प्रत्येक व्यवसाय मालकापुढे कधीतरी लोन घेण्याची वेळ येते. कधीकधी व्यवसाय पुढे नेण्यासाठी लोन घेणे महत्वाचे ठरते. लोन मिळवण्यासाठी व्यवसाय मालकाने लोन देणाऱ्या कंपनीकडे अर्ज सादर करायचा असतो.
लोन मिळवण्यासाठी व्यवसाय मालकाने बाजारातील लोन देणाऱ्या विविध कंपन्यांची माहिती, त्यांचे पात्र निकष, इतर अटी आणि शर्ती शोधाव्या.
लोन देणाऱ्या प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे पात्रता निकष असू शकतात, आणि व्यवसाय मालक ज्या कंपनीचे निकष पूर्ण करू शकतो ती कंपनी त्याने निवडावी. बहुसंख्य लोन देणाऱ्या कंपनीचे पात्रता निकष सारखेच असतात
प्रत्येक लोन देणाऱ्या कंपनीचे काही मूलभूत पात्रता निकष खालील प्रमाणे असतात:
१.व्यवसायाचे टर्नओव्हर
लोनसाठी पात्र असायला उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
२.अर्जदाराचे वय
अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
३. व्यवसाय किती वर्ष सुरु आहे
व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
४. क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट हिस्टरी
क्रेडिट स्कोअर एक तीन अंकी संख्या असते ज्याचे मूल्य ७५० – ९०० याच्यामध्ये असल्यास स्कोर चांगला मानला जातो. सर्व लोन देणार्या कंपन्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासतात. बहुसंख्य कंपन्या सिबिल तपासतात, पण काही कंपन्यांची स्वतःची पद्धत पण असते.
चांगला क्रेडिट स्कोर असेल तर लोन मिळण्याची संभावना वाढते, आणि नसेल तर भविष्यात तुमच्या प्रत्येक लोन अर्जावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
जितका जास्त क्रेडिट स्कोर असतो तितकी अधिक लोन मंजूर होण्याची संभावना असते.
लोनसाठी पात्रता निकष कोणते आहेत याचा विचार करण्यापूर्वी खालील काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे:
१. तुम्हाला नेमके काय हवे आहे
लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी नेमकी गरज काय आहे याचे मूल्यांकन करावे. गरज सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला संबंधित कागदपत्रे आणि पुरावे देता आला पाहिजे.
बाजारात विविध कारणांसाठी लोन उपलब्ध असतात, जसे नवीन मशीन विकत घेण्यासाठी मशीनरी लोन, वर्किंग कॅपिटल अपुरे पडत असेल तर वर्किंग कॅपिटल लोन इ. तुम्हाला ज्या प्रकारचे लोन हवे आहे ते नेमके का हवे आहे याची वाजवी कारणे सांगता आली पाहिजे.
२. तुमच्या क्रेडिट परिस्थिती बाबत माहिती असावी
लोन अर्ज मिळाल्यानंतर सर्व कंपन्या अर्जदाराची क्रेडिट हिस्टरी तपासून पाहतात. क्रेडिट स्कोर वरून भूतकाळात तुम्ही किती लोन घेतले होते, त्याची परतफेड केली का, तुमची क्रेडिट कार्ड कसे वापरता ही सगळी माहिती मिळते.
प्रत्येक व्यवसाय मालकाने पेमेंट हिस्टरी, किती पैसे येणे आहे, किती इतरांना द्यायचे आहे, आणि कोणत्या प्रकारची देणी आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे.
३. विविध कंपन्यांच्या पात्रता निकषाबाबत चौकशी करा
लोन देणाऱ्या विविध कंपन्या विविध निकष वापरून अर्जदाराची पात्रता तपासून पाहतात आणि त्या वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करतात.
विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या पात्रता निकषांबाबत व्यवस्थित चौकशी करणे चांगले. लोन देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिते , त्यांना जुन्या व्यवसायांना लोन द्यायचे असते की नुकत्याच स्थापित झालेल्या, त्यांच्याकडून लोन घेण्यासाठी काही तारण ठेवावे लागते का इ
ही चौकशी आधीच केली तर अर्ज नामंजूर होण्याची संभावना कमी होते. अर्ज नामंजूर झाला तर तुमच्या क्रेडिट स्कोर वर दुष्प्रभाव पडतो.
याशिवाय, तुम्हाला त्वरित लोन हवे असेल तर कोणत्या कंपन्या असे लोन देतात आणि त्यांची अर्ज प्रक्रिया काय आहे याची चौकशी करा.
४. व्यवसायाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या
बिझनेस लोन साठी अर्ज करताना आर्थिक स्टेटमेंट महत्वाच्या असतात. याचे निरीक्षण करून कर्ज देणारी कंपनी तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करू शकते.
याशिवाय, लोनच्या रकमेचा तुम्ही काय उपयोग करणार आहे याचे योग्य नियोजन केले पाहिजे. असे केल्यास कर्ज देणाऱ्या कंपनीला खात्री पटते की व्यवसाय वाढतो आहे आणि आर्थिक रित्या सशक्त आहे.
महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे कॅश फ्लो. कॅश फ्लो चांगला नसेल तर लोन देणारी कंपनी जेव्हा व्यवसायाच्या परतफेडीच्या क्षमते बाबत तपासणी करेल तेव्हा समस्या निर्माण होऊ शकते.
लोनसाठी अर्ज करताना अर्जाबरोबर खालील गोष्टी समाविष्ट कराव्या:
१. विनंती पत्र
विनंती पत्र आर्थिक संस्थेच्या किंवा बँकेच्या मॅनेजरच्या नावाने लिहून पाठवावे. त्यात तुम्हाला किती लोन हवे आहे आणि तुमच्या व्यवसायाबाबत थोडक्यात माहिती द्यावी. तुमच्या अर्जाचा त्यांनी विचार करावा यासाठी ही विनंती असते.
२. बिझनेस प्लॅन
बिझनेस प्लॅनमध्ये व्यवसायाचे ध्येय, टीममधील सदस्यांची माहिती, व्यवसायाच्या सेवा आणि उत्पादनांबाबत माहिती, स्पर्धकांबाबत थोडी माहिती आणि तुमचा व्यवसाय त्यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे, आर्थिक स्टेटमेंट, काही आर्थिक अंदाज, भूतकाळात वापरलेली मार्केटिंग धोरणे, आणि व्यवसायाला काय साध्य करायचे आहे अशी माहिती समाविष्ट असते.
३. क्रेडिट रिपोर्ट
चांगला बिझनेस क्रेडिट रिपोर्ट असेल तर हव्या त्या व्याज दरावर लोन मिळण्याची शक्यता वाढते.
४. आर्थिक अंदाज
बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट इ दिले पाहिजे म्हणजे लोन देणाऱ्या कंपनीला तपासून पाहता येते की व्यवसायाकडे लोनची परतफेड करण्यासाठी पुरेसा निधी आहे.
५.किती लोन हवे आहे
लोनची रक्कम सांगा, आणि ती रक्कम कशासाठी हवी आहे हे पण सांगा. रकमेचे तपशील देऊन ती कशासाठी वापरणार हे नमूद करा. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन साधन विकत घेणार असाल तर ते नमूद करा.
६.इतर लोन
भूतकाळात तुम्ही इतर लोन घेतले असण्याची शक्यता आहे. तुम्ही ते नमूद केले तर लोन देणाऱ्या कंपनीला सध्या तुम्ही किती लोन घेतले आहे ते कळते.
कोणत्या लोनची परतफेड अजून झालेली नाही, किती रकमेचे लोन आहे आणि हप्त्याची तारीख काय आहे हे त्यातून कळते.हप्त्याची आणि व्याजाची रक्कम आणि हप्ते भरण्याची तारीख पण कर्जदाराला पाहता येते.
कर्जदाराला अतिरिक्त लोनची परतफेड करता येईल याची खात्री करण्यासाठी पण वरील केले जाते.
तुमचा लोन अर्ज नामंजूर होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर खालील गोष्टींची काळजी घ्या:
१.क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्ही डिफॉल्ट केल्याचे दिसते
भूतकाळात तुम्ही डिफॉल्ट केले असेल तर ते तुमच्याविरुद्ध मोजले जाईल आणि तुमचा अर्ज नामंजूर होऊ शकतो.
२.तुमची कंपनी नवीन आहे
तुमची कंपनी नुकतीच सुरु झाली असेल तर तुम्ही लोनची परतफेड करू शकाल एवढे आर्थिक बळ तुमच्याकडे नाही असे लोन देणाऱ्या कंपनीला वाटू शकते.
३. इतर कोणाच्या लोन साठी तुम्ही गॅरंटर असाल तर
तुम्ही इतर कोणासाठी गॅरंटर असाल आणि त्याने लोनची परतफेड केली नाही तर तुमच्या क्रेडिट रिपोर्टला पण धोका निर्माण होतो आणि रिपोर्टमध्ये नकारात्मक टिप्पणी जोडल्या जाते. हे लोन देणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने चांगले नसते.
तुमच्या व्यवसायासाठी त्वरित लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनान्स कंपनीला संपर्क करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. ग्रोमोर फायनान्स कंपनी वाजवी व्याज दरावर लोन देते आणि रक्कम तीन दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत मिळते.