ग्राहकांना आपापल्या सोयीप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँका इंटरनेट अथवा नेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देतात.
नेट बँकिंगचे खालील फायदे असतात:
-
ऑनलाईन व्यवहार करण्याचा अतिशय सुरक्षित व खात्रीचा मार्ग म्हणजे नेटबँकिंग.
-
नेट बँकिंगमुळे खात्यात होणार्या उलाढालींकडे लक्ष ठेवणे, खाते अपडेट करणे, नवीन खाते उघडणे, बिल भरणे, स्टेटमेंट प्राप्त करणे इ. अतिशय सोपे होते.
-
नवीन चेकबुक व इतर व्यवहारांसाठी प्रत्येक वेळेस बँकेत जाण्याची गरज नसते.
-
ग्राहक कुठूनही आपल्या खात्यात लॉगिन करून माहिती मिळवू शकतात. माहिती अपडेट करणे, पेमेंट थांबविणे अथवा सुरु करणे देखील याद्वारे शक्य असते.
वरील फायद्यांमुळे प्रत्येक लघु उद्योजकाने बँकेच्या व्यवहारांसाठी नेटबँकिंग सुविधा वापरलीच पाहिजे!
पण नेट बँकिंग सुविधा नसताना पीडीएफ रूपात बँकेचे स्टेटमेंट हवे असेल तर तुम्हाला जवळच्या बँक-शाखेत जावे लागेल.
नेट बँकिंग नसताना पीडीएफ रूपात बँकेचे स्टेटमेंट प्राप्त करायची प्रक्रिया:
-
जवळच्या बँक-शाखेला भेट द्या.
-
शाखेच्या मॅनेजर अथवा अधिकार्यांना अर्ज द्या ज्यात पीडीएफ रूपात बँकेचे स्टेटमेंट हवे असल्याचे कारण व तपशील लिहा.
-
बँकेच्या अधिकार्यांनी पत्र वाचल्यानंतर एक-दोन दिवसात तुमच्या ई-मेल आयडी वर पीडीएफ रूपात बँकेचे स्टेटमेंट येईल.
-
ई-मेलने पीडीएफ रूपात बँकेचे स्टेटमेंट आल्यानंतर ते इतर अटॅंचमेन्ट सारखेच डाउनलोड करते येते.
अशा सोप्या पद्धतीने तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग सुविधा नसून देखील पीडीएफ रूपात बँक स्टेटमेंट प्राप्त करता येते.
तुम्हाला विना-तारण बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा. ग्रोमोर आकर्षक व्याज दरावर तारण न ठेवता लघु उद्योगांना बिझनेस लोन देते आणि लोनची रक्कम ३ दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत दिली जाते.