phone 02261344779

विस्तार भांडवल कर्ज

विस्तार भांडवल कर्ज हे व्यवसायाची वाढ व विस्तार करण्यासाठी घेतला जातो. एखाद्या कंपनीच्या व्यवसायात मूलभूत परिवर्तन होत असल्यास विस्तार भांडवल कर्ज उपयुक्त ठरते.

अशा प्रकारचे कर्ज घेतल्याने लघु उद्योगांना आपल्या विकास व विस्ताराकडे लक्ष केन्द्रित करून भांडवल वाढवण्यासाठी मदत मिळते. हे कर्ज दीर्घकालीन संपत्तीमध्ये आणि व्यवसायाच्या वाढीला सहाय्यक ठरणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूकीसाठी वापरले जाऊ शकते.

विस्तार भांडवल कर्ज लघु उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते कारण त्याच्या मदतीने मध्यम व दीर्घकालीन योजनांना आर्थिक स्थैर्य मिळते. भारतीय उद्योग क्षेत्रात व्यवसायाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत आणि त्याचा भाग होण्याची तुमची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

कर्जसाठी अर्ज करा


विस्तार भांडवलासाठी ग्रोमोरच का निवडावे

विस्तार भांडवल नसल्यास लघु उद्योग दीर्घकाळासाठी चालू शकत नाहीत. भांडवल नसल्याने व्यवसायातील गुंतवणूक (मालमत्ता आणि मनुष्यबळ दोन्ही) व विकास कल्पनांचे नुकसान होते. पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे भारतीय लघु उद्योजकांची वाढ थांबू नये म्हणून व्यवसायाच्या विस्तारासाठी आर्थिक मदत करणे हेच ग्रोमोरचे ध्येय आहे.

ग्रोमोर वैज्ञानिक मूल्यांकन अल्गोरिदम आणि तंत्रज्ञान वापरुन कर्जाचे त्वरित मूल्यांकन करून कर्ज वितरित करू शकते. लघु उद्योगांना व उद्योजकांना समृद्ध करण्यासाठी झटपट, विना-तारण, आकर्षक व्याज दरात व वाजवी अटींवर कर्ज उपलब्ध करून देते.

तुम्ही कामकाजाच्या वेळेत आमच्याशी अनेक मार्गाने संपर्क साधू शकता, जसे ईमेल / फोन / व्हॉट्सअॅप / वेबसाइट चॅट इत्यादी.

आम्हाला ईमेल द्वारे info@gromor.inह्या पत्त्यावर कागदपत्रे पाठवू शकता. अथवा +91 88284 82009 वर व्हॉट्सअॅप करू शकता किंवा +91 88284 82009 वर फोन करू शकता.

विस्तार भांडवल कर्जासाठी ग्रोमोरकडे अर्ज करा आणि आपला व्यवसाय आत्मविश्वासाने चालवा! कर्जसाठी अर्ज करा