क्रेडिट स्कोर एक तीन अंकी आकडा असतो ज्याचे मूल्य ३००-९०० यामध्ये असते. यात तुमच्या भूतकाळातील आर्थिक वर्तनाचे वर्णन असते (तुम्ही आधी कर्ज घेतले होते का, त्याची वेळेवर परतफेड केली का, कधी लोनची परतफेड केली नाही असे झाले का इ.).
बिझनेस लोन मंजूर होण्यासाठी हा महत्वाचा निकष असतो. क्रेडिट स्कोर चांगला असेल तर लोन मंजूर होण्याची संभावना वाढते, आणि कमी असेल तर लोन मिळणे अवघड होते. क्रेडिट स्कोर चांगले असेल तर वाजवी व्याजदर आकारला जातो.
म्हणून व्यवसायाच्या मालकांनी आपला क्रेडिट स्कोर सुधारण्याचा प्रयत्न करावा.
क्रेडिट ब्युरो तुमचा क्रेडिट स्कोर देतात. पण काही लोन देणाऱ्या कंपन्या क्रेडिट स्कोरचे मूल्यांकन करण्यासाठी स्वतःची पद्धत वापरतात.
चांगला क्रेडिट स्कोर म्हणजे काय?
वर नमूद केल्याप्रमाणे, ३००-९०० यामध्ये क्रेडिट स्कोर असतो, जिथे ३०० ही किमान पात्रता असते, आणि ९०० ही कमाल पात्रता असते. साधारणपणे, ७५० आणि त्यापेक्षा अधिक क्रेडिट स्कोर असल्यास तो चांगला मानला जातो. ७०० पेक्षा कमी स्कोर असेल तर लोन देणाऱ्या कंपनीसाठी धोका ठरू शकतो. ८०० स्कोर असल्यास सर्वोत्तम अटींवर लोन मिळते म्हणून लोन देणाऱ्या कंपन्या साधारणपणे ७५० स्कोरचा विचार करतात.
लोन देणारी कंपनी किती व्याजदर आकारते हे क्रेडिट स्कोर वर अवलंबून असते. कमीतकमी व्याजदरावर लोन घेतल्यास योग्य कॅश फ्लो टिकवून ठेवण्यात मदत होते आणि खर्चावर नियंत्रण करण्यात पण मदत होते. चांगला क्रेडिट स्कोर असल्यास व्याजदराबाबत वाटाघाटी करून ते कमी करून घेता येते आणि इतर अटी व शर्ती पण बदलून घेता येतात.
चांगला क्रेडिट स्कोर असण्याचे काही फायदे:
- लोन त्वरित मंजूर होते.
- चांगला क्रेडिट स्कोर असल्यास कमी व्याज दरावर आणि अधिक रकमेचे लोन मिळते.
- मालमत्तेसंबंधी (मालकीची किंवा भाड्यावर असलेली) लोनसाठी मंजुरी मिळणे सोपे होते.
- क्रेडिट स्कोर चांगला असल्यास मालकाला क्रेडिट कार्डसाठी चांगल्या ऑफर मिळतात.
क्रेडिट स्कोर कसा सुधारता येतो हे पाहण्यापूर्वी क्रेडिट स्कोर वर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो हे पाहूया.
क्रेडिट स्कोर वर खालील घटकांचा प्रभाव पडतो:
१. भूतकाळात घेतलेल्या लोनची परतफेड कशाप्रकारे केली
भूतकाळात घेतलेल्या लोनची परतफेड कशाप्रकारे केली याचा सगळ्यात जास्त प्रभाव क्रेडिट स्कोर वर होतो. पूर्वी घेतलेल्या कोणत्याही लोनची परतफेड केली नसेल तर क्रेडिट स्कोर वर त्याचा दुष्परिणाम होतो.
तुम्ही लोन घेतल्यास त्याची परतफेड करण्याची क्षमता तुमच्यात आहे का हे लोन देणारी कंपनी तपासून पाहते. तुम्ही बिले वेळेवर भरता का, किती कर्ज घेतले आहे, दिवाळखोरी जाहीर केली आहे का, तुमच्या विरुद्ध खटला दाखल झाला आहे का, किती वेळेला तुम्ही हप्ते उशिरा भरले किंवा भरले नाही इत्यादी तपासून पाहिले जाते.
२. परतफेड न केलेले कर्ज
घेतलेले लोन, उत्पन्न मिळवण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष उत्पन्न या सगळ्या घटकांकडे लक्ष ठेवले पाहिजे. असे केल्याने तुम्ही किती कर्जांची परतफेड केली आहे आणि किती उरली आहेत हे लक्षात येते.
काही लोनची अजून परतफेड केली नसेल आणि तुम्ही नवीन लोन घेतले तर क्रेडिट स्कोर वर दुष्परिणाम होतो.
३. एकाच वेळी लोनसाठी अनेक अर्ज करणे
लोन देणारी संस्था जेव्हा तुमची क्रेडिट हिस्टरी तपासून पाहते तेव्हा त्यांना जर असे दिसले की एकाच वेळी तुम्ही अनेक लोन घेतले आहेत किंवा अनेक ठिकाणी चौकशी केली आहे तर त्यांची अशी समजूत होते की तुमच्या परतफेड करण्याचा क्षमतेपेक्षा अधिक लोन तुम्ही घेतले आहे.
४. क्रेडिट लिमिट
घेतलेले लोन किती अवधीसाठी वापरले हे सुद्धा महत्वाचे असते.
क्रेडिट युटीलायझेशन अत्यधिक असेल तर त्याचा क्रेडिट स्कोरवर दुष्परिणाम होतो कारण लोनची संख्या वाढली आहे हे त्यावरून दिसते.
किती परतफेड अजून करायची आहे भागिले क्रेडिट लिमिट म्हणजे क्रेडिट युटीलायझेशन. जसा वेळ जाईल तसे क्रेडिट युटीलायझेशन कमी झाले तर तुमचा क्रेडिट स्कोर वाढतो.
५. अनेक विना तारण लोन
वैयक्तिक लोन किंवा क्रेडिट कार्ड वर खर्च अशासारखे अनेक विनातारण लोन असतील तर क्रेडिट स्कोर वर दुष्परिणाम होतो. कर्ज देणाऱ्या कंपनीला असे आढळते की तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन करता येत नाही. तारण असलेले लोन घेतल्यास तुमचा क्रेडिट स्कोर वाढू शकतो.
६. नवीन लोन घेणे
नजिकच्या भूतकाळात तुम्ही घेतलेल्या लोनची संख्या ही उद्योगात कॅश फ्लो समस्या असताना घेतलेल्या लोनच्या संख्येपेक्षा अधिक असेल तर तुमच्या क्रेडिट स्कोर वर दुष्परिणाम होतो.
७. लोनचा अवधी
तुम्ही लोनची परतफेड वेळेवर केली तर तुमचा क्रेडिट स्कोर सुधारतो, पण मुदतीपूर्वी किंवा उशिरा परतफेड केली तर त्याचा दुष्परिणाम क्रेडिट स्कोर वर होतो.
मुदतीपूर्वी किंवा उशिरा परतफेड करण्यापूर्वी लोन देणाऱ्या कंपनीच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा.
८. क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी न तपासणे
वेळोवेळी क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहणे आवश्यक असते (दर सहा महिन्याने) म्हणजे काही चुका आढळल्यास त्या दुरुस्त करता येतात.
रिपोर्टमध्ये काही चुका असतील तर त्या लोन देणाऱ्या कंपनीला दिसतात आणि त्याचा दुष्परिणाम क्रेडिट स्कोर वर पण होतो.
तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर सुधारायचा असेल तर ते खालील पद्धतीने करता येते:
१. पेमेंट रिमाइंडर सेट करा
परतफेड न केलेल्या लोनचा क्रेडिट स्कोर वर दुष्परिणाम होतो. म्हणून वेळेवर हप्ते भरण्यासाठी रिमाइंडर सेट करणे महत्वाचे असते. हप्ते भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला दंड भरावा लागतो आणि तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो.
२. जुने क्रेडिट कार्ड टिकवून ठेवावे
तुम्ही वेळेवर बिले भरत असाल तर जुने क्रेडिट कार्ड टिकवून ठेवा. अशामुळे सशक्त क्रेडिट हिस्टरी निर्माण होते आणि क्रेडिट स्कोर चांगला राहतो.
३. शक्य असल्यास लवचिक क्रेडिट लिमिट घ्या
दिलेल्या अवधीत तुम्हाला क्रेडिटचा वापर नियंत्रित करता आला तर त्याचा चांगला प्रभाव क्रेडिट स्कोर वर होतो. कमाल मर्यादेपर्यंत वापर केल्यास स्कोर कमी होतो. म्हणून लोन देणाऱ्या कंपनीशी चर्चा करावी आणि तुमच्या खर्चाच्या आधारावर क्रेडिट लिमिट ठरवून घ्यावी.
४. दीर्घावधीचे लोन घ्या
शक्य असल्यास दीर्घावधीचा लोन निवडावा म्हणजे तुमचा हप्ता कमी होईल आणि तुम्हाला वेळेवर हप्ते भरता येतील. असे केल्याने तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल.
५. एकाच वेळी अनेक लोन घेऊ नका
कमीतकमी संख्येत लोन घ्या म्हणजे तुम्हाला त्यांची परतफेड करणे सोपे होईल. पर्याप्त पैसे नसताना तुम्ही लोन घेतले तर त्याचा दुष्परिणाम क्रेडिट स्कोर वर होतो.
मात्र, वेळेवर परतफेड केल्यास स्कोर सुधारतो.
६. विविध प्रकारचे लोन निवडा
दीर्घावधीसाठी तारण असलेले आणि अल्पावधीसाठी विना तारण लोन निवडा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारतो.
तुम्हाला बिझनेस लोन हवे असेल पण तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नाही अशी काळजी वाटत असेल तर ग्रोमोर फिनान्स कंपनीला भेट द्या, क्रेडिट स्कोरचे मूल्यांकन करून घ्या, लोनसाठी सोपा अर्ज भरा आणि हवे असलेले लोन मिळवा!