तुमच्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करत आहात का? त्याआधी खालील गोष्टींचा विचार करा!
वैयक्तिक कर्जाचे फायदे:
1. पात्रतेचे निकष सोपे असतात!
नवीन व्यवसाय सुरू करताना कोणी तुम्हाला कर्ज द्यायला तयार होईलच असे सांगणे अवघड असते. अशावेळी वैयक्तिक कर्जासाठी मंजूरी मिळविणे सोपे असते कारण कर्ज देणारे फक्त वैयक्तिक पातळीवर तुमच्या कर्ज परतफेडीचा इतिहास व उत्पन्न तपासून बघतात. व्यावसायिक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे, जसे बिझनेस प्लॅन इत्यादी तुम्हाला द्यावी लागत नाहीत.
2. कर्ज देणारे कर्जाची रक्कम त्वरित वितरित करतात!
अनेकदा कर्ज देणार्या कंपन्या वैयक्तिक कर्जाचे वितरण काही दिवसातच करतात. तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल तर वैयक्तिक कर्ज घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
3. काहीही गहाण ठेवावे लागत नाही!
व्यावसायिक कर्ज देताना तुम्हाला काही संपत्ती गहाण ठेवायला लागते. तुम्ही कर्जाची परतफेड वेळेत केली नाही तर कर्ज देणारे ही संपत्ती ताब्यात घेऊ शकतात. बहुतांश वैयक्तिक कर्जासाठी काहीही तारण ठेवावे लागत नाही. वैयक्तिक कर्जाची परतफेड वेळेत झाली नाही तर कर्ज देणार्याला तुमची संपत्ती ताब्यात घेता येत नाही.
वैयक्तिक कर्जाचे तोटे
1. तुमचा वैयक्तिक क्रेडिट स्कोर धोक्यात येऊ शकतो
वैयक्तिक कर्ज घेतले की तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा धोक्यात आणता. व्यवसाय अपयशी ठरला व कर्जाची परतफेड वेळेत केली नाही तर तुमच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोरवर परिणाम होऊन तो कमी होतो. कमी क्रेडिट स्कोर व उशीरा केलेल्या परतफेडीमुळे तुम्हाला भविष्यात इतर प्रकारच्या कर्जाची मंजूरी मिळणे अवघड जाते.
2. प्रोसेसिंग फी व व्याज दर खूप जास्त असतात!
बहुतेक बँक व एनबीएफसी कर्जाच्या रकमेची विशिष्ट टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून लावतात. तारण ठेवाव्या लागणार्या कर्जाच्या फी पेक्षा ही प्रोसेसिंग फी जास्त असते. म्हणजेच कर्ज घेणार्याला कमी रक्कम प्राप्त होते. कोणतेही तारण नसल्यामुळे वैयक्तिक कर्जांचे व्याज दर नेहमीच खूप जास्त असतात.
जर आपल्याला एका लहान व्यवसाय कर्जाची गरज असल्यास,आकर्षक व्याजदरांवर कर्जासाठी आजच ग्रोमोर कंपनीशी संपर्क साधा!