वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशन (डब्ल्यूसीओ) यांनी बहुपयोगी आंतरराष्ट्रीय उत्पादन कोड विकसित केला आहे ज्याला एचएसएन (हार्मोनाइझ्ड कोमोडिटी डिस्क्रिप्शन अँड कोडिंग सिस्टम) म्हणतात. जीएसटी सुरू झाल्यामुळे एकसमान वर्गीकरण विकसित करण्याची गरज निर्माण झाली, आणि म्हणून भारताने उत्पादनांच्या वर्गीकरणासाठी हार्मोनाइझ्ड सिस्टम वापरायला सुरू केली.
एचएसएन वापरल्यामुळे जीएसटी जागतिक पातळीवर स्वीकृत होईल आणि अधिक पद्धतशीर प्रणाली म्हणून ओळखली जाईल. यामुळे कस्टम्स आणि व्यवसाय प्रक्रिया सोप्या होतील आणि परिणामतः आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याचा खर्च कमी होईल.
एचएसएन कोणाला लागू होतो?
जीएसटी अंतर्गत, एचएसएन कोड बहुतांश उद्योगांना लागू होतो. प्रत्येक उद्योगाला मागील वर्षाच्या उलाढाली आणि उद्योगाचा प्रकार (म्हणजे आयात किंवा निर्यात) यावर आधारित उत्पादनांसाठी/वस्तूंसाठी दोन, चार किंवा आठ अंकी एचएसएन कोड द्यावा लागतो.
उलाढालीवर आधारित एचएसएन कोड खालील प्रमाणे वापरले जातात:
-
रु १.५ कोटी पेक्षा कमी एकूण उलाढाल असलेल्या उद्योगांना आपल्या उत्पादनांसाठी एचएसएन कोड वापरण्याची आवश्यकता नसते.
-
रु १.५ कोटी पेक्षा अधिक आणि रु ५ कोटी पेक्षा कमी एकूण उलाढाल असलेल्या उद्योगांना आपल्या उत्पादनांसाठी दोन अंकी एचएसएन कोड वापरणे आवश्यक असते.
-
रु ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक एकूण उलाढाल असलेल्या उद्योगांना आपल्या उत्पादनांसाठी चार अंकी एचएसएन कोड वापरणे आवश्यक असते.
-
आयात/निर्यात करणारा उद्योग असेल तर आठ अंकी एचएसएन कोड वापरणे आवश्यक असते कारण जीएसटी प्रणालीला आंतरराष्ट्रीय मानक आणि पद्धतींचे पालन करावे लागते.
तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला कर्ज हवे असल्यास, वाजवी व्याज दरात आणि त्वरित कर्ज देणार्या ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!