प्रत्येक व्यवसाय मालकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कधीतरी पैशांची गरज भासते. निधी उभा करण्याचा एक मार्ग म्हणजे तारण असलेले/ विना तारण बिझनेस लोनसाठी लोन देणार्या कंपनीकडे अर्ज करणे. वर्किंग कॅपिटल, साधने आणि मशीन विकत घेणे, ऑफिस वाढवणे, अतिरिक्त कर्मचार्यांची नेमणूक करणे इत्यादीसाठी पैशांची आवश्यकता पडू शकते.
लोन मंजूर करण्यासाठी प्रत्येक लोन देणार्या कंपनीचे वेगवेगळे पात्रता निकष असतात जे व्यवसाय मालकाला पूर्ण करावे लागतात. लोन नामंजूर होऊ नये याची खात्री करण्यासाठी व्यवसाय मालकाने विविध कंपन्यांचे पात्रता निकष तपासून ज्या कंपनीचे निकष त्याला पूर्ण करता येतील त्या कंपनीकडे अर्ज करावा. लोन नामंजूर होणार नाही याची खात्री केल्यास तुमच्या सिबिल स्कोअरसाठी ते चांगले ठरेल.
कोणत्याही लोन देणार्या कंपनीचे मूलभूत निकष म्हणजे व्यवसायाचे टर्नओवर, अर्जदाराचे वय, व्यवसायाचे कार्य, क्रेडिट स्कोअर आणि आवश्यक कागदपत्रे. इतर काही निकष म्हणजे लोनची रक्कम, लोन घेण्याचा उद्देश, बिझनेस प्लॅन, उद्योगक्षेत्र, कंपनीचा प्रकार (एलएलपी, मालकी हक्क इ.), व्यवसायाचे परवाने, एम्प्लॉयर आयडेनटिफिकेशन क्रमांक, तारण असल्याचा पुरावा, वार्षिक उत्पन्न आणि नफा, बँकेची स्टेटमेंट, बॅलेन्स शीट, वैयक्तिक आणि व्यवसायाचे आयकर रिटर्न, कायदेशीर करार इ.
पात्रता निकषांचे तपशील:
१. व्यवसायाचे टर्नओवर
अकाऊंटिंग भाषेत टर्नओवर म्हणजे एखादा व्यवसाय किती कमी अवधीत रोख रक्कम गोळा करू शकतो.
लोनसाठी पात्र असायला व्यवसायाचे टर्नओवर रु १५ लाख आणि रु १ कोटी यामधील असावे.
२. अर्जदाराचे वय
लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे आणि लोन अवधी संपण्याच्या दिवशी ६५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
३. व्यवसायाचे कार्य
बिझनेस लोन मंजूर होण्यासाठी व्यवसाय किती वर्षापासून कार्यरत आहे हा पण एक निकष असतो. लोन देणार्या कंपनीवर हे अवलंबून असते. किमान ३ वर्ष व्यवसाय सुरू असेल तर बहुतांश कंपन्या लोन मंजूर करतात, पण काही कंपन्या फक्त एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या व्यवसायाला पण लोन देतात.
४. क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी
लोन मंजूर करण्यापूर्वी लोन देणार्या कंपन्या अर्जदाराचे क्रेडिट स्कोअर तपासून पाहतात. बहुतांश कंपन्या सिबिल स्कोअर पाहतात, पण काही कंपन्यांची स्कोअर मोजण्याची स्वतःची पद्धत असते.
साधारणपणे क्रेडिट स्कोअर हा ३०० ते ८५० यामधील ३ अंकी आकडा असतो. ७५०–९०० क्रेडिट स्कोअर असल्यास लोन मंजूर होते, पण काही लोन देणार्या कंपन्यांचे वेगळे नियम असू शकतात. क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास तुम्हाला वाजवी व्याज दरावर लोन मिळण्याची संभावना वाढते.
९०% लोन अशा लोकांना दिले जातात ज्यांचा सिबिल स्कोअर ७५० पेक्षा जास्त असतो. जितका अधिक सिबिल स्कोअर तितकी लोन मंजूर होण्याची संभावना अधिक असते.
सिबिल स्कोअर खालील प्रमाणे वर्गीकृत केले जातात:
१. ६०० पेक्षा कमी सिबिल स्कोअर
६०० पेक्षा कमी सिबिल स्कोअर असल्यास लोन मंजूर होण्याची संभावना अगदी कमी असते. व्यवसाय मालकाने त्वरित पाऊले उचलून स्कोअर सुधारण्याचा प्रयत्न करावा.
२. ६०० आणि ६४९ मधील सिबिल स्कोअर
या स्कोअरसाठी सामान्य पातळीपेक्षा अधिक व्याज दर द्यावा लागेल.
३. ६५० आणि ६९९ मधील सिबिल स्कोअर
हा स्कोअर साधारण पातळीचा मानला जातो पण अगदी कमी संख्येत पर्याय उपलब्ध असतात.
४. ७०० आणि ७४९ मधील सिबिल स्कोअर
हा स्कोअर चांगला मानला जातो. उपलब्ध असणारे लोन वाजवी आणि चांगल्या व्याज दरावर असतील.
५. ७५० आणि त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोअर
तुमचा सिबिल स्कोअर ७५० पेक्षा अधिक असेल तर कमी व्याज दरावर लोन मिळेल आणि लोन मंजूर होण्याची प्रक्रिया अल्पावधीत पूर्ण होईल.
तुम्ही सध्या किती हप्ते भरता या आधारावर पण तुमची पात्रता ठरू शकते.
वर नमूद पात्रता निकषा व्यतिरिक्त व्यवसायाची कागदपत्रे, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, इतर आर्थिक कागदपत्र व्यवस्थित असायला पाहिजे.
चांगला क्रेडिट स्कोअर असण्याचे काही लाभ
चांगला सिबिल स्कोअर असेल तर तुमच्या विषयी लोन देणार्या कंपनीचे चांगले मत निर्माण होते. तुमची लोनची परतफेड करण्याची क्षमता तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर ठरवली जाईल, व तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर तुमचा अर्ज त्वरित नामंजूर होऊ शकतो.
तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही लोन देणार्या कंपनीशी काही अटींबाबत वाटाघाटी करू शकता. काही वेळेस मुदतपूर्वी लोनची परतफेड केल्यास शुल्क भरावे लागत नाही, किंवा प्रोसेसिंग फी पण द्यावी लागत नाही.
चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास घर, व्यावसायिक इमारती, अपार्टमेंट, ऑफिस इ सारख्या भाड्याने घेतलेल्या मालमत्तेसाठी लोन लवकर मंजूर होते.
चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास बहुतांश बँक क्रेडिट कार्डसाठी चांगल्या ऑफर देतात. अधिक क्रेडिट लिमिट असलेले क्रेडिट कार्ड, अतिरिक्त सुविधा, आणि चांगल्या ऑफर मिळू शकतात.
एनबीएफसी कंपनीत तुम्ही लोनसाठी अर्ज केला तर तुम्हाला खालील अतिरिक्त निकष पूर्ण करावे लागतील:
एनबीएफसी कंपनीत तुम्ही लोनसाठी अर्ज केला तर तुम्हाला खालील निकष पूर्ण करावे लागतील:
किमान २–३ वर्षापासून व्यवसाय कार्यरत असावा.
मागील वर्षात व्यवसायाचे टर्नओवर किमान रु १० लाख असावे.
मागील वर्षी किमान रु २.५ लाख आयकर भरला असावा.
व्यवसायाचे कार्य मालकाच्या घरी होत नसावे.
व्यवसायाची जागा किंवा घर लघु उद्योजकाच्या नावे असावे.
आकर्षक व्याज दरावर विना तारण बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा!