तुम्ही पहिल्यांदाच जीएसटीआर फाइल करत आहात का? तुम्हाला त्याबाबत अनेक प्रश्न असू शकतात!
जीएसटीआर फायलिंगबद्दल तुम्हाला खालील शंका असू शकतात:
तुमच्या शंकांची उत्तरे काही अशी:
1. जीएसटी रिटर्न विशिष्ट अवधीतच फाइल करावा लागतो की कोणत्याही तारखेला फाइल करणे शक्य असते?
विशिष्ट अवधीतच जीएसटी रिटर्न फाइल करावा लागतो. त्या अवधीत रिटर्न फाइल केला नाही तर परत त्यासाठी अवधी उपलब्ध झाल्यावरच रिटर्न फाइल करता येतो.
2. विक्री झाली नाही तरीही जीएसटी रिटर्न फाइल करणे आवश्यक असते का?
होय, शून्य विक्री झाली असेल तरीही जीएसटी रिटर्न फाइल करावा लागतो.
3. मागील कालखंडाचा रिटर्न फाइल केला नसेल तर तो पुढच्या कालखंडात फाइल करता येतो का?
नाही, एका कालखंडात रिटर्न फाइल केला नसेल तर तो रिटर्न नंतर फाइल करणे शक्य नसते.
4. ऑफलाइन सुविधा एकदा डाऊनलोड केल्यानंतर अनेकदा जीएसटी रिटर्न फाइल करायला त्याचा वापर करता येतो का?
होय. ऑफलाइन सुविधा एकदा डाऊनलोड केल्यानंतर अनेकदा जीएसटी रिटर्न फाइल करता येतात.
5. व्याजाचे काय? लेजरमधील कर्जाच्या तारखेपर्यन्त व्याज लागू होते की पैसे डिपॉझिट केले त्या तारखेपर्यन्त?
संबंधित लेजरला डेबिट केलेल्या तारखेपर्यंत व्याज लागू होते.
6. xlsx व CSV फाइल मध्ये काय फरक असतो?
दोन्ही प्रकार वापरुन जीएसटी रिटर्न फाइल करता येतो आणि त्यांच्यात काहीच फरक नसतो.
7. टॅक्स/व्याज/शुल्क/दंड/इतर अंतर्गत लेजर मध्ये भरलेल्या रकमेचा वापर त्याच कारणासाठी करावा लागतो की इतर ठिकाणी देखील ती रक्कम वापरता येते?
टॅक्स साठी भरलेली रक्कम टॅक्स द्यायलाच वापरता येते आणि फी इत्यादीसाठी त्या रकमेचा वापर करता येत नाही. सीजीएसटी म्हणून भरलेली रक्कम फक्त सीजीएसटी साठीच वापरता येते, एसजीएसटी अथवा आयजीएसटी साठी नाही.
8. एचएसएन समरीचे तपशील देणे आवश्यक असते का?
होय. जीएसटीआर-१ व २ याचा भाग असल्याने एचएसएन समरीचे तपशील देणे आवश्यक असते.
9. जर तुम्हाला जीएसटीआर ३-ब भरता आला नाही व रक्कम टॅक्स ऐवजी कॉम्पेन्सेशन म्हणून भरली गेली असेल तर काय करावे?
अशावेळी ‘जीएसटीएन’ला ईमेल पाठवून बदल करता येतो. सरकारने नुकताच सुधारणा (रिवाइझ) पर्याय देखील सुरू केला आहे ज्यात जीएसटीआर-ब सबमिट झाला असेल पण फाईल झाला नसेल तर त्यात बदल करता येतो. असे केल्याने फायलिंग करण्यापूर्वी चूक दुरुस्त करता येते. चूक दुरूस्त करण्यासाठी पीएमटी ०४ फॉर्म देखील भरता येतो. अजून तरी पीएमटी ०४ फॉर्म ऑनलाइन उपलब्ध नसल्याने तो कार्यालयात सादर करावा लागतो.
10. रिटर्न भरायला उशीर झाला तर दंड भरावा लागतो का?
होय. सर्व रिटर्न वर दंड लागू होतो. उशीरा भरलेल्या रिटर्न वर ५० रुपये प्रति रिटर्न व निल (शून्य) रिटर्न असल्यास २० रुपये दंड लागू होतो.
11. ऑगस्ट २०१७ किंवा त्यानंतर रजिस्ट्रेशन झाले असेल तरीही रिटर्न भरता येतात का?
रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच्या काळापासून रिटर्न फाइल करता येतात.
12. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) साठी अर्ज/वापर करताना काय खबरदारी घ्यावी?
डीएससी क्लास २ अथवा ३ असावे किंवा पॅन वर आधारित असले पाहिजे. डीएससी कालबाह्य (एक्सपायर) झालेले नसावे. जीएसटी वेबसाइटवर डीएससी रजिस्टर करणे आवश्यक असते. तुमच्या कम्प्युटरवर ईएम सायनर व्हर्जन २.६ इंस्टॉल केलेले असावे. डीएससी डोंगल तुमच्या कम्प्युटरला जोडलेले असावे.
13. जुलै अथवा ऑगस्ट महिन्याचा दंड माफ केला पण तुम्ही दंडाची रक्कम भरली असेल, तर ही रक्कम दंड म्हणूनच धरली जाते का?
दंडाच्या रकमेची परतफेड होते. तुम्हाला त्या रकमेचा वापर टॅक्स देण्यासाठी करता येतो.
14. फायलिंगला उशीर झाल्यास जीएसटीएनने फायलिंग मुदत बंद केल्यानंतरच्या अवधीसाठी दंड मोजला जातो का?
होय. दंड लागू होतो. जीएसटी रिटर्न फाइल केलेल्या तारखेपर्यंत दंड लागू होतो.