प्रत्येक उद्योजकाला इन्कम टॅक्स रिटर्न (आय.टी.आर.) भरणे आवश्यक असते. अनेक करदात्यांना आय.टी.आर. उशीरा भरायची सवय असते. असे केल्यास आयकर विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे आर्थिक दंड इत्यादी भरावा लागू शकतो.
इन्कम टॅक्स रिटर्न उशीरा भरण्याचे काही परिणाम:
१. दंड
कलम २३४एफ प्रमाणे उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना आर्थिक दंड आकारला जातो. ३१ मार्च रोजीची मुदत संपल्यानंतर पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना रु १०००० दंड आकारला जातो. पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास रु १००० दंड लागू होतो.
२. रिफंड
मुदतीत रिटर्न भरणाऱ्या करदात्याला टॅक्सची रक्कम आवश्यकतेपेक्षा अधिक भरली असल्यास रिफंड देखील लवकर मिळतो.
३. व्याज
कलम २३४ए प्रमाणे थकबाकी किंवा न भरलेल्या टॅक्सवर दर महिन्याला १% व्याज आकारले जाते. मुदत संपल्यानंतर त्वरित व्याज गणना सुरु होते. पूर्ण टॅक्स भरल्याशिवाय आय.टी.आर. फाईल करणे शक्य नसते. म्हणून टॅक्स भरायला जितका उशीर होतो तितकेच व्याज वाढते.
४. नुकसान पुढच्या वर्षी ‘कॅरी फॉरवर्ड’ करणे
एखाद्या वर्षात व्यवसायात नुकसान झाले असल्यास उद्योजकाने इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरणे अतिशय महत्वाचे असते. नुकसान पुढच्या वर्षात ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येत नाही (घर विकल्यावर झालेल्या नुकसाना व्यतिरिक्त).
५. सुधारित आय.टी.आर. वेळेवर न भरणे
टॅक्स रिटर्न भरताना चूक झाली असल्यास ती त्वरित दुरुस्त करणे आवश्यक असते. ह्या कामात उशीर झाल्यास दंड लागू होतो. सुधारित रिटर्न भरण्याची मुदत पूर्वी दोन वर्ष होती, जी २०१७-२०१८ सालापासून एक वर्ष केली गेली आहे.
तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला कर्ज हवे असल्यास, वाजवी व्याज दरात आणि त्वरित कर्ज देणार्या ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा!