सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने क्यूएमएस (क्वालिटी मॅनेजमेंट स्टँडर्ड) किंवा क्यूटीटी (क्वालिटी टेक्नॉलजी टूल्स) योजना सुरू केली आहे. एनएमसीपी (नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिवनेस प्रोग्रॅम) अंतर्गत क्यूएमएस/क्यूटीटी योजना सुरू केली आहे.
या योजनेचा उद्देश आहे लघु आणि मध्यम उद्योगांना उत्पादन वाढवण्यासाठी, अधिक स्पर्धात्मक होण्यासाठी आणि वाजवी किंमतीला अधिक चांगल्या दर्जाची उत्पादने निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
क्यूएमएस/क्यूटीटी योजनेचे लाभ:
-
उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर
-
उत्पादनाच्या दर्जात सुधारणा
-
भारतात उपलब्ध असलेली आणि नव्याने येत असलेली परदेशी उत्पादने समजण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योगांना मदत होते
-
लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीत मदत होऊन त्यांना बाजारात आपले स्थान निर्माण करता येते.
क्यूएमएस/क्यूटीटी योजनेसाठी पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे:
-
उद्योजकाचे मेमोरॅन्डम असलेल्या उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येईल.
-
किमान २ वर्ष सुरू असलेले उद्योग ज्यांची कारकीर्द चांगली आहे.
-
मागील २ वर्षात ज्या उद्योगांच्या अकाऊंट्सचे नियमितपणे ऑडिट झाले आहे.
-
उद्योगाच्या जाहिरात/ मार्केटिंग साहित्यावर किंवा बॅनर/अहवालावर लघु आणि मध्यम उद्योगचा आधार असल्याचे नमूद असले पाहिजे.
काही आवश्यक कागदपत्रे:
-
उद्योगाचे योगदान नमूद करणारे हमीपत्र ज्यात उद्योगाच्या एकूण किंमतीच्या २५% ते ५०% रकमेचे वर्णन असेल.
-
सरकारतर्फे जाहीर केलेल्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला जाणार नाही, किंवा इतर समान लाभ घेतले जाणार नाहीत हे जाहीर करणारे हमीपत्र.
तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला कर्ज हवे असल्यास, वाजवी व्याज दरात आणि त्वरित कर्ज देणार्या ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा! वेबसाइटला भेट द्या आणि कागदपत्रांसह एक सोपा अर्ज भरा!