उद्योग कर्ज मिळवल्याबद्दल अभिनंदन! आता सर्वात महत्त्वाचा भाग…मिळालेल्या भांडवलाचे काय करावे?
अर्थात, सर्वात सोपा पर्याय म्हणजे व्यवसायाचा विस्तार करणे सुरू करावे. मात्र, व्यवसायाच्या उत्तम भविष्यासाठी उद्योगाची रणनीती ठरवणे जास्त श्रेयस्कर ठरते.
काही सोपी पाऊले उचलली तर तुम्हाला कमी व्याज दरात भांडवल मिळविण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात.
लघु उद्योग कर्ज मिळाल्यानातर लगेच करावयाच्या ६ गोष्टी!
कर्जाचा अर्ज मान्य झाला की लगेच करावयाच्या काही गोष्टी!
1. कर्जाच्या परतफेडीची योजना करा!
भविष्यात कर्जाच्या अर्जाला मान्यता मिळणे सोपे व्हावे म्हणून कर्जाची वेळेतच परतफेड करणे आवश्यक असते.
मासिक बजेटमध्ये पेमेंटची रक्कम जोडा किंवा व्यवसायाच्या बँक अकाऊंट मधून ऑटोमॅटिक पेमेंटची व्यवस्था करा म्हणजे कर्जाची परतफेड वेळेत होऊ शकते. परतफेड केली नाही – किंवा एखादा हप्ता चुकला – तर तुमचा क्रेडिट स्कोर व इतिहासावर दुष्परिणाम होतो.
2. मुदतीपूर्वीच कर्जाची परतफेड करण्याची संधी शोधा!
कर्जाची मुदत संपण्यापूर्वीच परतफेड करणे शक्य आहे का हे तपासून बघा. तुमच्या उद्योगाच्या कॅशफ्लो मधून कर्जाच्या मुद्दलाची परतफेड करता आली तर व्याजाचे पैसे वाचतील आणि अनुकूल क्रेडिट इतिहास देखील निर्माण होतो.
काही कर्ज देणारे मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास दंड आकारतात कारण मुदत पूर्ण होईपर्यंत त्यांना मिळणारे व्याज मिळत नाही. कर्जाच्या अटी तपासून घ्या.
3. क्रेडिट स्कोरकडे लक्ष ठेवा!
उद्योग कर्ज मिळाल्यानंतर काही महिन्याने क्रेडिट स्कोर बघा. कर्जाची समाधानकारक परतफेड केल्यास तुमचे बिजनेस क्रेडिट रेटिंग सुधारते.
कर्ज देणारे व तुमच्यात परतफेडीच्या ठरलेल्या अटींवरच क्रेडिट स्कोर अवलंबून असतो हे लक्षात ठेवा.
4. कर्ज रिफायनॅन्स करून व्याज दर कमी करा!
तुम्हाला अल्पावधीचे कर्ज मिळाले असल्यास त्याचे रूपांतर कमी व्याज दराच्या दीर्घावधीच्या कर्जात करू शकता. तुमच्या व्यवसायाची उलाढाल सतत वाढत असेल आणि क्रेडिट स्कोर सुधारत असेल तर हा उत्तम पर्याय आहे.
व्याज दर वाढण्याची अपेक्षा असल्यास बदलत्या दराच्या कर्जाचे रूपांतर निश्चित दराच्या कर्जात करा.
5. कर्ज देणार्याशी उत्तम संबंध ठेवा!
कर्ज देणार्याशी उत्तम संबंध ठेऊन वेळेवर परतफेड केल्यास तुम्हाला भविष्यात चांगल्या अटींवर कर्ज मिळू शकते.
कर्ज देणार्याने बिजनेस क्रेडिट ब्यूरोमध्ये तुमच्याबद्दल अहवाल दिल्यास तुमच्या क्रेडिट स्कोरवर सकारात्मक प्रभाव पडतो.
6. शेवटी…भांडवलाचा उपयोग हुशारीने व्यवसाय वाढवायला करा!
कर्जाच्या रकमेचा वापर काळजीपूर्वक करा. ज्या प्रकल्पात काही निष्पन्न होणार नाही अशावर भांडवलाची उधळपट्टी करू नका.
कार्यक्षम कर्मचार्यांची भरती, नवीन उपकरणांची खरेदी, टेक्नॉलजीत सुधार व नवीन प्रॉडक्ट लॉंच करण्यासाठी भांडवलाचा उपयोग करा!
लोन मिळवण्यासाठी ग्रोमोर फायनॅन्स कंपनीची ऑनलाइन प्रक्रिया सोपी आहे! तुम्ही पात्र आहात असे वाटत असेल तर इथे भेट देऊन आजच अर्ज करा!