लघु उद्योजकाला अनेक कारणांसाठी लोन घेण्याची गरज भासू शकते, जसे नवीन कर्मचारी नियुक्त करणे, व्यवसाय नवीन ठिकाणी सुरु करणे, नवीन मशीन विकत घेणे, वर्किंग कॅपिटल इ. उद्योजक जेव्हा लोन देणाऱ्या कंपनीला संपर्क करतो तेव्हा लोन घेण्याचा उद्देश स्पष्टपणे नमूद केला पाहिजे. इतर महत्वाच्या घटकांबरोबर लोन घेण्याच्या उद्देशाबाबत पण लोन देणाऱ्या कंपनीची खात्री झाली तरच लोन मंजूर केले जाते.
भारतात विविध बँक, एनबीएफसी, सरकारी योजना इ. यांच्याकडून लोन घेता येते. लोन देणाऱ्या सर्व संस्थांचा प्रमुख निकष सारखाच असतो, तो म्हणजे उद्योगाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे.
लोनच्या अर्जात साधारणपणे उद्योगाची माहिती, प्रकार, आर्थिक स्थिती आणि गरज ही सर्व माहिती समाविष्ट असायला पाहिजे.
बिझनेस लोन मिळवण्यासाठी उपलब्ध पर्याय:
१. बँक
बँक साधारणपणे लघु उद्योगांना लोन देताना मालमत्ता तारण ठेवून घेतात. बँकेचे पात्रता निकष, लोन घेणाऱ्याचा क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट हिस्टरी यावर व्याज दर अवलंबून असते. लोन घेण्यासाठी हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.
लोनची संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज यांची परतफेड झाल्यानंतरच तारण ठेवलेली मालमत्ता लोन घेणाऱ्याला परत मिळते.
जर लोन घेणाऱ्याने लोनची परतफेड केली नाही तर बँकेला त्या मालमत्तेचे मालकी हक्क मिळतात आणि ती विकून बँक आपला तोटा भरून काढते.
गुंतवणुकीत तुम्हाला वैयक्तिक धोका कमी करायचा असेल किंवा कमी व्याज दर हवे असतील तर तारण असलेले लोन घेणे हा चांगला पर्याय आहे.
२. एनबीएफसी
लघु उद्योगाला बिझनेस लोन घेण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनॅन्शियल कंपनी). एनबीएफसी यांची अर्ज प्रक्रिया खूप सोपी असते आणि बँकेच्या लांब आणि क्लिष्ट प्रक्रियेसारखी नसते. बँकेच्या तुलनेत एनबीएफसीच्या अटी व शर्ती पण कमी असतात आणि काही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते.
एनबीएफसीकडून लोन मिळवण्यासाठी त्यांचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतात, ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
३. सरकारी योजना
लघु उद्योजकांना बिझनेस लोन हवे असल्यास त्यांना मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया योजना इ. पर्याय उपलब्ध असतात.
फक्त सूक्ष्म आणि लघु उद्योगांना रु १० लाखापर्यंत लोन देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. व्यावसायिक बँक, सहकारी बँक इ. यांच्याकडून मुद्रा लोन मिळते.
मुद्रा लोन अंतर्गत तीन पर्याय असतात, शिशु, किशोर आणि तरुण. रु ५०,००० पर्यंत लोन शिशु योजनेत मिळते. रु ५०,००० ते रु ५,००,००० मधील लोन किशोर योजनेत मिळते, आणि रु ५,००,००० ते रु १०,००,००० मधील लोन तरुण योजनेत मिळते.
स्टँड-अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला उद्योजकांना सोपे, सोईस्कर, स्वस्त आणि विना तारण लोन दिले जाते.
१ ते १० वर्षाच्या अवधीसाठी रु १० लाख ते रु १ कोटी रकमेचे लोन दिले जातात.
लोनसाठी अर्ज करायला काय पात्रता निकष असतात:
- उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
- अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
- व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
- अजून एक महत्वाचा निकष असतो अर्जदाराचा क्रेडिट स्कोर/सिबिल स्कोर. कर्जदाराची परतफेड करण्याची प्रवृत्ती आणि त्याला लोनची परतफेड करता येईल का हे तपासण्यासाठी क्रेडिट स्कोर पाहिले जाते. चांगला क्रेडिट स्कोर असल्यास लोनचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
- लोनची रक्कम, उद्देश, कंपनीचा प्रकार इ. पण काही निकष असतात.
- लोन देणारी कंपनी साधारणपणे पुढील कागदपत्रे सादर करायला सांगते: पॅन कार्ड, आधार कार्ड, पीडीएफ रूपात मागील १२ महिन्यांची बँक स्टेटमेंट, मागील २ वर्षांचे आयटी रिटर्न, दुकान व आस्थापना परवाना, जीएसटी पावत्या इ.
लोन घेण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या:
१. उद्योगाच्या नेमक्या गरजांचे विश्लेषण करणे
लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या उद्योगाच्या गरजांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. उद्योगासाठी नेमके काय हवे आहे, उद्योगाचा विस्तार करायचा आहे किंवा नवीन मशीन विकत घ्यायची आहे किंवा उद्योगाच्या रोजच्या कार्यासाठी पैसे हवे आहेत हे ठरवा. तुम्हाला लोन नेमके कशासाठी हवे आहे याबाबत स्पष्टता असावी आणि लोन देणाऱ्या कंपनीला ते पटवून देता आले पाहिजे.
२. क्रेडिट स्टेटस माहिती असणे
वेळोवेळी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे असते. लोन देणारी प्रत्येक कंपनी तुमचा क्रेडिट स्कोर आणि हिस्टरी तपासून पाहते. भूतकाळात तुम्ही किती लोन घेतले होते, त्यांची वेळेवर परतफेड केली का, तुम्ही काही फसवणूक करणारे काम केले आहे का आणि क्रेडिट कार्ड कसा वापरता याबाबत माहिती गोळा करण्यासाठी हे केले जाते.
म्हणून तुमची पेमेंट हिस्टरी, इतरांना किती पैसे द्यायचे आहे, आणि किती प्रकारचे कर्ज तुम्ही घेतले आहे ही माहिती असली पाहिजे.
७५० – ९०० यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोर असल्यास तो चांगला समजला जातो, पण हे लोन देणाऱ्या कंपनी वर अवलंबून असते. काही लोन देणार्या कंपन्यांची क्रेडिट स्कोर परिगणित करण्याची स्वतःची पद्धत असते.
३. लोन देणाऱ्या कंपनीबाबत माहिती गोळा करा
तुमचा अर्ज नामंजूर होऊ नये याची खात्री करण्यासाठी लोन देणारी कंपनी, कंपनी कोणत्या प्रकारचे लोन देते, किती व्याज दर आकारते, आणि इतर अटी व शर्ती बाबत माहिती गोळा करणे महत्वाचे असते. असे केल्याने तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
तुम्ही कोणत्या लोन देणाऱ्या संस्थेला निवडता यावर लोन देणाऱ्या संस्थेला संपर्क कसा करायचा हे अवलंबून असते.
तुम्ही लोनसाठी बँकेत अर्ज करत असाल तर तुम्हाला बँक मॅनेजरच्या नावाने पत्र लिहावे लागते ज्यात तुम्हाला कोणत्या कारणासाठी आणि किती लोन हवे आहे हे नमूद करावे लागेल.
पत्रात तुमच्या उद्योगाचे नाव, रचना, थोडक्यात माहिती, किती वर्षांपासून उद्योग कार्यरत आहे, त्यात किती कर्मचारी काम करतात, आणि त्या वर्षी किती उत्पन्न झाले हे सर्व नमूद करावे.
तुम्ही ऑनलाइन पर्याय निवडला तर तुम्हाला खालील करावे लागते:
१. लोन देणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या.
२. अर्ज भरा.
३. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
४. लोन मंजूर होण्याची वाट पहा.
५. लोन मंजूर झाल्यास काही दिवसात लोनची रक्कम दिली जाईल.
शेवटी, कोणत्या प्रकारचे लोन तुमच्या व्यवसायासाठी सर्वाधिक उपयोगी पडेल हे ठरवायला पाहिजे म्हणजेच तारण असेलेले किंवा नसलेले. म्हणून प्रत्येक प्रकारच्या लोनचे फायदे आणि गैरफायद्यांचे मूल्यांकन केले की तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडता येतो.
तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्हाला लोन घ्यायचे असेल तर वाजवी किंमतीत त्वरित लोन मिळवण्यासाठी ग्रोमोर फिनान्स कंपनीशी संपर्क साधा.