आजकाल लोकांना रोख पैसे जवळ ठेवायला आवडत नाही. मोबाइल पेमेंट करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात या पद्धती वापरू लागले आहेत.
रोख पैसे किंवा क्रेडिट कार्ड न वापरता स्मार्टफोन वापरुन देखील तुम्हाला खरेदी करता येते किंवा पेमेंट करता येते.
मोबाइल पेमेंट प्रणाली किंवा मोबाइल वॉलेट वापरण्यासाठी तंत्रज्ञानाची खूप माहिती असायची गरज नसते आणि ती वापरण्यासाठी खूप खर्च पण करावा लागत नाही. या कारणांमुळेच अनेक कंपन्या मोबाइल पेमेंट प्रणाली वापरायला लागल्या आहेत.
आजकाल लोकांना सगळे सोपे आणि सोईस्कर हवे असते आणि जर तुमच्या स्पर्धकांनी ही प्रणाली वापरायला सुरू केली तर ग्राहक तुमच्याकडे न येता कदाचित स्पर्धकांकडे जातील.
म्हणून, यशस्वी व्यवसायासाठी ज्या नवीन गोष्टींची मागणी आहे किंवा ज्या लोकप्रिय होत आहेत अशा गोष्टी वापरणे महत्त्वाचे असते.
लघु उद्योजकांसाठी मोबाइल वॉलेट वापरण्याचे काही लाभ खाली दिले आहेत:
१. ग्राहकांसाठी सोईस्कर
ग्राहकांना काय सोयीचे वाटेल याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्यामुळे ग्राहक तुमच्याकडे परत परत येतात आणि नवीन ग्राहक पण आकृष्ट होतात. पारंपारिक पेमेंट पद्धतींपेक्षा मोबाइल वॉलेट वापरल्यामुळे वेळ वाचतो कारण चेकआऊट अधिक लवकर करता येते आणि ग्राहकांना स्वतःजवळ रोख पैसे ठेवायची गरज पडत नाही.
ग्राहकांचा खरेदीचा अनुभव पण सुधारतो आणि व्यवसायाला अधिक चांगल्या प्रकारे ग्राहकांना सेवा प्रदान करता येते.
२. व्यवसायासाठी सोईस्कर
ग्राहकांव्यतिरिक्त हे तुमच्यासाठी पण सोईस्कर असते कारण लघु उद्योजक म्हणून रोख पैसे किंवा चेक घेणे थोडे अवघड होऊ शकते, कारण पैसे किंवा चेक हरवण्याची शक्यता असते. मोबाइल वॉलेट वापरल्याने तो धोका अजिबात उरत नाही, आणि प्रत्येक उलाढाल डिजिटल असते आणि त्याचा अभिलेख असतो.
मोबाइल पेमेंट पद्धत वापरल्यास ग्राहकाच्या खरेदी करण्याच्या सवयी पण लक्षात येतात, कारण ग्राहकांच्या खरेदीची आणि पेमेंटची तपशीलवार यादी उपलब्ध असते ज्यामुळे ग्राहकांची मागणी समजण्यात मदत होते. ही माहिती मिळाल्यामुळे व्यवसायांना अधिक चांगली सेवा प्रदान करता येते आणि व्यवसायाची वाढ होते.
३. लॉयल्टी प्रोग्राम
स्मार्टफोन किंवा टॅब्लेट वापरुन ग्राहकाने पेमेंट केले की सर्व माहिती त्या अॅप्लिकेशनमध्ये साठवली जाते. अशामुळे ग्राहकाने केलेली खरेदी, मिळालेले रिवॉर्ड पॉइंट, कूपन इत्यादीचे अभिलेख तुम्हाला वेगळे निर्माण करावे लागत नाही.
लॉयल्टी प्रोग्राम चालवणे अधिक सोपे झाल्यामुळे ग्राहक परत परत तुमच्याकडे येतात.
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला विनातारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!