नामनिर्देशन (नॉमिनेशन) सुविधा काय असते?
खाते धारकाची मृत्यू झाल्यानंतर खात्यातील रक्कम कोणाला दिली पाहिजे हे ठरवण्याचा हक्क म्हणजे नामनिर्देशन. उत्तराधिकार प्रमाणपत्र, प्रशासन पत्र किंवा कोर्टाचे आदेश नसतानासुद्धा बँक खात्यातील पैसे नामनिर्देशित व्यक्तीला देऊ शकते.
सर्व प्रकारच्या डिपॉझिट खात्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असते. एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींची नावे नामनिर्देशित करता येतात. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने डिपॉझिट केल्यास त्याच्या वतीने कायदेशीररित्या हक्कदार असलेल्या व्यक्तीचे नाव नामनिर्देशित व्यक्ती म्हणून होते. डिपॉझिट जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत हे नाव कायम राहते.
नामनिर्देशित व्यक्ती म्हणून एकाच व्यक्तीचे नाव जोडता येते. पण सामान्य संमती असल्यास २ व्यक्तींची नावे पण जोडता येतात.
खातेधारक जीवंत असेपर्यंत नामनिर्देशन कधीही रद्द करता येते.
नामनिर्देशन कसे जोडता येते?
-
डीए-१ अर्ज भरून सिंगल किंवा जॉइंट खात्यासाठी नामनिर्देशन करता येते.
-
सर्व प्रकारच्या बँक खात्यांसाठी हा अर्ज वापरता येतो, जसे सेविंग खाते, रिकरिंग डिपॉझिट खाते, फिक्स्ड डिपॉझिट खाते, आणि करंट खाते.
-
खाते उघडताना किंवा नंतर कधीही हा नामनिर्देशन अर्ज भरून बँकेत सादर करता येतो.
-
बँकेच्या संकेतस्थळावरून हा अर्ज डाऊनलोड करता येतो. खाते धारकाचे तपशील, डिपॉझिटचे तपशील आणि नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील भरणे आवश्यक असते. खात्याच्या सर्व खातेधारकांनी त्यावर सही करणे आवश्यक असते.
-
अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने नामनिर्देशन केल्यास त्याच्या पालकाचे तपशील पण अर्जात भरावे लागतात. पालक प्रौढ असायला पाहिजे, आणि खातेधारकाची मृत्यू झाल्यानंतर अल्पवयीन व्यक्ती प्रौढ होईपर्यंत खात्यातील पैसे पालकाला दिले जातील.
नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील कसे बदलावे:
-
विद्यमान नामनिर्देशन बदलायचे असल्यास तुम्हाला डीए-३ अर्ज भरून सादर करावा लागेल. सादर केलेले नामनिर्देशन नंतर कधीही रद्द करण्यासाठी डीए-२ अर्ज भरता येतो.
-
नामनिर्देशन रद्द करण्यासाठी अर्ज भरला असल्यास त्वरित नवीन नामनिर्देशन करण्यासाठी डीए-१ अर्ज भरणे चांगले असते.
-
हे अर्ज भरून नामनिर्दशन कितीही वेळा रद्द करता येते किंवा बदलता येते.
-
मात्र कोणताही अर्ज सादर केल्यास बँकेकडून लिखित पोचपावती घेणे महत्त्वाचे असते.
-
भविष्यात वाद उद्भवल्यास या अर्जांची प्रत जवळ असणे चांगले. मूळ बँक खात्यात कोणतेही नाव जोडले गेले किंवा काढले गेले तर सर्व खातेधारकांनी नामनिर्देशन अर्जावर सही केली आहे याची खात्री करावी.
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला विनातारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!