जीएसटी अर्जाची प्रक्रिया सुरु असताना अथवा जीएसटी रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर देखील जीएसटी मधील तपशील बदलणे शक्य असते.
खालील जीएसटी रेजिस्ट्रेशन तपशील बदलता येतात:
-
व्यासायाचे नाव
-
व्यासायाचा पत्ता
-
व्यवसायासाठी अतिरिक्त पत्ता असल्यास
-
भागीदार किंवा संचालक, व्यवस्थापन समिती, कार्यकारी अध्यक्ष (म्हणजेच व्यवसायाच्या रोजच्या कामासाठी जबाबदार व्यक्ती) यांची नावे जोडणे, काढून टाकणे किंवा त्यांची निवृत्ती होणे
-
स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत असलेल्या अधिकार्याचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल ऍड्रेस
जीएसटी रेजिस्ट्रेशन तपशील बदलायची प्रक्रिया:
१. आवश्यक कागदपत्रांसह जीएसटी आरईजी-१४ अर्ज सादर करावा.
२. जीएसटी अधिकारी त्याची पडताळणी करतात आणि पंधरा दिवसाच्या आत जीएसटी आरईजी-१५ प्रारूपात मंजूरी दिली जाते. मंजूरी दिल्याच्या तारखेपासून बदल लागू होतात.
३. अधिकार्यांना कागदपत्रे समाधानकारक वाटली नाहीत तर जीएसटी रेग-०३ प्रारूपात कारणे दाखवा नोटीस दिली जाते.
४. अर्जदाराने नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत जीएसटी आरईजी-०४ प्रारूपात उत्तर देणे आवश्यक असते.
५. अधिकाऱ्यांना उत्तर समाधानकारक वाटले नाही तर अर्ज अस्वीकार केला जातो व जीएसटी आरईजी-०५ प्रारूपात निर्देश दिले जातात.
६. जीएसटी अधिकार्यांनी इतर कोणतीही कार्यवाही केली नाही तर तपशीलात बदल झाला असे समजावे.
टीप: पॅन नंबरमध्ये चूक असल्यास अर्जदाराला जीएसटी आरईजी-०१ प्रारूपात परत नवीन रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते.
तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला कर्ज हवे असल्यास, वाजवी व्याज दरात आणि त्वरित कर्ज देणार्या ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!