तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैशांची गरज आहे का? लघु उद्योगांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत – त्यापैकी एक म्हणजे ‘प्रधान मंत्री मुद्रा योजना’
किंवा मुद्रा लोन.
मुद्रा लोनचे तीन प्रकार आहेत – शिशु, किशोर व तरुण. प्रत्येक प्रकारच्या लोनमध्ये उपलब्ध असणारी रक्कम वेगवेगळी असते.
मुद्रा लोनचे पात्रता निकष तुम्ही पूर्ण करता का हे बघू!
अर्जदाराचे वय: १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकते.
- क्रेडिट रिपोर्ट: मुद्रा लोन मिळवण्यासाठी उत्तम क्रेडिट स्कोर असणे आवश्यक असते.
- व्यवसायाचा प्रकार: खालील प्रकारचा व्यवसाय असल्यास तुम्ही मुद्रा लोनसाठी पात्र ठरू शकता:
- दुकानदार
- कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग – मधुमक्षिकापालन, मत्स्योद्योग, कृषि-प्रोसेसिंग इत्यादी. (परंतु, कृषि क्षेत्रातील यूनिटचा समावेश नाही – जमिनी विकसित करण्यासाठी केलेले कार्य जसे कालवे बांधणे, सिंचन, विहीर खोदणे इत्यादी समाविष्ट नाहीत)
- भाजी व फळे विक्रेता
- टेक्सटाइल व हस्तकला
- खाद्य पदार्थ
- औषधाचे दुकान, सलून, कुरियर सेवा इत्यादी.
मुद्रा योजना प्रामुख्याने विधीसंस्थापित नसलेल्या लघु उद्योगांसाठी असते. व्यक्ती, भागीदारी व्यवसाय, प्रायवेट लिमिटेड कंपनी व पब्लिक कंपनी मुद्रा लोन घेऊ शकतात. काहीही गहाण न ठेवता त्वरित लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा!