जीएसटी रजिस्ट्रेशन कॅन्सल केल्यानंतर करदात्याला जीएसटी भरावे लागत नाही व जीएसटी आकारता पण येत नाही. काही व्यवसायांसाठी जीएसटी रेजिस्ट्रेशन अनिवार्य असते व कॅन्सल केल्यास अपराध समजला जातो व मोठा दंड भरावा लागू शकतो.
करदात्याने (उलाढाल वीस लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास अथवा इतर कारणांमुळे) जीएसटी कॅन्सल करण्यासाठी अर्ज केल्यास, किंवा करदात्याच्या कायदेशीर वारसांनी (करदात्याचे निधन झाले असल्यास) अर्ज केल्यास किंवा टॅक्स ऑफिसर जीएसटी रेजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतात.
जीएसटी रेजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असते:
उलाढाल वीस लाखापेक्षा कमी असल्यास जीएसटी रेजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे:
१. जीएसटी वेबसाइट https://services.gst.gov.in/services/login वर लॉगिन करा आणि ‘कॅन्सलेशन ऑफ प्रोविजनल रजिस्ट्रेशन’ वर क्लिक करा.
२. तुमच्या व्यवसायाचे जीएसटीआयइन नंबर व नाव कॅन्सलेशन पानावर दिसेल. तुम्हाला जीएसटी कॅन्सल करायचे कारण द्यावे लागेल.
३. चालू महिन्यात तुम्ही कोणते टॅक्स इन्व्हॉईस जारी केले आहेत याबाबत तुम्हाला विचारले जाईल.
४. तुम्ही व्यवसायाचे मालक असाल किंवा व्यवसाय भागीदारीत असल्यास अधिकृत स्वाक्षरी करणारे, ठिकाण इत्यादीचे तपशील भरून ईवीसी सह सादर करावे लागतील. एलएलपी व कंपन्यांना डीएससी वापरुन साइन इन करणे आवश्यक असते.
टीप: टॅक्स इन्व्हॉईस जारी केले नसतील तरच वरील प्रक्रिया लागू होते. टॅक्स इन्व्हॉईस जारी केले असल्यास करदात्याला जीएसटी फॉर्म आरईजी-१६ भरणे आवश्यक असते.
जीएसटी कॅन्सल करण्याच्या इतर प्रक्रिया:
वरील प्रक्रिया ज्यांना करणे शक्य नसते त्यांनी जीएसटी कॅन्सल करण्यासाठी जीएसटी आरईजी १६ अर्ज भरावा. मृत करदात्याच्या वारसांनी देखील खालील प्रक्रियेचे पालन करावे:
१. जीएसटी कॅन्सल करण्यासाठी जीएसटी आरईजी १६ अर्ज भरावा. कॅन्सल करायचा अर्ज ज्या दिवशी सादर केला जाईल त्या दिवशीचे स्टॉक मधील इनपुट, अर्ध-तयार माल, पूर्ण तयार मालाचे तपशील, थकबाकी व पेमेन्टचे तपशील फॉर्म मध्ये भरणे गरजेचे असते.
२. कॅन्सल करण्यासाठी अर्ज केल्यानंतर तीस दिवसात अधिकृत अधिकारी कॅन्सल करण्याचे आदेश जीएसटी आरईजी-१९ द्वारे जारी करतात. अधिकाऱ्याने ठरविलेल्या तारखेपासूनच कॅन्सलेशन लागू होते व करदात्याला सूचित केले जाते.
जीएसटी कॅन्सल करण्यासाठी टॅक्स अधिकाऱ्याने करायची प्रक्रिया:
१. एखाद्या व्यक्तीची नोंदणी कॅन्सल करण्यासाठी अधिकृत अधिकार्यांना वाजवी कारण सापडले तर ते करदात्याला जीएसटी आरईजी-१७ प्रारूपात कारणे दाखवा नोटीस पाठवतात.
२. नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत करदात्याने आरईजी-१८ प्रारूपात आपले रेजिस्ट्रेशन का कॅन्सल होऊ नये याचे उत्तर देणे अपेक्षित असते.
३. समाधानकारक उत्तर मिळाल्यास अधिकारी जीएसटी आरईजी-२० प्रारूपात निर्देश देतात.
४. रेजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी पर्याप्त कारण असले तर अधिकारी जीएसटी आरईजी-१९ प्रारूपात निर्देश देतात. नोटीसचे उत्तर ज्या तारखेचे आहे त्यानंतर तीस दिवसात ही ऑर्डर पाठविण्यात येते.
तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला कर्ज हवे असल्यास, वाजवी व्याज दरात आणि त्वरित कर्ज देणार्या ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!