व्यवसाय मालक म्हणून तुम्हाला नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी, मार्केटिंगसाठी, नवीन मशीन घेण्यासाठी इ. निधीची गरज भासू शकते. बिझनेस लोन घेतल्यास दर महिन्याला समान हप्ते भरावे लागतात. लोनची संपूर्ण रक्कम आणि व्याज यांची परतफेड होईपर्यंत बँकेला किंवा आर्थिक संस्थेला दरमहिन्याला हप्ता द्यावा लागतो. हप्त्याची रक्कम लोनच्या रकमेवर अवलंबून असते.
हप्त्याची रक्कम सोप्या पद्धतीने आणि पटकन शोधण्यासाठी व्यवसाय मालकाला एक कॅलक्युलेटर खूप उपयोगाचा ठरू शकतो. प्रत्येक महिन्यात किती रक्कम भरायची हे मालकाला कळते.
इएमआय कॅलक्युलेटर म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग होतो?
लोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर हे तीन घटक वापरून हप्ता किती होईल हे मोजता येते.
लोन घेण्याची किंमत म्हणजे त्याचे व्याज. हप्ता भरून तुम्ही लोनच्या काही भागाची परतफेड करता आणि लोन मधून तेवढी रक्कम कमी केली जाते. म्हणून दर महिन्याला रेड्युसिंग बॅलन्स पद्धतीने व्याज आकारले जाते.
प्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा आहे हे शोधून काढण्यासाठी इएमआय कॅलक्युलेटर वापरता येतो. हप्ता किती द्यावा लागेल हे कळल्यानंतर तुम्हाला तो परवडणार आहे की नाही हे ठरवता येते.
असे केल्याने लोनच्या अवधीसाठी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन करता येईल.
हप्ता खालील पद्धतीने शोधून काढता येतो:
इएमआय शोधण्यासाठी खालील तीन घटक माहिती असायला हवे:
- लोनची रक्कम
- लोनचा अवधी
- व्याज दर
हे तीन घटक इएमआय कॅलक्युलेटरमध्ये प्रविष्ट करा आणि तुम्हाला हप्त्याची रक्कम दिसेल. या तीन घटकांचे मूल्य बदलून तुमच्यासाठी योग्य असलेले इएमआय शोधून काढता येते.
इएमआय शोधून काढण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:
इएमआय = मूळ रक्कम * व्याज दर * (१ + व्याज दर) लोन अवधी / ((१ + व्याज दर) लोन अवधी – १))
- इ म्हणजे दर महिन्याला भरायचा हप्ता
- पी म्हणजे तुम्हाला जितक्या रकमेचे लोन हवे आहे
- आर म्हणजे लोनवरील मासिक व्याजदर
- एन म्हणजे महिन्यात लोनचा अवधी. उदाहरणार्थ लोन अवधी पाच वर्ष असेल तर एन साठ धरावे.
लोनची रक्कम आणि व्याजदराच्या प्रमाणात हप्ता/इएमआय कमी जास्त होतो म्हणून लोनची रक्कम मोठी असल्यास हप्ता मोठा असतो आणि कमी असल्यास हप्ता पण कमी असतो.
अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे लोनचा अवधी वाढवला तर हप्ता कमी होतो पण व्याज दर वाढतो.
हप्ता कमी केल्यास लोनचा अवधी वाढतो म्हणजे दर महिन्याला थोडीच रक्कम हप्ता म्हणून भरावी लागते पण परतफेड करण्याचा अवधी वाढतो. हे तुमच्या व्यवसायाच्या परिस्थितीवर आणि तुमच्या परतफेड करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.
इएमआय कॅलक्युलेटर/बिझनेस लोन कॅलक्युलेटर वापरण्याचे काही फायदे:
१. वापरायला सोपे
ईएमआय शोधून काढण्यासाठी फक्त तीन आकडे आवश्यक असतात: लोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर. हे प्रविष्ट केले की हप्त्याची रक्कम दिसते. म्हणून हे वापरायला अत्यंत सोपे आहे.
२. चुका होत नाहीत
इएमआय कॅलक्युलेटर वापरले की चुका होत नाही, म्हणून चुका दुरूस्त करण्यात वेळ वाया जात नाही.
३. वेळ वाचतो
व्याज दर आणि हप्ते आधीच माहिती असल्यामुळे लोनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरळ कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.
४. खर्च कमी होतो
तुमचे हप्ते किती असायला हवे हे ठरवण्यासाठी कोणतेही मध्यस्थ आवश्यक नसतात. तुम्ही सोप्या पद्धतीने स्वतःच हे करू शकता आणि त्याला पैसे खर्च करावे लागत नाही. अनेक वेबसाइट वर ही सेवा निशुल्क उपलब्ध असते.
आकर्षक व्याजदरावर त्वरित बिझनेस लोन हवे असेल तर ग्रोमोर फायनान्स कंपनीशी आजच संपर्क साधा.