व्यवसायाच्या विस्तारासाठी भांडवल शोधत आहात? ऑनलाइन व्यावसायिक लोन निवडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे!
ऑनलाइन व्यावसायिक लोनसाठी अर्ज करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
१. अर्ज करायला अतिशय सोपे!
घरी अथवा ऑफिसमध्ये आरामात बसून मनात येईल तेव्हा ऑनलाइन व्यावसायिक लोनसाठी अर्ज करू शकता!
तुम्ही फक्त संकेतस्थळाला भेट द्या, अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि मान्यतेची वाट बघा. कर्जदाराचे ऑफिस उघडायची किंवा कर्ज अधिकारी जेवून परत यायची वाट बघावी लागत नाही!
२. असे कर्ज वस्तुनिष्ठ (ऑब्जेकटिव) असतात!
प्रत्येक लोन अर्जाचे व अर्जदाराचे मूल्यांकन अल्गोरिदम वर आधारित व वस्तुनिष्ठ (ऑब्जेकटिव) निकष वापरून केले जाते.
अशाने लघु उद्योजकांना कर्जदारांकडे स्वतः गेल्यावर अर्जाबाबत मिळणारी एक प्रकारची अनिश्चित व विसंगत वागणूक टळते. वैयक्तिक तपशील, स्थान, कर्जदाराचा कल अथवा पसंती इत्यादी सारखे अर्जाशी संबंधित नसलेले घटक लोनचे मूल्यांकन करताना विचारात घेतले जात नाहीत.
३. अर्ज वेगाने हाताळले जातात!
ऑनलाइन व्यावसायिक लोनच्या पात्रतेचे मूल्यांकन अल्गोरिदम वर आधारित असल्याने काही मिनिटात, अनेकदा काही सेकंदातच मूल्यांकन पूर्ण होते.
या व्यतिरिक्त, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड देखील करता येतात! कागदपत्रांची पडताळणी डिजिटल पद्धतीने होत असल्याने सगळी कागदपत्रे व्यवस्थित असल्यास लोन वितरण अल्पकाळात होते!
तुम्हाला अतिशय तातडीने लोन हवे असेल तर अर्ज प्रक्रियेचा जलद वेग अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो – ऑफलाइन मार्ग मंद गतीने काम करतात आणि त्याचबरोबर तातडीची गरज असल्यास खर्चिक पण ठरतात.
लोन मिळवण्यासाठी ग्रोमोर फायनॅन्स कंपनीची ऑनलाइन प्रक्रिया सोपी आहे! तुम्ही पात्र आहात असे वाटत असेल तर इथे भेट देऊन आजच अर्ज करा!