वर्तमान काळात प्रत्येक कंपनीला सोशल मीडियामध्ये आपली उपस्थिती निर्माण करण्याची इच्छा असते. असे केल्याने तुमचा ब्रॅंड सशक्त होतो आणि तुमच्या लोन अर्जात पण त्याची मदत होते.
उत्पादन आणि सेवांचे मार्केटिंग, ग्राहकांशी संवाद साधणे, पुरवठा करणार्या कंपन्यांशी किंवा जुन्या व नवीन ग्राहकांशी संपर्क करणे या सगळ्यासाठी सोशल मीडियाची मदत होते.
बिझनेस लोनच्या अर्जासाठी सोशल मीडियाची खालील प्रकारे मदत होऊ शकते:
१. दिलेल्या माहितीची खात्री करता येते
उद्योगाचा पत्ता, नाव, संपर्क माहिती इत्यादीची खात्री करून घेण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग होऊ शकतो.
वरील माहिती सर्व प्रकारच्या सोशल मीडिया वर सारखीच आहे हे कर्ज देणार्या कंपन्या तपासून पाहतात. माहिती सगळीकडे सारखी नसेल, तर तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
२. कधी पासून सोशल मीडिया अकाऊंट वापरले जात आहे
व्यवसायाचे सोशल मीडिया अकाऊंट कधी पासून वापरले जात आहेत हे पण कर्ज देणार्या कंपन्या तपासून पाहतात. व्यवसाय दीर्घकाळापासून सोशल मीडिया वापरत असेल आणि फॉलोवरची यादी चांगली असेल तर ते चांगले लक्षण मानले जाते. जितक्या अधिक अवधीसाठी व्यवसाय सोशल मीडिया वापरत असेल तितकीच कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
३. फॉलोवरची संख्या
कर्ज देणार्या कंपन्या व्यवसायाच्या सोशल मीडिया अकाऊंटमधील पोस्ट आणि फॉलोवरची संख्या आणि दर्जा हे दोन्ही तपासून पाहतात. लघु उद्योगाच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये किमान २००० फॉलोवर असायला पाहिजे.
४. पोस्ट
या नंतर, कर्ज देणार्या कंपन्या सोशल मीडिया वरील पोस्ट तपासून पाहतात, कारण त्यात उत्पादने आणि सेवा यांच्याबद्दल बरीच माहिती असते. फॉलोवर्सनी पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रिया पण महत्वाच्या असतात. आदर्श परिस्थितीत सोशल मीडिया वरील पोस्ट माहिती देणार्या असाव्या आणि त्यात ट्रेंडिंग विषय असावे, त्यात सणांसाठी शुभेच्छा असाव्या आणि त्या मार्केटिंग करण्यासाठी वापरल्या जात असाव्या.
५. उद्योगाबाबत अभिप्राय
कर्ज देणार्या कंपन्या उद्योगाच्या उत्पादनांबाबत आणि सेवांबाबत दिलेले अभिप्राय पण तपासून पाहतात.
ग्राहकांनी वाईट अभिप्राय लिहिले असतील किंवा कोणतेच अभिप्राय नसतील तर कर्जाच्या अर्जावर दुष्प्रभाव पडू शकतो.
सोशल मीडिया वरील उपस्थिती हा घटक तपासला जात असला तरीही कर्ज मंजूर करताना किंवा नाकरताना पात्रता निकष अधिक महत्वाचे असतात.
तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी विना तारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असेल तर ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला आजच संपर्क करा!