लघु उद्योजकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असल्यास ते मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लघु उद्योग लोन. असे लोन बँकेतून (सहसा संपत्ती गहाण ठेऊन) अथवा एनबीएफसी व इतर संस्थांकडून (काहीही गहाण न ठेवता) मिळू शकतात. योग्य व्याज दर मिळवणे अतिशय महत्वाचे असते. शेवटी, लोन फेडायचे असते आणि लोनचे व्याज दर किती आहे यावर हप्त्यासाठी किती रकमेची तरतूद करावी लागेल हे ठरते. कोणत्या घटकांवर व्याज दर वलंबून असतात हे इथे वाचा! लघु उद्योजकांसाठी कमी व्याज दर असलेले लोन घेणे महत्त्वाचे असते. लघु उद्योगावर व्याज दराचा काय परिणाम होतो हे आपण बघू.
लघु उद्योगांवर व्याज दराचा काय परिणाम होतो?
लघु उद्योजक म्हणून तुम्ही घेतलेल्या कर्जावर व्याज देताच, त्याच बरोबर ग्राहकांनी तुमच्याकडून क्रेडिटवर घेतलेल्या वस्तू व सेवांवर तुम्ही व्याज आकारता. म्हणून व्याज दरात होणार्या चढ उतारामुळे तुमच्या कंपनीच्या आर्थिक रोग्यावर देखील खूप परिणाम होतो.
1. उद्योगाचे नियोजन
व्याज दर बदलल्याने लघु उद्योगाच्या विस्ताराच्या योजनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. व्याज दराचा हप्त्यावर परिणाम तर होतोच, पण त्याच बरोबर तुमच्या उद्योगासाठी निधी उपलब्ध असण्याच्या संभावने वर देखील प्रभाव पडतो. व्याज दर अधिक असले तर एकंदर कॉर्पोरेट उत्पन्न कमी होतेच, व त्याचबरोबर तुमच्या उद्योगाच्या विस्तारात देखील अडथळा येतो. त्या उलट, व्याज दर कमी होत गेले तर व्यावसायिक लोन घेणे स्वस्त होते.
२. कॅश फ्लो
लघु उद्योगांचा कॅश फ्लो मर्यादित असल्याने व्याज दर अधिक असले तर व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो. व्याज दर वाढले की लघु उद्योजकांना लोनची परतफेड करण्यासाठी अधिक पैशांची तरतूद करावी लागते.
अशाने उद्योगाला उपलब्ध असलेले उत्पन्न कमी होते व देय रकमेची परतफेड करणे अवघड होत जाते. दुर्दैवाने, व्याज दर वाढले की मालमत्तेच्या किंमती कमी होतात ज्यामुळे भांडवल उभारण्यासाठी त्यांची विक्री देखील करता येत नाही.
३. कर्ज
व्याज दरातल्या चढ-उतारामुळे उद्योगावर होणारा परिणाम हा उद्योगाने घेतलेल्या लोनची रक्कम व प्रकारावर अवलंबून असतो. फिक्स्ड अथवा निश्चित व्याज दराचा लोन असेल तर वाढत्या व्याज दराचा लघु उद्योजकांना फारसा त्रास होत नाही. परंतु बदलत्या व्याज दराचे लोन असेल तर अधिकृत दरानुसार लोनच्या व्याज दरात चढउतार झाल्याने लघु उद्योजकांना अडचण होते. बहुतांश उद्योगांना विस्तार करण्यासाठी 'सीड' अथवा मूळ भांडवल आवश्यक असते. वर्तमान आर्थिक परिस्थितीत भांडवल उभारणे आव्हानात्मक असले तरीही उच्च व्याज दर असलेले लोन घेण्यापूर्वी उद्योजकांनी काळजीपूर्वक विचार करावा. अनेकदा भांडवल उभारण्याचे पर्यायी मार्ग खूपच खर्चिक असतात. अशा परिस्थितीत तुमच्या आर्थिक स्थितीचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही इतर ठिकाणी शोध घ्यायला हवा.
कमी दरात व्यावसायिक लोन मिळवण्यासाठी काय निकष असतात?
खालील पद्धतीने तुम्हाला कमी दरात व्यावसायिक लोन मिळू शकते!
१. वैयक्तिक क्रेडिट स्कोर
पूर्वी घेतलेले खाजगी लोन तुम्ही किती विश्वासार्ह पद्धतीने फेडले हे तुमच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोरमुळे कळते. लघु उद्योजक असल्याने व्यवसायाच्या व स्वतःच्या आर्थिक बाबी वेगळ्या ठेवणे नेहमीच अवघड ठरते. तुम्ही खाजगी लोनच्या बाबतीत जबाबदारीने वागला असाल तर व्यवसायाचे लोन फेडताना पण तुमची वागणूक तशीच असेल.
क्रेडिट स्कोर उच्च असला तर कर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळतील असा संकेत मिळतो. अशाने उच्च व्याज दराने लोन देण्याची गरज नसते.
२. व्यवसायाचे वय
कंपनी किती वर्ष व्यवसायात आहे याचा व्याज दरावर मोठा परिणाम होतो. नवीन उद्योगाबद्दल कर्जदारांना पूर्ण खात्री नसते. त्या उलट अनेक वर्ष कार्यरत असलेला व्यवसाय कमी व्याज दराला पात्र ठरू शकतो.
२-३-५ वर्षे व्यवसाय टिकवला याचा अर्थ तुम्हाला लघु उद्योग चालवताना येणार्या चढउतारांना सामोरे जाता येते. व्यवसाय पुढेही चालू राहून उत्तम कामगिरी करेल व लोनचे हप्ते फेडले जातील अशी खात्री वाटते. कर्जदारांना अशा परिस्थितीत लोन देण्यात कमी धोका असल्यामुळे सुस्थापित व्यवसायांना कमी व्याज दरावर लोन मिळते.
३. व्यवसाय कुठल्या उद्योग क्षेत्रात आहे?
काही उद्योग क्षेत्रात इतरांपेक्षा अधिक जोखीम असते. त्यामुळे व्याज दर उद्योग क्षेत्रावर अवलंबून असते. तुमचा व्यवसाय त्या मनाने कमी जोखीम असलेल्या क्षेत्रात असेल तर तुम्ही कमी व्याज दराच्या लोनसाठी पात्र ठरू शकता.
लघु उद्योग लोन त्वरित मिळवण्यासाठी ग्रोमोर कंपनीची ऑनलाइन प्रक्रिया अतिशय सोपी आहे… फक्त 3 दिवस आवश्यक असतात! तुम्हाला फक्त खालील टप्पे पूर्ण करावे लागतील!
१. लोनसाठी अर्ज करा
Gromor.in संकेतस्थळाला भेट द्या आणि ऑनलाइन अर्ज भरा – कुठूनही!
२. आवश्यक कागदपत्रे सादर करा
इथे नमूद कागदपत्रे अपलोड करा. तुमची माहिती ग्रोमोर कंपनीकडे सुरक्षित राहील याची खात्री ठेवा!
३. लोनसाठी मंजूरी मिळवा
ग्रोमोरच्या ऑटोमॅटिक मूल्यांकनामुळे त्वरित मंजूरी मिळणे सहज शक्य होते!
४. लोन प्राप्त करा
मंजूरी मिळाल्यानंतर लोनची रक्कम वितरित केली जाते आणि ती तुम्हाला वापरता येते! तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी लघु उद्योग लोन शोधत आहात? आजच ग्रोमोर कंपनीशी संपर्क
साधा!