विमा असला की कठीण परिस्थितीत आर्थिक मदत होते.
प्रत्येक उद्योजक आणि व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी काही धोके पत्करतो, संशोधन करतो आणि बिझनेस प्लॅन तयार करतो. इतर स्पर्धकांच्या पुढे राहण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी विविध धोरणे अंमलात आणतो.
हे महत्त्वाचे असले तरीही अजून एक गोष्ट आहे जी अनिवार्य असते, ती म्हणजे आयुर्विमा.
आयुर्विम्याचे संरक्षण नसले की व्यवसाय मालाकासंबंधी अचानक दुर्दैवी घटना घडल्यास समस्या उद्भवू शकते. अशा घटनेमुळे मालकाचे स्वप्नभंग होऊ शकते, उदा: व्यवसाय बंद पडू शकतो किंवा दिवाळखोरी होऊ शकते ज्याचा मानसिक आणि आर्थिक परिणाम कुटुंबावर होऊ शकतो.
आयुर्विमा महत्त्वाचा नाही असं तुम्हाला वाटत असेल तर पुढील प्रश्नांचा विचार करा: मालक आजारी झाल्यास व्यवसाय कोण हाताळेल, किंवा मालकाचा अपघात झाला तर व्यवसायाला आणि कर्मचार्यांना कोण आधार देईल?
व्यवसाय भागीदार, गुंतवणूकदार आणि भागधारक सगळ्यांनाच धोक्याला सामोरे जावे लागेल.
म्हणून तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करता तेव्हाच विमा घेणे सगळ्यात चांगले.
आयुर्विम्याचे महत्त्व:
१. कर्ज फेडता येते
काही व्यवसाय मालक आपल्या मुलांच्या लग्नासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी खाजगी कर्ज घेतात, पण अचानक अपघात झाल्यास कर्जाचा भार कुटुंबावर पडतो. आयुर्विमा असल्यास कुटुंबाला कर्जाची परतफेड करण्यात मदत होते.
२. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
आयुर्विम्याचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी, इतर खर्चासाठी, उत्पन्ना ऐवजी, किंवा बचतीसाठी व गुंतवणुकीसाठी करता येतो.
३. व्यवसाय विमा
व्यवसाय विम्यात व्यवसायाच्या भागीदाराला व्यवसायाचा भाग विकत घेता येतो आणि त्याची किंमत मृत भागीदाराच्या कुटुंबाला देता येते.
४. अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी
विमा योजना असल्यास तुमच्या कुटुंबाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करायला मदत होते. अल्पकालीन गरजा म्हणजे कर्ज, इतर देय रक्कम जी लवकरात लवकर परत करायला पाहिजे. दीर्घकालीन गरजा म्हणजे मुलांचे शिक्षण, गुंतवणूक, भविष्यासाठी बचत, घरचा खर्च इत्यादी.
५. आयकरमध्ये बचत करण्यासाठी
विम्यामुळे कमी कर भरावा लागतो. आयुर्विम्याच्या हप्त्यावर विमा धारकांना रु १.५ लाख पर्यन्त करात सवलत मिळू शकते.
विमा घेण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करा:
-
कोणासाठी आयुर्विमा घ्यायला पाहिजे
-
कर्जाची रक्कम किती आहे
-
पर्याप्त रक्कम असलेला विमा घेण्याचा विचार करावा
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला विनातारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा आणि ३ किंवा त्यापेक्षा कमी अवधीत कर्जाची रक्कम मिळवा!