प्रत्येक लघु उद्योजकाला हा प्रश्न असतो की व्यवसायाचा विस्तार करायची सर्वोत्तम वेळ कुठली? प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण तुमच्या उद्योगाची सध्याची स्थिती आणि तुम्हाला व्यवसायाचा विस्तार कसा करायचा आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
उद्योगात वाढ झाली तर नक्की काय आणि कसे होईल याबाबत लघु उद्योजकांनी विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार योजना करावी.
तुम्हाला कोणत्या कारणासाठी व्यवसायाचा विस्तार करायचा आहे?
- तुम्हाला अधिक ग्राहक आकर्षित करायचे आहेत
- तुमचे प्रतिस्पर्धी त्यांचे व्यवसाय वाढवत आहेत
- उद्योगाची विद्यमान स्थिती तुमच्या कर्मचार्यांना पसंत नाही
व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!
1. सध्याची परिस्थिती निरखून पहा
विस्तार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीची संसाधने, म्हणजेच तुमचे कर्मचारी, यांची परिस्थिती तपासून पहा. कंपनीची आर्थिक स्थिती, आणि कंपनी प्रदान करणार्या सेवा व उत्पादने यांचे पण काळजीपूर्वक मूल्यांकन करा. मग तुम्हाला विस्तार कोणत्या दिशेने करायचा हे ठरवता येईल, उदा: नवीन ठिकाणी दुकान उघडावे किंवा नवीन उत्पादने व सेवा विकसित कराव्या. विस्तार करण्यासाठी तुमच्याकडे योग्य कौशल्य असलेले कर्मचारी आहेत का? नसतील तर तुम्हाला योग्य कर्मचारी आकर्षित करण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील.
व्यवसायाचा विस्तार म्हणजे आर्थिक जोखीम घेणे आले. विस्तार करताना येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी तुमची आर्थिक स्थिती भक्कम व सुरक्षित आहे का? संभाव्य गुंतवणूकदार किंवा भागीदाराला तुमचा उद्योग आकर्षक वाटेल का?
2. पुरेशी मागणी आहे का?
नवीन उत्पादने किंवा सेवा विकसित करून विस्तार करणार असाल तर तसे करण्यापूर्वी आसपासच्या स्थानिक ग्राहकांचा अंदाज घ्या. त्यांची जी मागणी विद्यमान स्थितीत पूर्ण होत नसेल ती आधी पूर्ण करण्याचा विचार करा.
उदाहरणार्थ, तुमचे कॉफीशॉप असेल आणि तुमच्याजवळ चांगली बेकरी नसेल तर तुम्ही दोन्ही एकत्र करून कॅफेतच बेकरी सुरू केली तर तुमच्या ग्राहकांची संख्या वाढू शकते.
तुमच्या ग्राहक वर्गाचा नीट अभ्यास करा. तुमच्या व्यवसायाच्या विस्ताराने नक्की काय बदल होतील व तुमच्या ग्राहकांना काय हवे आहे हे समजून घ्यायला सर्वेक्षण करा. ग्राहकांशी ईमेल व सोशल मीडिया वर संपर्क साधा. दुकानात येणार्या ग्राहकांशी चर्चा करा.
3. एकदा पर्यायांचा विचार करा
विस्ताराला आवश्यक असणारे पैसे उभे करण्यासाठी तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत? लघु उद्योजकांसाठी उपलब्ध सरकारी योजना तपासून बघू शकता, गुंतवणूकदारांशी चर्चा करू शकता, तुम्ही केलेल्या बचतीचा वापर करू शकता, किंवा बँकेच्या प्रतिनिधीशी बोलून कर्ज घेणे शक्य आहे का हे तपासून बघा. कर्ज घेताना रीड्यूसिंग बॅलेन्स प्रक्रियाच निवडा.
कर्ज घेण्यासाठी एनबीएफसी देखील उत्तम पर्याय ठरू शकतात. एनबीएफसीत कर्जासाठी अर्ज करणे सोपे असते, व्याज दर परिवर्तनशील असतात आणि कर्जाचे वितरण त्वरित केले जाते.
जर आपल्याला एका लहान व्यवसाय कर्जाची गरज असल्यास,आकर्षक व्याजदरांवर कर्जासाठी आजच ग्रोमोर कंपनीशी संपर्क साधा!