मोबाइल मार्केटिंग केल्याने लघु उद्योजक ग्राहकांना प्रत्यक्ष न भेटता त्यांच्याशी मोबाइल फोनद्वारे संपर्क साधू शकतो. मोठ्या संख्येत लोकांपर्यंत पोहचून आणि योग्य लोकांपर्यंत माहिती पोहचवून मोबाइल मार्केटिंग अत्यंत प्रभावी ठरू शकते. विद्यमान ग्राहक आणि संभाव्य ग्राहक दोन्हीसाठी मोबाइल मार्केटिंग वापरता येते.
मोबाइल मार्केटिंग करताना लघु उद्योजकाने खालील टिप्स वापराव्या:
१. टेक्स्ट मार्केटिंग
सर्व फोनमध्ये एसएमएस सेवा उपलब्ध असते. आजकाल मेसेजिंग करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असले तरीही उत्पादन आणि सेवांचे मार्केटिंग करण्यासाठी एसएमएस अजूनही सर्वोत्तम पर्याय आहे. ईमेल उघडून वाचण्यापेक्षा लोक एसएमएस वाचतील याची शक्यता अधिक असते.
‘ऑप्ट इन’ योजना निर्माण करा ज्यात ग्राहकांना साइन अप करता येईल आणि त्यांना नवीन माहिती आणि भेटवस्तू मिळतील. असे केल्याने भेटवस्तू किंवा डिसकाऊंट मिळवण्यासाठी ग्राहक तुमच्याकडे आकृष्ट होतील.
२. मोबाइल वर पण चालणारे संकेतस्थळ निर्माण करा
ग्राहक स्पर्धकांकडे जाऊ नये म्हणून तुमच्या कंपनीचे असे संकेतस्थळ तयार करा जे लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, टॅब्लेट सगळ्यावर पाहता येते.
३. मोबाइल अॅप
मोबाइल अॅप बनवणे खर्चिक असले तरीही तुम्ही वाजवी किंमतीत अॅप निर्माण करून घेऊ शकता. आजकाल अॅपचे महत्त्व खूप वाढले आहे म्हणून या पर्यायाचा नक्की विचार करा.
४. सोशल नेटवर्किंग साइट वर क्रियाशील रहा
काही पोस्ट शेअर करणे, अर्थपूर्ण संवाद साधणे, प्रतिक्रियांना उत्तर देणे, मतांवर आणि ग्राहकांच्या सूचनांवर अभिप्राय देणे हे सर्व केल्याने तुमच्या ब्रॅंडबाबत माहिती सर्वदूर पोहचेल आणि लोकांना ते आवडेलही.
५. डील्स आणि डिसकाऊंट द्या
एसएमएस द्वारे कूपन पाठवा. वर्तमानपत्रात छापल्या जाणार्या कूपनपेक्षा अधिक प्रतिसाद एसएमएस मधील कूपनला मिळेल. एसएमएस द्वारे ग्राहकांना उपलब्ध असलेले डिसकाऊंट किंवा ऑफर पण कळवता येतात.
६. स्मार्ट ग्राहक सेवा प्रदान करण्याचा विचार करा
ऑर्डर ट्रॅक करणे, पेमेंट स्वीकारणे, शिपिंग तपशील पाठवणे, ग्राहकांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर देणे या सगळ्या कार्यासाठी अनेक व्यवसाय मोबाइल ग्राहक सेवेचा वापर करू लागले आहेत. लघु उद्योजक आणि ग्राहक दोघांसाठी हे सोपे आणि सोईस्कर असते. मोबाइल ग्राहक सेवा वापरल्यामुळे ग्राहकाला त्वरित प्रतिसाद मिळतो व तो आनंदित होतो.
७. व्हॉट्सअॅप वापरा
नियमितपणे ग्राहकांना डिसकाऊंट आणि ऑफर पाठवा. सर्व ग्राहकांची एक ब्रॉडकास्ट यादी निर्माण करा.
तुमची कोणत्या प्रकारची उत्पादने आहेत यावर आधारित दैनिक किंवा आठवड्याच्या ऑफर ग्राहकांना पाठवा आणि त्यांची प्रतिक्रिया मागा.
अजून एक पर्याय म्हणजे डिसकाऊंट कोड, फ्लॅश सेल, कूपन, नवीन उत्पादने इत्यादीची जाहिरात करण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेटस वापरा. उत्पादनाचे आणि सेवेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पण व्हॉट्सअॅप स्टेटस वापरता येते.
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला विनातारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!