लघु उद्योगाला त्वरित आणि अल्पकाळासाठी आर्थिक मदत हवी असेल तर सर्वोत्तम उपाय असतो लघु उद्योगासाठी असलेले कर्ज घेणे. असे केल्याने तुमचे कार्यकारी भांडवलाच्या गरजा तर पूर्ण होतातच पण त्याच बरोबर नवीन मशीन घेणे, कामासाठी मोठी जागा घेणे, अतिरिक्त कर्मचारी नोकरीवर ठेवणे आणि कच्चा माल विकत घेणे ह्या सगळ्या योजनांना पण आधार मिळतो. जर मागणीत अनपेक्षितपणे वाढ झाली किंवा व्यवसाय वर्षातील काही विशिष्ट काळ चालत असेल तर कर्ज घेतल्याने खूप आधार मिळतो, विशेषत: विना तारण कर्ज असेल तर.
बहुतांश लघु उद्योजक सुरूवातीला मर्यादित पैसा उभा करू शकतात आणि छोट्या प्रमाणात गुंतवणूक करतात. जेव्हा बँक कर्जासाठी तारण मागते तेव्हा उद्योजक अशा परिस्थितीत नसतात की त्यांना बँकेशी वाटाघाटी करता येतील. ह्या विपरीत एनबीएफसी आणि इतर समान संस्था कुठल्याही तारणाशिवाय कर्ज देतात. असे व्यवसाय कर्ज लघु उद्योजकांसाठी आकर्षक असते कारण त्यात काही तारण ठेवावे लागत नाही आणि त्याच बरोबर कर्जाची रक्कम काही दिवसातच मिळते.
मात्र 3 दिवसापेक्षा कमी अवधीत तुम्हाला विना तारण कर्ज हवे असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र असायला हवे आणि तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असायला हवी. विना तारण व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी पात्रता निकष काय असतात आणि कुठली कागदपत्रे आवश्यक असतात हे आता आपण बघू.
व्यवसायासाठी विना तारण कर्ज हवे आहे? तुम्हाला खालील गोष्टी माहिती असायला हव्या!
व्यवसायासाठी विना तारण छोटे कर्ज प्राप्त करण्यासाठी असणार्या निकषांची माहिती करून घ्या:
विविध संस्था लघु उद्योगांचे विविध प्रकारे मूल्यांकन करतात आणि ते विना तारण व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहेत किंवा नाही हे पण वेगवेगळ्या पद्धतीने ठरवले जाते. सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारे काही निकष खालील प्रमाणे आहेत:
१. किमान उलाढाल (किमान १५ लाख प्रतिवर्ष)
२. अर्जदाराचे वय (२१ वर्ष ते ६५ वर्ष)
३. व्यवसायाचा अवधी (किमान १ वर्ष)
विना तारण व्यवसाय कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
सर्व संस्था लघु उद्योगाची परिस्थिती पडताळून पाहतात – आणि खालील कागदपत्रांचे निरीक्षण केले तर त्याबद्दल चांगला अंदाज बांधता येतो-
- मालकाचे पॅन कार्ड
- मालकाचे आधार कार्ड
- मागील १२ महिन्याचे सर्व बँक खात्यांचे स्टेटमेंट (pdf प्रारूपात)
- मागील २ वर्षाचे आयकर परतावे
- नवीनतम ताळेबंद आणि नफा-तोटा माहिती (तात्पुरती/लेखापरीक्षित नसलेली)
- नवीनतम लेखापरीक्षित ताळेबंद आणि नफा-तोटा माहिती
- दुकाने आणि आस्थापने परवाना (गुमास्ता)
- जीएसटी नोंदणी पावती
- जीएसटी पावती/चलन
पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे ह्याबद्दल अधिक माहितीसाठी लघु उद्योग कर्जांसाठी कागदपत्रांची यादी बघा.
वरील यादीतील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे तयार असतील तर तुम्हाला काही दिवसातच व्यवसाय कर्ज मिळू शकते!
लघु उद्योजक आहात? ३ दिवसाच्या आत ग्रोमोर फायनॅन्सकडून विना तारण व्यवसाय कर्ज मिळवा!
तुमच्या गरजा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या म्हणून ग्रोमोर फायनॅन्सची सरल, पारदर्शक प्रक्रिया आहे. तुम्हाला खालील सोपे टप्पे पूर्ण करावे लागतील.
१. व्यवसाय कर्जासाठी अर्ज करा
तुम्ही कुठूनही कर्जाचा ऑनलाइन अर्ज बघू शकता. gromor.in संकेतस्थळाला भेट द्या आणि “कर्जासाठी अर्ज करा” क्लिक करा.
२. संबंधित कागदपत्रे सादर करा
वर नमूद कर्जासंबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करा. ग्रोमोर फायनॅन्स अनुपालन आणि सुरक्षा संबंधी नियम काटेकोरपणे पाळते त्यामुळे तुमची सर्व संवेदनशील माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.
३. कर्जाची मंजूरी मिळवा
कागदपत्रांचे मूल्यांकन स्वयंचलित प्रकारे तंत्रज्ञान वापरुन होते म्हणजे अर्जाचे पारदर्शकपणे मूल्यांकन होते आणि लवकरात लवकर मंजूरी मिळते. एकदा सर्व सत्यापन पूर्ण झाले की मंजूरी दिली जाते.
४. कर्जाची रक्कम प्राप्त करा
एकदा कर्जाची मंजूरी मिळाली की रक्कम त्वरित प्राप्त करता येते म्हणजे तुम्हाला त्याचा वापर लगेच सुरू करता येतो.
झालं… हे सगळं व्हायला ३ दिवसापेक्षा कमी अवधी लागतो!
विना तारण व्यवसाय कर्ज मिळवणे सोपे वाटत असले तरी त्याचा लाभ घेण्यापूर्वी काही घटकांचा विचार करावा. कुठल्याही प्रकारचे कर्ज असो, पारंपारिक किंवा विना तारण, त्याची परतफेड तर करावीच लागते आणि पश्चाताप करण्यापेक्षा आधीच सावधगिरी बाळगणे कधीही चांगलेच!
लघु उद्योगासाठी विना तारण कर्ज घेण्यापूर्वी कुठल्या घटकांचा विचार करावा:
१. तारण असलेल्या कर्जापेक्षा अधिक महाग
अशा प्रकारच्या कर्जात कर्ज देणारा अधिक धोका पत्करतो आणि म्हणून ह्याचे व्याज दर पारंपारिक तारण असलेल्या कर्जापेक्षा अधिक असतात. ह्याचा अर्थ असा की विना तारण कर्ज घेतल्यास तुम्हाला परतफेड करताना पारंपारिक कर्जाच्या तुलनेत अधिक रक्कम परत करावी लागते.
२. पात्रता निकष अवघड असतात
अशा प्रकारच्या कर्जात कर्ज देणारा अधिक धोका पत्करतो आणि म्हणून अशा कर्जासाठी पात्र होणे अधिक अवघड असते. तुमचा क्रेडिट इतिहास चांगला नसेल किंवा उपलब्ध नसेल, तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
३. परतफेड न करण्याचे परिणाम
कुठल्याही कर्जाची परतफेड करू शकला नाहीत, मग ते पारंपारिक असो किंवा विना तारण व्यवसाय कर्ज असो, तर त्याचा दुष्प्रभाव तुमच्या क्रेडिट स्कोअरवर पडतो आणि भविष्यात तुम्हाला कर्ज मिळणे अधिक अवघड होते.
तुमचा विकसनशील लघु उद्योग असेल तर कधी कधी तारण ठेवून पारंपारिक कर्ज मिळणे पण अवघड होते. अशा परिस्थितीत योग्य संस्थेकडून योग्य उद्देशासाठी विना तारण कर्ज घेतले तर ते वरदान ठरू शकते.
तुमच्या लघु उद्योगासाठी तुम्हाला विना तारण कर्ज हवे असेल आणि तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असाल, तर ग्रोमोर फायनॅन्सकडे तुमच्यासाठी पर्याय आहेत! आम्हाला आजच संपर्क करा!