लघु उद्योग कर्जाची परतफेड करताना तुमच्या कॅश-फ्लो वर खूप दबाव पडतो. हप्ता देण्यात उशीर झाला तर इतर समस्या निर्माण होतात, जसे तुमचा क्रेडिट स्कोर कमी होणे किंवा कर्ज देणार्या व्यक्तीशी तुमचे संबंध बिघडणे!
उद्योग कर्जाचे हप्ते कमी करण्याचे उपाय!
तुमच्या उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यात बचत करण्याचे सोपे उपाय खालील प्रमाणे आहेत:
- तुमच्या उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करण्याबाबतच्या अटी व शर्ती एकदा नीट वाचा. असे केल्याने भविष्यात तुमचे हप्ते कमी होऊ शकतात. मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास दंड नसल्याची खात्री करून घ्या.
- “रिड्यूसिंग बॅलन्स” पद्धतीने व्याजाची गणना करणारी लोन कंपनी निवडा. या पद्धतीत तुमचे हप्ते कमी होत जातात आणि भविष्यात तुम्ही बचत करू शकता.
- सर्वप्रथम सर्वोच्च व्याज दराच्या कर्जाची रक्कम जमेल तितकी परत करा. मात्र तसे करताना इतर कर्जाची परतफेड उशीरा होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर इतर कर्जाची परतफेड करा. असे केल्याने भविष्यात तुमचे कर्जाचे ओझे कमी होते.
लघु उद्योग कर्जासाठी आजच ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा!