तुम्ही लघु उद्योजक असून तुम्हाला बिझनेस लोन हवे असेल तर त्यासाठी लागणारी मंजूरी मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही थोडी पूर्वतयारी केली तर अर्ज नामंजूर होण्याची शक्यता कमी होईल. कर्ज देणार्या कंपन्या अर्जाचे मूल्यांकन करतात आणि मग कर्ज मंजूर करायचे की नाही हे ठरवतात.
लोन अर्ज मंजूर व्हावा अशी इच्छा आहे? खालील चुका करू नका!
१. लोनसाठी अर्ज करायला शेवटच्या क्षणापर्यन्त थांबू नये
आर्थिक मदत घेतली नाही तर व्यवसाय बंद पडेल असे जेव्हा काही उद्योजकांना लक्षात येते तेव्हाच ते लोनसाठी अर्ज करतात, पण हे धोकादायक असते. लोन मिळवण्यासाठी कर्ज देणारी योग्य कंपनी शोधणे, कागदपत्रे तयार करणे, अर्ज करणे आणि शेवटी पैसे तुमच्या खात्यात जमा होणे या सगळ्या क्रियेसाठी किमान ३० दिवस आवश्यक असतात.
२. अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर तपासून न पाहणे
बिझनेस लोन मंजूर होण्यासाठी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर हा महत्त्वाचा घटक असतो. व्यवसाय आणि अर्जदार यांनी यापूर्वी घेतलेले कर्ज फेडले आहे की नाही हे तपासण्यासाठी कर्ज देणार्या कंपन्या अर्जदाराचा आणि व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर पाहतात. क्रेडिट स्कोअरमध्ये काही समस्या असल्यास लोन नामंजूर होऊ शकते. म्हणून लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी व्यवसाय मालकाकडे क्रेडिट स्कोअर तयार असायला पाहिजे.
३. एकाच वेळी अनेक लोनसाठी अर्ज करणे
अनेक उद्योजकांना असे वाटते की त्यांनी अनेक ठिकाणी लोनसाठी अर्ज केला तर एक तरी लोन मंजूर होण्याची शक्यता वाढते. पण यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर दुष्प्रभाव पडतो आणि लोन मिळण्याची शक्यता कमी होते.
४. आवश्यक कागदपत्रे तयार न ठेवणे
लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराला बिझनेस प्लॅनसह अनेक आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. लोन का हवे आहे, लोनची रक्कम कशासाठी वापरली जाईल, किती नफा अपेक्षित आहे इत्यादी माहिती बिझनेस प्लॅनमध्ये असायला हवी. सादर केलेल्या कागदपत्रांच्या निरीक्षणानंतर लोन मंजूर होईल किंवा नाही हे ठरवले जाते.
५. तारण ठेवण्यासाठी योग्य संपत्ती न देणे (तारण आवश्यक असणार्या लोनसाठी)
तारण आवश्यक असणार्या लोनसाठी अर्ज करताना उद्योजकाला तारण ठेवण्यासाठी काही संपत्ती सादर करावी लागते. लोन लवकर मंजूर होण्यासाठी चांगले बाजार मूल्य असलेली संपत्ती तारण म्हणून ठेवावी.
६. लोनची रक्कम किंवा लोन कशासाठी हवे आहे हे न ठरवणे
लोन कशासाठी वापरणार किंवा किती लोन हवे आहे हे ठरले नसेल तर तुम्हाला लोनची योग्य रक्कम ठरवता येणार नाही. अशामुळे तुम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक किंवा कमी रकमेसाठी अर्ज करू शकता जे तुमच्या व्यवसायासाठी चांगले नाही.
७. व्यवसायाचे अकाऊंट्स नियमितपणे तयार न करणे
बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक अर्जदाराकडे व्यवसायाचे अकाऊंट्स (नफा व तोटा, पूर्वी घेतलेल्या लोनची परतफेड इ) तयार असायला पाहिजे. लोनसाठी अर्ज करताना मागील किमान २ वर्षांची माहिती उपलब्ध असायला पाहिजे. अकाऊंट्स उपलब्ध नसल्यास, कर्ज देणार्या कंपनीला असे वाटेल की अर्जदाराला व्यवसायाची आर्थिक बाजू सांभाळता येत नाही आणि लोन मंजूर होण्याची शक्यता कमी होईल.
८. करार न वाचता त्यावर सही करणे
उद्योजकाने करारातील सर्व अटी आणि शर्ती नीट वाचून काही शंका असल्यास त्याचे स्पष्टीकरण मागितले पाहिजे. लोनबाबत सर्व अटी समजण्यासाठी इतर कोणाची मदत घेणे चांगले.
९. व्याज दराकडे पर्याप्त लक्ष न देणे
व्याज दराकडे नेहेमी लक्ष ठेवावे कारण बाजारात चढ-उतार झाल्यास दर बदलू शकतात. तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला चांगल्या व्याज दरावर लोन मिळते आहे आणि लवकरच दर वाढतील तर तुम्ही अतिरिक्त रक्कम देऊन विशिष्ट अवधीसाठी व्याजदर स्थिर ठेवू शकता.
१०. कर्ज देणारी सर्वोत्तम कंपनी न शोधणे
बाजारात कर्ज देणार्या अनेक कंपन्या आहेत आणि योग्य कंपनी निवडण्यासाठी थोडे संशोधन करणे आवश्यक असते. कर्ज देणार्या कंपनीचे पात्रता निकष किंवा इतर निकष माहिती नसताना त्यांच्याकडे लोनसाठी अर्ज केल्यास तो नामंजूर होऊ शकतो, म्हणून ज्या कंपनीकडे अर्ज सादर करायचा असेल त्यांची माहिती शोधणे आवश्यक असते.
ग्रोमोर फायनॅन्स आकर्षक व्याज दरावर तारण न ठेवता लघु उद्योगांना बिझनेस लोन देते.