तुम्ही लघु उद्योजक असाल तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल. अशा वेळी लोन घेणे हा सर्वोत्तम उपाय ठरतो. मात्र कोणत्या कंपनीकडून लोन घ्यायचे हे ठरवणे सगळ्यात महत्वाचे असते. यासाठी बाजारात कोणत्या प्रकारच्या कंपन्या लोन देतात, कोणत्या प्रकारचे लोन उपलब्ध आहेत, त्यांचे पात्रता निकष काय आहेत, इतर अटी आणि शर्ती कोणत्या आहेत, किती व्याज दर आहे इ याबाबत माहिती शोधावी.
बँक लघु उद्योगांना लोन देते पण त्यांचे पात्रता निकष पूर्ण केले पाहिजे, त्यांना अनेक कागदपत्रे आवश्यक असतात, आणि कर्जाची प्रक्रिया पूर्ण करायला खूप वेळ लागतो.
एनबीएफसी कंपन्या लघु उद्योगांना लोन देतात, पण त्यांचे पात्रता निकष आणि अटी व शर्ती बँकांपेक्षा वेगळ्या असतात. एनबीएफसी कंपन्यांची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी असते, त्यांना खूप कमी कागदपत्रे आवश्यक असतात, आणि अल्पावधीत लोनची रक्कम मिळते, कधीकधी तर ३ दिवसातच मिळते.
तुम्हाला त्वरित आर्थिक मदत हवी असेल तर एनबीएफसी कंपन्या तुम्हाला खूप मदत करू शकतात, व तुमच्या व्यासवायावर परिणाम होणार नाही.
तुम्हाला त्वरित लोन हवे असेल तर लोन देणाऱ्या कंपनीचे पात्रता निकष तुम्ही पूर्ण करता आणि तुमची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत याची खात्री करा म्हणजे तुमचा अर्ज नामंजूर होणार नाही.
त्वरित मिळणारे सर्वोत्तम लोन कसे मिळवायचे?
लोन देणाऱ्या कंपनीचे पात्रता निकष, लोनची परतफेड करण्याचे निकष, व्याजदर, कंपनी कमाल किती लोन देते आणि इतर अटी व शर्ती यांच्याकडे लक्ष द्या.
एनबीएफसी कंपनीकडून लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वसाधारणपणे खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतात:
- अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे
- बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
- व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
- अर्जदाराचे क्रेडिट स्कोर किमान ७५० असावे. लोन देणाऱ्या कंपन्या ७५० ते ९०० स्कोर चांगला आहे असे मानतात, आणि तुमचा लोन अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
एनबीएफसी कंपनीकडून त्वरित लोन हवे असेल तर खालील कागदपत्रे आवश्यक असतात:
- मालकाचे पॅन कार्ड
- मालकाचे आधार कार्ड
- मागच्या १२ महिन्याचे बँक स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)
- मागच्या २ वर्षाचे आयकर रिटर्न (व्यवसायाचे आणि वैयक्तिक)
- नवीनतम बॅलेन्स शीट आणि पी&एल (तात्पुरते)
- नवीनतम ऑडिट केलेले बॅलेन्स शीट आणि पी&एल
- गुमास्ता किंवा दुकाने आणि आस्थापना परवाना
- जीएसटी रजिस्ट्रेशन पावती
- जीएसटी पावती/चलन
तुम्ही लोनसाठी अर्ज केल्यास तो नामंजूर होऊ नये याची खात्री करण्यासाठी तुम्ही खालील केले पाहिजे
१. तुम्ही डिफॉल्ट केला आहे असे तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये दिसते
चांगला क्रेडिट स्कोर ठेवणे महत्वाचे असते, व त्याच बरोबर सिबिल रिपोर्ट पण तेवढाच महत्वाचा असतो. तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये असे आढळले की तुम्ही भूतकाळात डिफॉल्ट केले आहे किंवा परतफेड करण्यात उशीर झाला आहे, तर तुमचा अर्ज नामंजूर होण्याची शक्यता वाढते. तसेच क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्ही खूप कर्ज घेतले आहे असे आढळले तर लोन देणारी कंपनी तुमच्या अर्जाचा विचार करणार नाही.
चांगले क्रेडिट रिपोर्ट टिकवून ठेवले आणि वेळेवर लोनची परतफेड केली की तुमचा लोनचा अर्ज कधीही नामंजूर होणार नाही.
२. कंपनी नवीन असताना तुम्ही अर्ज केला तर
लोन देणाऱ्या कंपनीला असे वाटले की तुमचा व्यवसाय नवीन आहे आणि व्यवसायात विक्री उलाढाल दिसत नाही आहे तर तुमचा अर्ज नामंजूर केला जाईल. कारण ज्या कंपन्या त्वरित लोन देतात त्यांना परतफेड पण लवकर हवी असते, आणि म्हणून व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सशक्त आहे हे सिद्ध करणे महत्वाचे असते.
३. इतर कोणाच्या लोनसाठी तुम्ही गॅरंटर असाल तर
तुम्ही इतर कोणासाठी गॅरंटर असाल तर तुम्ही खात्री केली पाहिजे की लोन घेणाऱ्या व्यवसायाला त्या लोनची संपूर्ण परतफेड करता येईल एवढा आर्थिक दृष्टया सशक्त व्यवसाय आहे. कारण व्यवसायाला लोनची परतफेड करता आली नाही तर तुमच्या क्रेडिट रिपोर्टला पण धोका निर्माण होतो आणि रिपोर्टमध्ये नकारात्मक टिप्पणी जोडल्या जाते.
लोनसाठी अर्ज करताना काय नमूद करावे:
१. तुमची आवश्यकता स्पष्टपणे सांगा
व्यवसायासाठी किती रक्कम आवश्यक आहे आणि रकमेचा उपयोग कसा केला जाईल याचे तपशील सांगावे म्हणजे लोन देणाऱ्या कंपनीला तुमच्या योजना समजतील.
तपशील दिल्याने लोन देणाऱ्या कंपनीला सिद्ध करून दाखवता येईल की तुम्ही वेळेवर लोनची परतफेड करू शकता.
२.तुमचा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे हे सांगा
तुमचा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे हे सांगा, जसे: खाजगी कंपनी, भागीदारी कंपनी, सार्वजनिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इ.
याशिवाय काही लोन देणाऱ्या कंपन्या व्यवसायाचे टर्नओव्हर, प्रॉफिट&लॉस स्टेटमेंट, व्यवसाय मालकाचे तपशील पण मागतात.
म्हणून प्रथम निवडलेल्या एनबीएफसी कंपनीशी संपर्क साधून पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे समजून घ्या आणि मग अर्ज करायची प्रक्रिया सुरु करा.
३. तुम्हाला कोणत्या प्रकारची आर्थिक मदत हवी आहे याबाबत स्पष्टता असावी
तुम्हाला कोणत्या प्रकारची आर्थिक मदत हवी आहे याबाबत स्पष्टता असावी. काही वेळेस असे होते की कोणतीही पूर्वकल्पना नसताना अनिवार्य खर्च निर्माण होतात. अशा वेळी, त्वरित मिळणारे लवचिक लोन (ज्याचे धोरण थोडे बदलता येणारे असेल) हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
तुमच्या व्यवसायासाठी त्वरित लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनान्स कंपनीला संपर्क करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. ग्रोमोर फायनान्स कंपनी वाजवी व्याज दरावर लोन देते आणि रक्कम तीन दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत मिळते.