बँका महत्त्वाच्या वित्तीय संस्था असून तिथे खात्यात डिपॉसिट (ठेवी) ठेवणे, चेक क्लिअर करणे व कर्ज उपलब्ध करून देणे यासारख्या सुविधा ग्राहकांना प्रदान केल्या जातात.
एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनॅन्शियल कंपनी (बँक नसलेली वित्तीय संस्था) जिथे सेल्फ-ड्रॉ चेक व डिमांड ड्राफ्ट वगळता ग्राहकांना बँकेत मिळणार्या इतर सर्व सुविधा प्रदान केल्या जातात.
बँक व एनबीएफसी यांच्यामधील फरक जाणून घेऊया:
-
बँका पैशांचे पेमेंट व उलाढाल प्रणालीचा अभिन्न भाग असतात. म्हणजेच बँका बचत व गुंतवणूक करण्याचे पर्याय देतात. एनबीएफसी ही कार्ये करत नाहीत.
-
बँका आर्थिक उलाढाली, ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरवणे, ट्रॅव्हलर चेक वितरण, ग्राहकांच्या खात्यात ठेवी जमा करणे इ. सारख्या सेवा प्रदान करतात. ही कार्ये एनबीएफसी करत नाहीत.
-
बँका साधारणतः तारण (कर्ज घेणाऱ्याला तारण म्हणून काही संपत्ती द्यावी लागते. कर्जाची परतफेड केली नाही किंवा उशीर केला तर तारण बँकेच्या मालकीचे होते) ठेवूनच कर्ज देतात व कर्ज वितरणास वेळ लागतो. एनबीएफसी मात्र विना-तारण कर्ज देतात व वितरण त्वरित केले जाते.
-
बँकांना सीआरआर व एसएलआर सारखे रिझर्व्ह रेशियो राखून ठेवावे लागतात. एनबीएफसी कंपन्यांसाठी हा नियम लागू होत नाही.
-
बँका आर्थिक उलाढाली, ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरवणे, ट्रॅव्हलर चेक वितरण, ग्राहकांच्या खात्यात ठेवी जमा करणे इ. सारख्या सेवा प्रदान करतात. ही कार्ये एनबीएफसी करत नाहीत.
-
बँकांमध्ये ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉसिटला विम्याचे संरक्षण असते. एनबीएफसी मधील फिक्स्ड डिपॉसिटला विम्याचे संरक्षण नसते कारण एनबीएफसी मध्ये फिक्स्ड डिपॉसिट ठेवणे म्हणजे एखाद्या कंपनी मध्ये फिक्स्ड डिपॉसिट ठेवण्यासारखेच असते. म्हणून एखाद्या एनबीएफसी कंपनीने तुम्हाला डिपॉसिटची रक्कम काढू दिली नाही तर पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया अतिशय लांबलचक असते.
दोन्ही संस्थांचे विविध फायदे असतात. कर्ज घेताना गरजेप्रमाणे संस्था निवडणे उत्तम असते.
तुम्हाला विना-तारण बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा. ग्रोमोर आकर्षक व्याज दरावर तारण न ठेवता लघु उद्योगांना बिझनेस लोन देते आणि लोनची रक्कम ३ दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत दिली जाते.