनी फोनपे ही कॅशचा वापर न करता सरल पेमेंट अनुभव प्रदान करते. यूपीआय पेमेंट पासून रीचार्ज, व पैशे पाठवण्यापासून ऑनलाइन बिल पेमेंटपर्यन्त सगळे काम फोनपे वर करता येते.
फोनपे अॅप इथे डाऊनलोड करा.
10. पे पॅल
पेपॅल ही एक मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी असून त्यांनी भारतात पेपॅल पेमेंट्स प्रायवेट लिमिटेड नावाने प्रवेश केला आहे. सुस्थापित उद्योग, आंतरराष्ट्रीय पेमेंट करणारे व्यवसाय व फ्रीलॅंस काम करणार्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
पे-पॅल साठी इथे साइन-अप करा.
इतर पर्याय….
सीसी अॅव्हेन्यू, बिलडेस्क व अॅटम देखील उत्तम पेमेंट गेटवे सेवा प्रदान करतात. मात्र वर नमूद पर्यायांच्या तुलनेत या सेवांसाठी साइन-अप करणे व त्या वापरणे थोडे किचकट असते.
व्यापार वाढविण्यासाठी लोन हवे असेल तर ग्रॉमोर फाइनान्सशी संपर्क साधा!