एक लघु उद्योजक म्हणून तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला अनेकदा बँकेला भेट द्यावी लागत असेल. पण यामुळे तुमचा खूप वेळ वाया जाऊ शकतो. नेट-बँकिंगमुळे बँकेचे सर्व व्यवहार अगदी सोप्या पद्धतीने करता येतात, व त्यासाठी फक्त एक इंटरनेट कनेक्शन असलेले साधन आवश्यक असते. तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये बसून तुम्हाला आरामात सर्व उलाढाली करता येतात.
याचा वापर करून तुम्हाला वेळ वाचवता येतो व संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवता येते.
लघु उद्योजकांनी नेट बँकिंग का वापरावे याची ४ कारणे!
१. नेट बँकिंग सुविधा वापरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही
कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता लघु उद्योजकांना नेट बँकिंग सुविधा वापरता येते. बँकेत खाते धारकाचे खाते असले की नेट बँकिंग सुविधा वापरता येते.
२. कुठूनही वापरता येते
नेट बँकिंगमुळे तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती कधीही कुठेही पाहता येते. व्यवसाय मालक कामासाठी प्रवास करत असेल किंवा दिवसातील कोणत्याही वेळी उलाढाल करता येते. फक्त इंटरनेट कनेक्शन, तुमचे युझरनेम आणि पासवर्ड व स्मार्टफोन/ टॅब्लेट/ लॅपटॉप उपलब्ध असतील तर नेट बँकिंग वापरता येते.
३. पेमेंटचे वेळापत्रक ठरवा आणि बिलांचे व्यवस्थापन करा
नेट बँकिंग वापरुन पुरवठादार आणि इतरांना पेमेंट करण्याचे वेळापत्रक ठरवता येते. भाडे, वेतन आणि इतर पेमेंट पण निश्चित दिवशी द्यायचे असे ठरवता येते. तुम्ही ठरवलेल्या दिवशी ती रक्कम आपोआप तुमच्या खात्यातून ठरवलेल्या खात्यात जमा होते. असे केल्याने कोणतेही पेमेंट उशीरा होणार नाही आणि नियमितपणे होणार्या खर्चांसाठी पेमेंट करणे सोपे होते.
४ पैसे पाठवणे
नेट बँकिंगचा ‘मनी ट्रान्सफर’ (पैसे पाठवणे) पर्याय वापरुन कधीही कुठेही कोणालाही त्वरित पैसे पाठवता येते. बँक शाखेला भेट न देता तुमच्या एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवता येतात.
नेट बँकिंगच्या या सर्व फायद्यांमुळे कोणत्याही व्यवसायाच्या यशासाठी ते अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला विनातारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!