तुम्ही लघु उद्योजक असाल आणि उद्योगाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन मशीन विकत घेण्यासाठी किंवा नवीन कर्मचारी नियुक्त करण्यासाठी किंवा वर्किंग कॅपिटल अथवा इन्व्हेंटरीसाठी लोन हवे असेल तर त्याची किंमत मोजावी लागते. ती किंमत म्हणजे लोनवरचे व्याज. लोन देणारी कंपनी आणि लोनची रक्कम यावर व्याज दर ठरते. म्हणून अर्जदाराने लोन देणाऱ्या कंपनीशी व्याजदराबाबत चर्चा करावी.
बिझनेस लोनसाठी असलेल्या व्याजदरावर खालील घटकांचा प्रभाव पडतो:
१. लोन देणाऱ्या संस्थेचा प्रकार
बँक, एनबीएफसी, सरकारी योजना, आणि इतर अनौपचारिक लोन देणाऱ्या संस्थांकडून लोन मिळते. लघु उद्योगांना लोन देताना संस्थेला किती धोका वाटतो यावर व्याजदर अवलंबून असतो.
बँक आणि एनबीएफसी यांचे व्याजदर १३-२१% असतात. मात्र लोनचा अवधी आणि रक्कम यामुळे व्याज दर बदलू शकतो.
२. लोनची रक्कम
लोनच्या रकमेवर व्याजदर अवलंबून असतो. साधारणपणे मोठ्या रकमेसाठी अधिक व्याजदर आकारला जातो आणि छोट्या रकमेसाठी कमी व्याजदर आकारला जातो. लोनची रक्कम एकदा ठरली की ती बदलता येत नाही, पण व्याज दर मात्र बदलू शकतो. व्याज परिगणित करण्यासाठी वापरलेली पद्धत हे व्याजदर बदलण्याचे एक कारण असू शकते.
लोन देणाऱ्या कंपनीशी या पद्धतीबाबत पण वाटाघाटी करता येतात.
३. लोनचा प्रकार
लोनचा प्रकार पण महत्वाचा असतो आणि त्यामुळे व्याजदर बदलू शकतो. तारण ठेवून लोन, विना तारण लोन, वर्किंग कॅपिटल लोन किंवा इतर लोन यासाठी वेगवेगळे व्याजदर आकारले जातात.
सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे विविध कंपन्या कोणत्या प्रकारचे लोन देतात आणि किती व्याज दर आकारतात याची तुलना करा आणि सगळ्यात कमी व्याजदर आकारणारी कंपनी निवडा.
४. उद्योगाची आर्थिक परिस्थिती
लोनच्या व्याजदरावर प्रभाव पाडणारा अजून एक घटक म्हणजे तुमच्या उद्योगाची आर्थिक परिस्थिती. म्हणून उद्योगाचे आर्थिक अभिलेख जसे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट इ व्यवस्थित ठेवले पाहिजे.
ही सर्व कागदपत्रे तयार असली तर लोन देणारी कंपनी व्याज दर कमी करण्याची शक्यता असते.
५. लोनचा अवधी
लोनच्या अवधीचा व्याज दरावर फरक पडतो. लोनचा अवधी अधिक असेल तर लोन देणाऱ्या कंपनीशी व्याज दराबाबत वाटाघाटी करता येतात.
६. लोनच्या परतफेडीचे वेळापत्रक
लघु उद्योजकाकडे लोनची परतफेड करण्याचे अनेक पर्याय असतात.
रिड्युसिंग बॅलन्स संकल्पनेच्या आधारावर (म्हणजे किती मुद्दल अजून परत केलेली नाही याच्या आधारावर) व्याज दर परिगणित करता येतो. या पद्धतीत व्याज अधिक असले तरी उपलब्ध रकमेत लवचिकता असते.
परतफेड करण्याची अजून एक पद्धत म्हणजे मुद्दल लवकरात लवकर परत करणे. किती लवकर मुद्दल परत केली जाते आणि व्याज परिगणित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते यावर पण व्याज दर अवलंबून असते.
शेवटची पद्धत म्हणजे फ्लॅट रेट पद्धत. या पद्धतीत किती मुद्दल अजून परत करायची आहे याचा काही प्रभाव पडत नाही, फक्त लोनची सुरुवातीची रक्कम विचारात घेतली जाते आणि व्याज परिगणित केले जाते. अशा पद्धतीत हप्त्याची रक्कम वाढू शकते.
लोनची परतफेड करण्याच्या पद्धतीवर बरेच काही अवलंबून असते म्हणून योग्य पद्धत निवडली पाहिजे.
७. लोनसाठी कोणती मालमत्ता तारण ठेवली आहे
लोन घेताना मालमत्ता तारण ठेवली असेल आणि लोनची परतफेड वेळेवर केली गेली नाही तर ती जप्त होऊ शकते. तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्य अधिक असेल तर तुम्ही व्याजदराबाबत वाटाघाटी करू शकता.
८. क्रेडिट स्कोर
कर्जाच्या व्याज दरावर तुमच्या क्रेडिट स्कोरचा पण प्रभाव पडतो. लोनची परतफेड करण्यासंबंधी तुमची आणि उद्योगाची विश्वसनीयता क्रेडिट स्कोर वरून कळते.
जितका क्रेडिट स्कोर अधिक असेल तितका व्याज दर कमी होऊ शकतो.
क्रेडिट स्कोरमध्ये भूतकाळात घेतलेले लोन, त्यांची परतफेड केली का, क्रेडिट कार्डची बिले भरली का, सध्या किती लोन घेतलेले आहे इ. माहिती मिळते. बिझनेस लोन मंजूर करण्यापूर्वी लोन देणारी कंपनी हे सर्व तपासून पाहते.
व्याज दर बदलू शकतात आणि त्याचा प्रभाव तुमच्या उद्योगाच्या आर्थिक स्थितीवर पडू शकतो.
लघु उद्योगावर व्याज दराचा खालील प्रभाव पडू शकतो:
१. उद्योगाची वाढ
व्याज दर बदलल्यास उद्योगाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. व्याज दर बदलल्याने लोनच्या परतफेडीवर आणि अतिरिक्त लोन मिळण्याच्या संभावनेवर परिणाम होऊ हाकतो.
म्हणजेच, व्याजदर वाढल्याने उद्योगाचे उत्पन्न कमी होऊ शकते आणि वाढीचा दर प्रभावित होऊ शकतो.
२. कॅश फ्लो
उद्योगाचा कॅश फ्लो मर्यादित असेल तर उच्च व्याज दराचा उद्योगावर दुष्परिणाम होऊ शकतो. कारण व्याज दर बदलले आणि वाढले तर लोनची परतफेड करण्यासाठी लागणारी अतिरिक्त रक्कम उद्योजकाकडे उपलब्ध असायला पाहिजे. अशामुळे उद्योगाचे उत्पन्न आणि मालमत्तेचे मूल्य कमी होते व गरज पडल्यास ते विकणे अवघड होते.
३. कर्ज
उद्योगाने अनेक लोन घेतले असतील तर बदलणाऱ्या व्याज दराचा उद्योगावर खूप प्रभाव पडतो. बदलणाऱ्या व्याज दरावर घेतलेले लोन असतील तर उद्योगापुढे अडचण निर्माण होऊ शकते.
म्हणून उच्च व्याजदरावर लोन घेण्यापूर्वी प्रत्येक उद्योजकाने वरील घटकांचा विचार केला पाहिजे.
कमी व्याज दरावर लोन कसे मिळवावे किंवा कमी व्याज दरावर लोन मिळवण्यासाठी निकष:
१. क्रेडिट स्कोर (वैयक्तिक)
भूतकाळात वैयक्तिक लोनबाबत तुमचे वर्तन कसे होते हे क्रेडिट स्कोर वरून कळते. तुम्ही जबाबदारीने वैयक्तिक लोन परत केले असेल तर उद्योगाचे लोन पण तुम्ही जबाबदारीने फेडण्याची अपेक्षा असते.
अधिक क्रेडिट स्कोर असल्यास लोन देणाऱ्या कंपनीचे चांगले मत निर्माण होते कारण त्यांना विश्वास वाटतो की त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील.
२. उद्योग किती वर्षांपासून सुरु आहे
उद्योग किती वर्षांपासून सुरु आहे याचा प्रभाव पण व्याजदरावर पडतो. नवीन उद्योग किंवा स्टार्टअप हे लोन देणाऱ्या कंपनीसाठी धोकादायक ठरू शकते. या उलट स्थापित उद्योग असेल तर कमी व्याज दरावर लोन मिळू शकते.
उद्योग ३ ते ५ वर्षांपासून सुरु असेल तर असे समजले जाते की उद्योगाने चढ उतार पाहिले आहेत आणि त्यात टिकून राहण्याची क्षमता आहे. तसेच अनेक वर्षांपासून उद्योग सुरु असेल तर त्यात लोनची परतफेड करण्याची क्षमता असते.
३. उद्योगाचे कार्यक्षेत्र
उद्योग कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे हे पण महत्वाचे असते. लोन देणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने काही उद्योग क्षेत्र अधिक धोकादायक असतात. म्हणून तुमचा उद्योग कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे याचा प्रभाव पण व्याज दरावर पडतो.
तुमचा लघु उद्योग असेल आणि तुम्हाला वाजवी व्याजदरावर रु १० लाखापर्यंत विना तारण लोन हवे असेल तर ग्रोमोर फिनान्स कंपनीला संपर्क करा!