सिबिल अहवालात कर्जदाराची आर्थिक परिस्थिती आणि वर्तणूक दिसते आणि कोणतेही कर्ज मंजूर होण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा असतो. चांगला सिबिल स्कोअर असलेल्या व्यक्तीचे कर्ज पटकन मंजूर होते कारण अहवालावरून कर्जदार जबाबदार आहे आणि पात्र आहे हे लक्षात येते.
उशीरा पेमेंट केल्यास सिबिल स्कोर वर काय प्रभाव पडतो?
देय रक्कम उशीरा भरल्यास पेमेंट हिस्टरी वर दुष्प्रभाव पडतो. पेमेंट हिस्टरी हा सिबिल अहवालाचा महत्त्वाचा भाग असतो. सिबिल अहवालावर कोणत्या प्रमाणात प्रभाव पडेल यासाठी किती दिवस उशीरा पेमेंट केले इत्यादी घटक विचारात घेतले जातात. एक दिवस उशीरा पेमेंट केल्यास काही फरक पडत नाही. कर्जदाराने भूतकाळात वेळेवर पेमेंट केले असेल तर कर्ज देणारे साधारणपणे ३० दिवस उशीर झाल्यानंतरच त्याची माहिती सिबिलकडे पाठवतात.
३० ते ६० दिवस उशीरा देय रक्कम भरल्यास साधरणपणे सिबिल स्कोर वर परिणाम होत नाही. एकदा पेमेंट केले की सिबिल अहवालात ते दिसत नाही. मात्र देय रक्कम भरायला अनेकदा उशीर झाला तर तुमच्या अहवालावर नक्कीच प्रभाव पडतो. ९० दिवसापेक्षा अधिक उशीर झाला तर पुढील सात वर्षापर्यंत अहवालावर लक्षणीय दुष्प्रभाव पडतो.
भूतकाळात तुम्ही वेळेवर देय रक्कम भरली असली तरीही एकही हप्ता भरण्यास उशीर झाला तर तुमच्या नावलौकिकावर दुष्परिणाम होऊन भविष्यात तुम्हाला लोन मिळणे अवघड होऊ शकते.
उशीरा पेमेंट होणार नाही याची खात्री कशी करावी?
चांगला सिबिल अहवाल हवा असेल तर तुमचे देणे तुम्ही वेळेवर दिले पाहिजे.
तुम्हाला देय तारीख लक्षात न राहण्याची भीती वाटत असेल तर तुमच्या मोबाइल वर तुम्ही रिमाइंडर सेट करू शकता. कर्ज देणार्या कंपन्या आठवण करून देण्यासाठी ऑनलाइन अलर्ट किंवा मोबाइलवर एसएमएस पण पाठवतात.
कर्जदार ऑटोपे पर्याय निवडू शकतो ज्यात हप्त्याच्या निर्धारित तारखेला बँक खाते किंवा क्रेडिट कार्डमधून तेवढी रक्कम वजा केली जाते. तुम्ही विसराळू असाल तर ही पद्धत तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या तारखेला तुमच्या खात्यात पर्याप्त पैसे असले पाहिजे. पैसे पर्याप्त नसतील तर तुम्हाला अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो.
कर्जदार मासिक हप्त्याऐवजी दर आठवड्याला हप्ते भरू शकतो. ही रक्कम तुलनेने लहान असल्यामुळे ती भरणे थोडे सोपे होईल आणि त्याच बरोबर वेळेवर लोन फेडण्यात पण मदत होईल.
तुम्हाला बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स लघु उद्योगांना १० लाखापर्यंत विना तारण कर्ज देते.