व्यवसाय करताना कधीकधी रोजच्या कार्यासाठी तुम्हाला पैशांची गरज भासू शकते, जसे वर्किंग कॅपिटल, मशीन घेणे, किंवा मार्केटिंग कार्य करण्यासाठी इ.
अशा वेळी तुमच्या सर्व समस्यांसाठी उपाय म्हणून लोन घेणे उपयोगी ठरू शकते.
बिझनेस लोन घेणे म्हणजे व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे. लोन देणाऱ्या प्रत्येक कंपनीचे लोन देण्यासाठी वेगवेगळे पात्रता निकष असतात. एक लघु उद्योजक म्हणून तुम्हाला कंपनीचे निकष माहिती असायला हवे आणि तुम्ही अशाच कंपनीकडे अर्ज करावा ज्याचे निकष तुम्ही पूर्ण करू शकता. पात्रता निकष माहिती नसताना तुम्ही अर्ज केला आणि तुमचा अर्ज नामंजूर झाला तर तुमच्या सिबिल स्कोरवर त्याचा दुष्प्रभाव होतो.
तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही लोन घ्यायचे ठरवले असेल तर लोन देणाऱ्या कंपन्या खालील निकष तपासून पाहतात:
१.व्यवसायाचे टर्नओव्हर किती आहे?
टर्नओव्हर किंवा वार्षिक उलाढाल म्हणजे व्यवसाय किती कमी अवधीत रोख गोळा करू शकतो. लोन देणारी प्रत्येक कंपनी व्यवसायाची वार्षिक उलाढाल तपासून पाहते. बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
२. अर्जदाराचे वय काय आहे?
अर्जदाराचे वय हा महत्वाचा निकष असतो. अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
३. व्यवसाय किती वर्ष सुरु आहे?
बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योग किती वर्ष सुरू आहे हा पण एक निकष असतो. हा नियम प्रत्येक कंपनीसाठी वेगवेगळा असतो. व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
४. सिबिल स्कोर किती आहे?
सर्व लोन देणार्या संस्था बिझनेस लोन देण्यापूर्वी अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरबाबत चौकशी करतात. काही संस्था सिबिल सारख्या सार्वजनिक संस्थेकडे पण चौकशी करतात. व्यवसायाच्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यांकन करण्याची काही संस्थांची स्वतःची पद्धत असते.
व्यवसाय आर्थिक दृष्टया किती सशक्त आहे हे पाहण्यासाठी सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर तपासला जातो. अर्जदाराला लोन फेडता येईल का? भूतकाळात त्याने किती लोन घेतले होते? त्यांची परतफेड केली आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे क्रेडिट स्कोर मधून मिळतात. म्हणजेच लोन देणाऱ्या संस्था संपूर्ण इतिहास पाहतात.
लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
- मालकाचे पॅन कार्ड
- मालकाचे आधार कार्ड
- मागच्या १२ महिन्याचे बँक स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)
- मागच्या २ वर्षाचे आयकर रिटर्न (व्यवसायाचे आणि वैयक्तिक)
- नवीनतम बॅलेन्स शीट आणि पी&एल (तात्पुरते)
- नवीनतम ऑडिट केलेले बॅलेन्स शीट आणि पी&एल
- गुमास्ता किंवा दुकाने आणि आस्थापना परवाना
- जीएसटी रजिस्ट्रेशन पावती
- जीएसटी पावती/चलन
लोन देणाऱ्या कंपनीपासून काही लपवून ठेवू नका, आणि लोन घेतल्यास त्याची परत फेड केली नाही किंवा हप्ते भरले नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. तुम्ही परतफेड केली नाही तर भविष्यात लोन घेताना समस्या निर्माण होऊ शकते.
खालील गोष्टी लक्षात ठेवा:
१. व्यवसायाच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठीच लोन घ्या
तुमच्या व्यवसायाला खरंच गरज असेल आणि रक्कम त्वरित हवी असेल तेव्हाच लोन घ्या. हा निर्णय घेताना हप्ता, लोनचा अवधी, आणि व्याजदर यांचा विचार करणे महत्वाचे असते.
२. लोन घेण्यापूर्वी कॅश फ्लोचे विश्लेषण करणे महत्वाचे असते
तुमच्या व्यवसायाच्या कॅश फ्लोचे विश्लेषण करा आणि मासिक हप्ता भरण्यासाठी तुमच्याकडे पर्याप्त निधी उपलब्ध आहे का याचा विचार करा.
३. लोनच्या सर्व अटी व शर्तींबाबत लोन देणाऱ्या कंपनीशी चर्चा करा
लोनच्या अटी व शर्तींबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हप्ता भरण्यात अडचण येत असेल तर लोन देणाऱ्या कंपनीला वेळेत सूचना द्या. कंपनीला तुमचे म्हणणे पटले आणि त्यांनी समजून घेतले की तुमच्या व्यवसायात तात्पुरती कॅश फ्लो समस्या आहे, तर चर्चा करण्याचा पर्याय उपलब्ध होतो, आणि दोन्ही पक्षांना मंजूर असेल असा अंतिम उपाय शोधून काढता येतो.
तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करायचा आहे पण या टप्प्यावर बिझनेस लोनची कशी मदत होऊ शकते याची कल्पना तुम्हाला येत नसेल तर त्याचा खरंच कसा उपयोग होतो हे पुढे वाचा.
व्यवसायाच्या वाढीत लोन घेतल्यामुळे कशी मदत होऊ शकते?
१. अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे
व्यवसायाचा विस्तार करताना अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज असते कारण त्यांच्या कौशल्याचा वापर करता येतो. पण नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी पैशांची आवश्यकता भासू शकते. अशा वेळी, बिझनेस लोनची खूप मदत होऊ शकते.
२ इन्व्हेंटरी तयार करणे
मोठ्या ऑर्डर जेव्हा अपेक्षित असतात तेव्हा व्यवसायाची इन्व्हेंटरी तयारअसायला हवी. इन्व्हेंटरी तयार करण्यासाठी उत्पादनाची गती आणि दर्जा सुधारण्यासाठी नवीन मशीन किंवा साधने आवश्यक असू शकतात. यासाठी पण गुंतवणूक करावी लागते. अशा वेळी मशीनरी लोन घेणे हा सगळ्यात चांगला पर्याय ठरू शकतो.
३.कॅश फ्लो टिकवून ठेवण्यासाठी मदत होते
व्यवसायाचा विस्तार करताना मालकाला विविध ठिकाणी वेळेवर पेमेंट करावे लागते. ग्राहकांनी वेळेवर पैसे दिले नाही तर समस्या निर्माण होऊ शकते. व्यवसायात कॅश फ्लो चांगला ठेवण्यासाठी बिझनेस लोनची मदत होऊ शकते.
४. विविध मार्केटिंग कार्यासाठी
काही मार्केटिंग कार्यासाठी योग्य टीम आणि आर्थिक व्यवस्था आवश्यक असते. बिझनेस लोन घेऊन मार्केटिंग कार्यासाठी लागणाऱ्या रकमेची व्यवस्था करता येते.
व्यवसायासाठी कोणतेही लोन घेण्यापूर्वी तुमची आर्थिक परिस्थिती नीट तपासून पाहावी आणि बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांची तुलना करून लोन देणारी योग्य कंपनी निवडावी.
तुम्हाला व्यवसायासाठी बिझनेस लोन हवे आहे का? आकर्षक व्याज दरावर विना तारण लोन मिळवण्यासाठी ग्रोमोर फायनान्स कंपनीशी आजच संपर्क साधा!