phone 02261344779

कार्यकारी भांडवलासाठी कर्ज

सोप्या शब्दात एखाद्या कंपनीने दैनंदिन खर्चासाठी घेतलेल्या कर्जाला 'कार्यकारी भांडवल कर्ज' म्हणतात. अशा प्रकारचे कर्ज घेतल्याने कंपनीला आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यात लक्ष केन्द्रित करता येते आणि वाढ्णार्‍या धंद्याला लागणारे भांडवल देखील मिळत राहते.

साधारणपणे कार्यकारी भांडवलासाठी घेतलेल्या कर्जाचा उपयोग दीर्घकालीन मालमत्तेसाठी केला जात नाही. वेतन व इतर देय रक्कम देण्यासाठी आणि अल्पकालीन आर्थिक गरजांसाठी कर्जाचा वापर केला जातो.

लघु उद्योगासाठी कार्यकारी भांडवलाचे महत्त्व लक्षात घेता, आम्ही ह्या कर्जाची रचना किमान गुंतागुंतीची पण अतिशय प्रभावी अशी केली आहे. भारतीय आर्थिक जगात उद्योजकतेसाठी उपलब्ध अमर्याद संधींचा फायदा घेण्यात तुम्हाला मदत करणे हाच आमचा उद्देश आहे.

कर्जसाठी अर्ज करा


कार्यकारी भांडवलासाठी ग्रोमोरच का निवडावे

भारतातील लघु उद्योजकांच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशाच्या आर्थिक विकासात ह्याने मोठ्या प्रमाणात मदत होईल असा आमचा विश्वास आहे.

ग्रोमोर वैज्ञानिक मूल्यांकन अल्गोरिदम आणि तंत्रज्ञान वापरुन कर्जाचे त्वरित मूल्यांकन करून कर्ज वितरित करू शकते. लघु उद्योगांना व उद्योजकांना समृद्ध करण्यासाठी झटपट, विना-तारण, आकर्षक व्याज दरात व वाजवी अटींवर कर्ज उपलब्ध करून देते.

तुम्ही कामकाजाच्या वेळेत आमच्याशी अनेक मार्गाने संपर्क साधू शकता, जसे ईमेल / फोन / व्हॉट्सअॅप / वेबसाइट चॅट इत्यादी.

आम्हाला ईमेल द्वारे info@gromor.inह्या पत्त्यावर कागदपत्रे पाठवू शकता. अथवा +91 88284 82009 वर व्हॉट्सअॅप करू शकता किंवा +91 88284 82009 वर फोन करू शकता.

कार्यकारी भांडवलाच्या कर्जासाठी ग्रोमोरकडे अर्ज करा आणि आपला व्यवसाय आत्मविश्वासाने वाढवा! कर्जसाठी अर्ज करा