लघु उद्योग चालवणे सोपे काम नसते. व्यवसायाचे दैनिक कार्य करण्यासाठी मनुष्यबळ आणि पैसा दोन्ही आवश्यक असतात. अनेकदा, व्यवसाय सुरळीतपणे चालू ठेवणे अवघड होते. बाजारातील चढ-उतार, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणे, बाजारात स्पर्धक असणे, पर्याप्त पैसे नसणे इ. घटकांमुळे व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीवर प्रभाव पडतो.
जवळजवळ सर्व व्यवसाय मालकांना व्यवसायाच्या संपूर्ण जीवनचक्रात एकदा तरी लोन घ्यावे लागते. नवीन मशीन विकत घेणे, व्यवसायाचा विस्तार करणे, नवीन आणि अनुभवी कर्मचारी नियुक्त करणे, वर्किंग कॅपिटल उभे करणे, मार्केटिंग क्रिया अशा सर्व कार्यात बिझनेस लोन लघु उद्योजकासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.
वर्तमान काळात बाजारात अनेज प्रकारचे लोन उपलब्ध असतात. मात्र, लोन देणार्या कंपनीच्या अटी आणि शर्ती आणि त्यांचे पात्रता निकष याबाबत काळजी घेतली पाहिजे.
लघु उद्योगासाठी बिझनेस लोन घेण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाला किती लोन आवश्यक आहे आणि कशासाठी वापरले जाणार आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. यासाठी व्यवसायाकडे नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे. तुम्हाला स्वतः ते करणे शक्य नसेल तर अकाऊंटंट सारख्या तज्ञाची मदत घ्या.
लघु उद्योजकाला विविध पद्धतीने निधी उभा करता येतो, जसे वर्किंग कॅपिटल लोन, टर्म लोन, सरकारी योजना, बँकेकडून लोन, ईक्विपमेंट आणि इनवॉइस लोन, क्लाऊड फंडिंग, क्राऊड फंडिंग, विना तारण लोन, मालमत्ता तारण ठेऊन लोन, शेअर तारण ठेऊन लोन, सोने तारण ठेऊन लोन, एंजेल इन्वेस्टिंग इत्यादी.
लघु उद्योजक खालील प्रकारच्या व्यावसायिक लोनपैकी निवडू शकतो:
१. वर्किंग कॅपिटल लोन
वर्किंग कॅपिटल लोन हे मध्यम किंवा अल्पावधीचे लोन असतात. ज्या लघु उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे त्यांच्यासाठी हे लोन असतात. किती लोन मिळू शकते हे व्यवसायाच्या पात्रतेवर ठरते.
तारण ठेवून लोन घेण्यापेक्षा एनबीएफसी कडून विना तारण लोन घेणे जास्त चांगले असते कारण तुमची मालमत्ता तुम्हाला तारण ठेवावी लागत नाही.
२. टर्म लोन
टर्म लोन एक दीर्घावधीचे लोन असते. व्यवसायाच्या वाढीच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी काही आर्थिक गरजा असतील तर लोन देणार्या कंपन्या टर्म लोन देतात. टर्म लोनचा निश्चित अवधी आणि परतफेडीचे वेळापत्रक असते, आणि व्याज दर पण कमी असतो, मात्र हे सर्व व्यवसायाच्या क्रेडिट वर ठरते.
काही टर्म लोनसाठी तारण ठेवावे लागते, तर काही प्रकारचे टर्म लोन विना तारण असतात. त्यांचा अवधी १५-२० वर्ष असतो आणि व्याज दर निश्चित किंवा बदलता असू शकतो.
३. सरकारी योजना
केंद्रीय सरकारच्या पुढील योजना लघु उद्योजकासाठी उपलब्ध असतात: सीजीएस (क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइसेस), क्रेडिट लिंक कॅपिटल सब्सिडि स्कीम फॉर टेक्नॉलजी अपग्रेडेशन, नाबार्ड, एनएसआयसी, मिनी टूल्स रूम अँड ट्रेनिंग सेंटर स्कीम, मार्केट डेवलपमेंट असिस्टेन्स स्कीम, टेक्नॉलजी अँड क्वालिटी अपग्रेडेशन सपोर्ट, मुद्रा लोन योजना आणि स्टँड-अप इंडिया योजना.
४. बँक लोन
साधारणपणे बँक लोनसाठी मालमत्ता तारण ठेवावी लागते. कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि तो किती पात्रता निकष पूर्ण करतो यावर व्याज दर ठरवले जातात.
५. ईक्विपमेंट अँड इनवॉइस लोन
ईक्विपमेंट लोन साधारणपणे उत्पादन करणार्या कंपन्यांसाठी असतात. २५ कोटी पर्यन्त किंमत असलेल्या उपकरणांसाठी बँक अशा प्रकारचे लोन देते. काही बँक १०० कोटी पर्यन्त लोन देतात. या लोनचा अवधी साधारणपणे ४ ते ५ वर्ष असतो.
इनवॉइस ग्राहकाला पाठवल्यानंतर त्याच्याकडून पैसे मिळेपर्यंत जो अवधी असतो त्या अवधीसाठी निधी हवा असल्यास इनवॉइस लोन घेता येतो. इनवॉइस रकमेच्या ८०% पर्यन्त लोन बँककडून मिळते आणि उरलेली रक्कम इनवॉइससाठी सर्व पैसे आल्यानंतर. या प्रकारच्या लोनमध्ये अल्प प्रॉसेसिंग फी असते आणि कमी व्याज दर असतो.
६. क्लाऊड फंडिंग आणि क्राऊड फंडिंग
तुमच्या व्यवसायासाठी अनेक गुंतवणूकदार गटांकडून आर्थिक मदत मिळवता येते जेणेकरून तुम्हाला बिझनेस आयडिया एकमेकांना सांगता येतात. याला क्लाऊड फंडिंग म्हणतात.
क्राऊड फंडिंग म्हणजे व्यक्तींचा समूह जो तुमची बिझनेस आयडिया संभाव्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. एक मोठ्या गुंतवणूकदाराकडे जाण्यापेक्षा अनेक छोट्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहचता येते.
७. विनातारण लोन
विना तारण लोन असल्यास कोणत्याही प्रकारची संपत्ती तारण ठेवावी लागत नाही.
विना तारण लोनसाठी तुम्हाला लोन देणार्या कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. लोन मंजूर झाल्यावर लगेच लोनची रक्कम तुम्हाला दिली जाते.
तुम्हाला लोन हवे असेल तर लोन देणारी योग्य कंपनी निवडणे पण आवश्यक असते. बँक, एनबीएफसी, व काही सरकारी योजना यातून निवड करता येते.
बँककडून लोन घ्यायचे झाल्यास साधारपणपणे काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. मात्र, एनबीएफसी विना तारण लोन देतात, आणि त्यांची अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन असते.
भारतात लघु उद्योगासाठी बिझनेस लोन कुठे मिळतात
भारतात खालील ठिकाणी लघु उद्योगासाठी बिझनेस लोन मिळतात:
१. बँक
लोन घेण्याचा सगळ्यात प्रचलित प्रकार म्हणजे बँक लोन किंवा तारण असलेले लोन. तारण असलेल्या लोनसाठी काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. मशीन, बॉन्ड, स्टॉक, साधने, स्थावर मालमत्ता इत्यादी यात समाविष्ट असते.
तारण असलेले लोन सर्वाधिक प्रमाणात आढळतात आणि ते मिळवणे सरल व सोपे असते. बँक साधारणपणे लघु उद्योगांना तारण असलेले लोन देतात.
लोनची संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज यांची परतफेड झाल्यानंतर मग तारण ठेवलेली मालमत्ता कर्जदाराला परत मिळते.
जर कर्जदाराने परतफेड केली नाही तर बँक त्या मालमत्तेची मालक होते आणि ती विकून आपला तोटा भरून काढते.
गुंतवणुकीत तुम्हाला धोका कमी करायचा असेल किंवा कमी व्याज दर हवे असतील आणि परतफेड करण्यासाठी अधिक अवधी हवा असेल तर तारण असलेले लोन घेणे हा चांगला पर्याय आहे.
२. एनबीएफसी
लघु उद्योगाला बिझनेस लोन घेण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनॅन्शियल कंपनी). एनबीएफसी यांची अर्ज प्रक्रिया बँकेपेक्षा खूप सोपी असते. बँकेत अर्ज प्रक्रिया लांब आणि क्लिष्ट असते, आणि अनेक अटी व शर्ती असतात. शिवाय बँककडून लोन घ्यायचे म्हणजे तारण ठेवावे लागते ज्याची गरज एमबीएफसी मध्ये पडत नाही.
अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्र असली, तो पात्रता निकष पूर्ण करत असला आणि चांगले क्रेडिट स्कोअर/ सिबिल स्कोर असले की लगेच लोन मिळते.
३. सरकारी योजना
लघु उद्योजकांना बिझनेस लोन हवे असल्यास त्यांना मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया योजना, स्माइल योजना इ. वापरता येतात.
मुद्रा योजना
प्रधान मंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात व कृषी क्षेत्रात नसलेल्या लघु/सूक्ष्म उद्योजकांना लोन देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे.
व्यावसायिक बँक, आरआरबी, सहकारी बँक इ. यांच्याकडून मुद्रा लोन मिळते. कर्जदार ऑनलाइन अर्ज पण करू शकतो.
मुद्रा लोन अंतर्गत तीन पर्याय असतात, शिशु, किशोर आणि तरुण. रु ५०,००० पर्यंत लोन शिशु योजनेत मिळते. रु ५०,००० ते रु ५,००,००० मधील लोन किशोर योजनेत मिळते, आणि रु ५,००,००० ते रु १०,००,००० मधील लोन तरुण योजनेत मिळते.
स्टँड-अप इंडिया स्कीम
या योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला उद्योजकांना सोपे, सोईस्कर, स्वस्त आणि विना तारण लोन दिले जाते.
१ ते १० वर्षाच्या अवधीसाठी रु १० लाख ते रु १ कोटी रकमेचे लोन दिले जातात.
लघु उद्योजकाला बिझनेस लोन हवे असेल तर त्याने तारण असलेले लोन घ्यावे किन विना तारण? लघु उद्योजकासाठी काय अधिक सोईस्कर असते?
वर नमूद केले तसे, तारण असलेल्या लोनसाठी काही मालमत्ता तारण ठेवावी लागते जे लघु उद्योजकासाठी शक्य नसते.
काय निवडावे: तारण असलेले की विना तारण लोन?
तुमच्यासाठी काय योग्य आहे हे खालील घटकांच्या आधारे ठरवा.
तारण असलेले बिझनेस लोन:
ज्या लोनमध्ये तारण ठेवले जाते, त्याचे व्याज दर कमी असतात, आणि परतफेडीचे वेळापत्रक पण परवडणारे असते. अशा लोनमध्ये परतफेडीचा अवधी अधिक लवचिक असतो आणि दर महिन्याला भरायचा हप्ता तुम्ही कमी करून घेऊ शकता. असे केल्याने तुम्हाला इतर आर्थिक आणि वैयक्तिक जबाबदार्या पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतो.
तारण ठेवता येत असल्यामुळे तुम्हाला जास्त रकमेचे लोन मिळू शकते.
तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली नसली तरीही तारण असलेले लोन तुम्हाला मिळू शकते, कारण मालमत्ता तारण ठेवली असल्यामुळे लोन देणार्या कंपन्या थोडी लवचिकता दाखवण्यासाठी तयार होतात.
तारण असलेल्या लोनची परतफेड तुम्ही केली नाही, तर लोन देणार्या कंपनीला कोर्टाचा आदेश नसतानासुद्धा तुमच्या मालमत्तेवर दावा करण्याचा हक्क असतो. म्हणून हे लोन तुमच्या बुक ऑफ अकाऊंट्समध्ये दीर्घकाळासाठी दिसते.
विना तारण बिझनेस लोन:
विना तारण बिझनेस लोनमध्ये काहीही तारण ठेवलेले नसल्यामुळे परतफेड करण्यास उशीर झाला किंवा परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही.
विना तारण लोन मिळवणे जास्त सोपे असते कारण बाजारात अनेक अशा कंपन्या आहेत. याच बरोबर लोनची रक्कम मिळण्यासाठी वेळ पण कमी लागतो, कधीकधी ३ दिवसात रक्कम दिली जाते.
विना तारण लोनची परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर धारणाधिकार लावेल, आणि तुम्हाला लोनची मूळ रक्कम, उशिरा परतफेड करण्याचा दंड आणि कोर्टाचा खर्च परत करावे लागेल.
तारण असलेल्या लोनचे अनेक फायदे असले तरीही विना तारण लोन घेणे अधिक चांगला पर्याय असतो कारण त्यात अर्ज करणे अत्यंत सोपे असते, त्वरित मंजूरी मिळते, आणि गरज असते तेव्हा पटकन आर्थिक मदत घेता येते.
बिझनेस लोनसाठी अर्ज करायचा असल्यास, पात्रता निकष माहिती असणे अत्यंत महत्वाचे असते.
तुम्हाला विना तारण बिझनेस लोन हवे आहे का? वाजवी व्याज दरावर तुम्हाला इथे लोन मिळू शकते.
लघु उद्योगाला बिझनेस लोनसाठी अर्ज करायला काय पात्रता निकष असतात:
बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योग किती वर्ष सुरू आहे हा पण एक निकष असतो. व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
अजून एक महत्वाचा निकष असतो अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर. बिझनेस लोन मंजूर होण्यापूर्वी याचे मूल्यांकन केले जाते. याला सिबिल स्कोअर पण म्हणतात. काही लोन देणार्या कंपन्यांची क्रेडिट स्कोअर मोजायची स्वतःची पद्धत असते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जदाराच्या दृष्टीने चांगले असते.
लोनची रक्कम, लोन घेण्याचा उद्देश, उद्योग क्षेत्र, कंपनीचा प्रकार, कंपनीचा ओळख क्रमांक, तारणाचा पुरावा (असल्यास) इत्यादी हे इतर काही निकष असतात.
पुढच्या पायरीकडे वळण्यापूर्वी आपण क्रेडिट स्कोअरबाबत थोडी चर्चा करूया. बिझनेस लोनसाठी अर्ज प्राप्त झाल्यावर लोन देणारी कंपनी अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरचा विचार करते. भारतात लघु उद्योगाचा बिझनेस लोन मिळवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे म्हणजे काय हे आपण खाली पाहू.
भारतात बिझनेस लोनसाठी क्रेडिट स्कोअर
क्रेडिट स्कोअर एक तीन अंकी संख्या असते ज्याचे मूल्य ३०० ते ९०० याच्यामध्ये असते. सर्व लोन देणार्या कंपन्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासतात. ७५० – ९०० यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर असल्यास लोन मंजूर होण्याची शक्यता वाढते. चांगला स्कोअर असल्यास व्याज दर पण कमी लावले जातात.
काही क्रेडिट ब्यूरो क्रेडिट स्कोअर परिगणित करतात. काही लोन देणार्या कंपन्यांची क्रेडिट स्कोअर परिगणित करण्याची स्वतःची पद्धत असते.
तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर खालील प्रकारे पाहू शकता:
निशुल्क क्रेडिट स्कोअर देण्याची सेवा काही वेबसाइट वर उपलब्ध असते. तुम्ही तिथे तुमचा स्कोअर पाहू शकता. सिबिल सुद्धा निशुल्क क्रेडिट रिपोर्ट देते. मात्र कोणत्याही कंपनीची सेवा वापरण्यापूर्वी त्यांच्या अटी आणि शर्ती काय आहेत याचा विचार करावा.
क्रेडिट स्कोअर तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे सिबिल अकाऊंट निर्माण करा, आणि अकाऊंटमध्ये लॉगिन करून तपासा किंवा तुम्ही मासिक स्टेटमेंटचा पर्याय पण निवडू शकता.
किंवा क्रेडिट काऊंसेलरला भेट देऊन क्रेडिट स्कोअर तपासू शकता. काऊंसेलर तुमचे क्रेडिट स्कोअर परिगणित करून तुम्हाला त्यातील तपशील समजावून सांगू शकतात.
सिबिल वेबसाइटवर तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासायचा असेल तर तुम्हाला जन्म तारीख, लिंग, पत्ता इ. माहिती असलेला अर्ज भरावा लागेल व पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यासारखे ओळख पत्र लागेल.
या नंतर तुम्हाला त्यांच्या अटी आणि शर्ती स्वीकार कराव्या लागतील आणि मग तुम्हाला तुमचा क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पाहता येईल.
वर्षातून एकदा तुम्हाला तुमचा पूर्ण क्रेडिट रिपोर्ट पाहता येईल. मात्र, तुम्हाला त्याच वर्षात परत सिबिल रिपोर्ट पाहायचा असेल तर तुम्हाला रु ५५० द्यावे लागतील. सिबिल स्कोअर रिपोर्ट तपासण्यासाठी काही शुल्क असलेल्या सेवा पण आहेत.
बिझनेस लोनसाठी पात्र असायला चांगली क्रेडिट हिस्टरी असणे किती महत्वाचे असते
क्रेडिट हिस्टरीमध्ये लोन घेणार्याचे संपर्क तपशील, त्याचे व्यावसायिक तपशील, भूतकाळात घेतलेले लोन, परतफेड करण्याचा इतिहास, व्यक्तीचा गुन्हेगारीचा इतिहास, आणि क्रेडिट तपशील इ. माहिती असते. हे सर्व मिळून लोन घेणार्याची आर्थिक वर्तणूक दर्शवतात.
तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल आणि त्याचा प्रभाव तुमच्या लोन अर्जावर होईल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर खालील पद्धतीने तुमचा क्रेडिट स्कोअर/ क्रेडिट इतिहास सुधारता येतो.
क्रेडिट कार्ड बॅलेन्सकडे लक्ष ठेवा आणि फक्त आपत्कालीन परिस्थितीत तुमचे क्रेडिट कार्ड वापरा. बॅलेन्स कमी शिल्लक असेल तर क्रेडिट कार्ड वापरणे बंद करा.
वेळेवर तुमची बिले भरा.
इतरांच्या थकबाकी असलेल्या रकमा परत करा.
सर्व क्रेडिट अकाऊंट एकत्र बंद करू नका. जुने किंवा आवश्यक नसलेली खाती बंद केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागणार नाही, पण सगळीच खाती एकत्र बंद केलीत तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर दुष्प्रभाव पडेल.
पेमेंट करण्यासाठी रिमाइंडर सेट करा.
तुमच्या खर्चावर आधारित तुमची क्रेडिट लिमिट तुम्ही बदलू शकता.
लोन घेताना अधिक अवधीसाठी लोन घ्या.
एकाच वेळी अनेक ठिकाणी पैशांची परतफेड करायची आहे अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.
सिबिल रिपोर्टमध्ये काही चुका आहेत का हे तपासून पहा, आणि असल्यास त्वरित त्या सुधारून घ्या.
तुम्ही लोनसाठी पात्र असल्यास बिझनेस लोनसाठी आवश्यक संबंधित कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील. ही कागदपत्रे कोणती असतात हे आपण पाहू:
तुम्ही बिझनेस लोन मिळवण्यासाठी पात्र आहात का हे तपासण्यासाठी इथे भेट द्या.
लघु उद्योगाला बिझनेस लोन मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:
मालाकाचे पॅन कार्ड
मालाकाचे आधार कार्ड
मागच्या १२ महिन्याचे बँक स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)
मागच्या २ वर्षाचे आयकर रिटर्न (व्यवसायाचे आणि वैयक्तिक)
नवीनतम बॅलेन्स शीट आणि पी&एल (तात्पुरते)
नवीनतम ऑडिट केलेले बॅलेन्स शीट आणि पी&एल
गुमास्ता किंवा दुकाने आणि आस्थापना परवाना
जीएसटी पावती/चलन
बिझनेस प्लॅन
व्यवसायासाठी परवाने आणि परवानग्या
तारणासाठी पुरावा (असल्यास)
उद्योगाचे वार्षिक उत्पन्न
मालकीचा पुरावा आणि इतर संस्थांशी असलेले संबंध
इतर कायदेशीर करार आणि कंत्राट
एकदा संबंधित कागदपत्रे सादर केली आणि इतर सर्व माहिती बरोबर असली तर तुमचा बिझनेस लोन अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला लोनची रक्कम दिली जाईल. मात्र बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या निर्णयाबाबत नीट विचार केला आहे याची खात्री करून घ्या.
बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील लक्षात ठेवा
१. तुम्हाला नेमके काय हवे आहे हे कळले पाहिजे
सर्वप्रथम तुमच्या गरजांचे मूल्यांकन करा. तुम्हाला लोन का हवे आहे आणि विशिष्ट रकमेचे लोन का हवे आहे हे पटवून देण्यासाठी संबंधित कागदपत्रे, कारणे दाखवता आली पाहिजे, आणि तुमच्या इच्छेचे समर्थन करता आले पाहिजे व त्यासाठी पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.
२. तुमचा क्रेडिट स्कोअर/ क्रेडिट हिस्टरी माहिती असायला पाहिजे
तुमचा लोन अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्व लोन देणार्या संस्था तुमच्या क्रेडिट स्कोअरबाबत चौकशी करतील. काही संस्था सिबिल सारख्या सार्वजनिक संस्थेकडे पण चौकशी करतात. व्यवसायाच्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यांकन करण्याची काही संस्थांची स्वतःची पद्धत असते.
बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी अजून काही घटक ज्यांचा विचार करायला पाहिजे ते म्हणजे यापूर्वी घेतलेल्या लोनची परतफेड करण्याचा इतिहास, किती लोन अजून फेडायचे आहेत, नवीन क्रेडिटसाठी अर्ज करत आहात का, किती प्रकारचे क्रेडिट वापरात आहेत.
३. बिझनेस लोनसाठी असलेल्या पात्रता निकषाबाबत आणि विविध संस्थांमध्ये कोणती कागदपत्रे मागितली जातात याबाबत संशोधन करा
अर्जदाराचे मूल्यांकन करण्यासाठी विविध संस्थांचे वेगवेगळे पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी असते.
विविध संस्थांच्या पात्रता निकषाबाबत संशोधन करणे कधीही चांगले असते. अजून एक गोष्ट तुम्ही शोधू शकता, ती म्हणजे लोन देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे पसंत करते, नवीन स्टार्ट कंपनी की स्थापित कंपनी, आणि ते विना तारण लोन देतात की नाही.
अशा प्रकारे लोनसाठी अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते आणि अर्ज नामंजूर होत नाही, कारण अर्ज नामंजूर झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअर वर दुष्प्रभाव पडतो.
काही संस्था त्वरित लोन देतात, ज्यासाठी एक ऑनलाइन प्रक्रिया असते. त्यात अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करायची असतात. आणि अर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
४. तुमचे सर्व आर्थिक स्टेटमेंट तयार ठेवा
तुमच्या उद्योगाची आर्थिक परिस्थिती किती बळकट आहे हे तपासण्यासाठी लोन देणारी कंपनी तुम्हाला तुमचे आर्थिक स्टेमेमेंट मागतात.
लोन देणार्या कंपनीला खात्री वाटली पाहिजे की तुमचा व्यवसाय वाढतो आहे आणि सुदृढ आहे. ते व्यवसायाच्या कॅश फ्लो पण तपासून पाहतात. कॅश फ्लो चांगला नसणे हा नकारात्मक बिन्दु होतो, व घेतलेल्या लोनची परतफेड करता येईल की नाही याचे मूल्यांकन करताना अडचण येऊ शकते.
बिझनेस लोन अशा प्रकारे मंजूर होऊ शकते
तारण असलेले बिझनेस लोन तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला आवश्यक तारण ठेवायच्या मालमत्तेसह बँकमध्ये अर्ज करावा लागतो, आणि बँक तुमचा अर्ज मंजूर करेपर्यंत वाट पहावी लागते. तुम्ही विना तारण बिझनेस लोन घ्यायचे ठरवले असल्यास अनेक एनबीएफसी कंपन्या ऑनलाइन बिझनेस लोन देतात. प्रक्रिया अगदी सोपी असते:
१. लोनसाठी अर्ज करा
ज्या लोन देणार्या कंपनीचे पात्रता निकष तुम्ही पूर्ण करता ती कंपनी निवडल्यानंतर अर्ज ऑनलाइन भरा. अर्ज नामंजूर होऊ नये किंवा काही गोंधळ निर्माण होऊ नये याची खात्री करण्यासाठी अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरा.
२. कागदपत्रे अपलोड करा
सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करा. अशी लोन देणारी कंपनी निवडा जी तुमच्या कागदपत्रांचे संरक्षण करण्याची खात्री देते कारण ही कागदपत्रे गोपनीय असतात.
३. तुमचा लोन अर्ज मंजूर करून घ्या
अर्ज पूर्ण केल्यानंतर लोन देणारी कंपनी अर्जातील सर्व तपशीलाचे बारकाईने मूल्यांकन करते. ऑनलाइन लोन देणार्या कंपन्यांची स्वतःची ऑटोमॅटिक मूल्यांकन पद्धत असते. ही ऑटोमॅटिक मूल्यांकन वापरुन जलद गतीने लोन मंजूर करता येते. तुम्हाला अल्पावधीत लोन हवे असेल तर जलद मूल्यांकन पद्धत असलेल्या ऑनलाइन लोन देणार्या कंपन्या निवडा.
४. लोनची रक्कम प्राप्त करा
एकदा लोन मंजूर झाले की पुढचे पाऊल असते लोनची रक्कम प्राप्त करणे. लोन मंजूर झाल्यावर लगेच रक्कम दिली जाते. काही ऑनलाइन लोन देणार्या कंपन्या काही दिवसातच रक्कम देतात, व त्यापैकी काही तर ३ किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसात रक्कम देतात.
क्रेडिट स्कोअर कमी असणे किंवा चांगला नसणे, आर्थिक परिस्थिती चांगली नसणे, ओळख सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावा नसणे इ. कारणांमुळे तुमचा लोन अर्ज नामंजूर होऊ शकतो.
अर्ज नामंजूर झाल्यास ते मान्य करणे कठीण असले तरी असा अर्थ होत नाही यापुढे काहीच करता येणार नाही. नामंजूर झाल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मूल्यांकन करता येते आणि कार्ययोजना बनवून ती अंमलात आणता येते.
तुमचा बिझनेस लोन अर्ज नामंजूर झाला तर काय करावे
बिझनेस लोन अर्ज नामंजूर झाल्यास खालील पाऊले उचलता येतात:
१. अर्ज नामंजूर का झाला याचे कारण शोधून काढा
सर्वप्रथम हे समजून घ्या की तुमचा अर्ज नामंजूर का झाला.
तुमचा व्यवसाय नवीन असल्यामुळे तुमच्याकडे क्रेडिट हिस्टरी नसेल तर लोन देणार्या कंपनीला लोन देणे अवघड होते. आणि तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली नसली तर तुम्हाला लोन देऊन कंपनी धोका पत्करू शकत नाही.
व्यवसायाने खूप लोन घेतले असेल तर ते लोन देणार्या कंपनीला संशयास्पद वाटू शकते.
तुमच्या व्यवसायाचे सर्व तपशील अचूक आहेत याची खात्री करा. तुम्ही भरलेले तपशील आणि कागदपत्रातील तपशील सारखे नसले तर अर्ज नामंजूर होऊ शकतो.
खोट्या आर्थिक स्टेटमेंट दिल्या किंवा कॅश फ्लोमध्ये काही समस्या असल्यास नामंजूर होऊ शकतो.
तुमच्या व्यवसाय ज्या उद्योगक्षेत्रात काम करतो त्यातील धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर लोन देणारी कंपनी तुमचा अर्ज नामंजूर करू शकते.
२. व्यवसायाच्या मूलभूत घटकांना सुदृढ करा
व्यवसायाचा कॅश फ्लो चांगला असणे महत्वाचे असते. बिझनेस लोन अर्जातील हा अतिमहत्वाचा तपशील आहे. कॅश फ्लो चांगला नसेल तर लोन वेळेत परतफेड करण्याची तुमची क्षमता कमी होईल. लोन देणार्या कंपनीला याबाबत काळजी वाटू शकते, आणि ते अर्ज नामंजूर करू शकतात.
३. व्यवसायाचे आणि वैयक्तिक क्रेडिट सुधारण्याचा प्रयत्न करा
विना तारण लोनसाठी अर्ज केल्यास तुमची पात्रता ठरवताना तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर आणि मागील इतिहास याची महत्वाची भूमिका असते.
व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी सर्व विद्यमान लोन, बिले, हप्ते वेळेवर भरले पाहिजेत.
व्यवसायाची क्रेडिट हिस्टरी नसेल किंवा मर्यादित असेल तर व्यवसाय मालकाने वैयक्तिक आणि व्यावसायिक खर्चासाठी क्रेडिट कार्ड घ्यावे आणि त्याचे पेमेंट वेळेवर होतात याची खात्री करावी.
व्यवसाय आपले क्रेडिट स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असे लोन देणार्या कंपनीला आढळल्यास लोन अर्जाचा फेरविचार होऊ शकतो.
४. इतर पर्यायांचा विचार करा
त्याच वेळी बिझनेस लोन मिळवण्याचे इतर पर्याय शोधले तर व्यवसायाच्या क्रेडिट स्कोअर वर दुष्प्रभाव पडतो, पण विविध लोन देणार्या कंपन्यांचे पात्रता निकष, लोन देण्याचे धोरण आणि व्याज दर याबाबत संशोधन करण्यात काहीच हरकत नाही.
तुमचा व्यवसाय स्टार्ट-अप असेल तर क्राऊड फंडिंग किंवा एंजेल इन्वेस्टर हे पर्याय उत्तम ठरू शकतात. स्थापित व्यवसाय इतर पर्याय/संस्थांचा विचार करू शकतात.
तुमचा लोन अर्ज मंजूर झाला असेल तर चांगलेच आहे. पण या प्रवासात हे पहिले पाऊल आहे. बिझनेस लोन मिळवणे एक गोष्ट झाली पण मिळालेली रक्कम योग्य पद्धतीने वापरली जाते हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. लोनची रक्कम मिळाल्यानंतर ती वापरण्याची योजना तुमच्याकडे आहे याची खात्री करावी.
बिझनेस लोन अर्ज मंजूर झाल्यानंतर काय करावे
बिझनेस लोनची रक्कम तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही खालील केले पाहिजे.
१. परतफेड करण्याचे नियोजन करा
लोनची वेळेत परतफेड करणे अत्यंत महत्वाचे असते. असे केल्याने भविष्यात तुम्ही लोनसाठी अर्ज केल्यास ते मंजूर होण्यात अडचण येणार नाही.
तुमच्या मासिक बजेटमध्ये हप्त्याची रक्कम जोडा, किंवा तुमच्या व्यवसायाच्या बँक अकाऊंटमधून ऑटोमॅटिक पेमेंट होईल अशी व्यवस्था करा म्हणजे परतफेड वेळेवर होत राहील.
तुम्ही परतफेड केली नाही, किंवा हप्ता भरण्यात उशीर केला तर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी वर त्याचा दुष्प्रभाव पडतो.
२. लोन मुदतीपूर्व परतफेड करण्याच्या पर्यायाबाबत माहिती करून घ्या
मुदतीपूर्व तुम्हाला लोनची परत फेड करता येते का याची चौकशी करा. तुमच्या व्यवसायाची कॅश फ्लो स्थिती चांगली असेल आणि तुम्हाला लोनची रक्कम मुदतीपूर्व परत करता येत असेल तर तुमचे व्याजाचे पैसे वाचतात आणि तुमची क्रेडिट हिस्टरी पण सुधारते.
पण मुदतीपूर्व लोनची परतफेड केल्यास काही कंपन्या दंड आकारतात कारण मुदतीनुसार परतफेड केली असती तर जे व्याज मिळाले असते ते कंपनीला मिळत नाही.
३. तुमच्या क्रेडिट स्कोअरकडे लक्ष ठेवा
बिझनेस लोन मिळाल्यानंतर काही महिन्यांनी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासून पहा. योग्य आणि वेळेवर परतफेड केल्यास तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर सुधारतो.
तुमच्यात आणि लोन देणार्या कंपनीत परतफेडीबाबत काय अटी आणि शर्ती ठरल्या आहेत यावर चांगला क्रेडिट स्कोअर अवलंबून असतो.
४. तुमच्या लोनचे रिफायनॅन्स करून एका कमी-खर्चाच्या लोनमध्ये रूपांतर करा
तुमचे लोन अल्पावधीचे असल्यास त्याचे रिफायनॅन्स करून कमी व्याजदर असलेल्या दीर्घावधीच्या लोनमध्ये रूपांतर करू शकता.
तुमचे उत्पन्न निरंतर आणि नियमितपणे वाढत असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे.
नजीकच्या भविष्यात व्याजदर वाढणार असतील तर तुम्ही लोनचे रिफायनॅन्स करून निश्चित व्याज दराचे रूपांतर बदलत्या व्याज दरात करू शकता.
५. लोन देणार्या कंपनीशी चांगले संबंध टिकवून ठेवा
लोन देणार्या कंपनीशी चांगले संबंध टिकवून ठेवले आणि वेळेवर लोनची परतफेड केली तर भविष्यात अधिक चांगल्या अटींवर लोन मिळण्याची शक्यता वाढते.
लोन देणार्या कंपनीने बिझनेस क्रेडिट ब्यूरोकडे अहवाल पाठवल्यास, तुमच्या क्रेडिट स्कोअर वर त्याचा चांगला परिणाम होईल.
६. मिळालेला निधी योग्य पद्धतीने वापरा
तुम्ही घेतलेले लोन कसे वापरणार आहात याचा विचार करा. इतर कोणत्या प्रकल्पासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ते वापरले जात नाही याची काळजी घ्या.
ज्या उद्देशासाठी लोन घेतले आहे त्याच उद्देशासाठी वापरा. नवीन कर्मचारी नियुक्त करणे, नवीन साधने विकत घेणे, नवीन तंत्रज्ञान वापरणे, नवीन उत्पादन सुरू करणे, इ. जो उद्देश असेल तो पूर्ण करा.
तुम्ही लोन मुदतीपूर्व फेडायचे ठरवले तर लोनची मुदत कमी करून व्याजाचे ओझे कमी करू शकता.
दोन प्रकारे मुदतीपूर्व लोन फेडता येते: मुदतीपूर्व पूर्ण परतफेड आणि मुदतीपूर्व आंशिक परतफेड.
तुम्ही मुदतीपूर्व पूर्ण परतफेड करणार असाल तर मुदत संपण्यापूर्वी संपूर्ण लोनची रक्कम परत द्यावी लागेल आणि असे केल्याने व्याजाच्या रकमेची बचत होते. मुदतीपूर्व पूर्ण परतफेड करण्याचे नियम आणि प्रक्रिया प्रत्यक लोन देणार्या कंपनीचे वेगवेगळे असतात. म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही ज्या कंपनीकडून लोन घेतले आहे तिथे मुदतीपूर्व परतफेड करण्याची परवानगी आहे किंवा नाही.
मुदतीपूर्व आंशिक परतफेड करायची असल्यास लोनच्या रकमेचा काही भाग द्यावा लागतो. असे केल्याने मुद्दलाची रक्कम, हप्त्याची रक्कम आणि व्याज सगळेच कमी होते. लोन देणारी कंपनी याची परवानगी देते का हे तपासून पहा.
तुमच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध असेल तर मुदतीपूर्व परतफेड करण्याचा पर्याय चांगला असतो, याला फोरक्लोजर पण म्हणतात.
मुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेताना कशाचा विचार करावा
मुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेताना खालील गोष्टींचा विचार करावा
१. मुदतीपूर्व परतफेड केल्यास काही दंड भरावा लागतो का
मुदतीपूर्व परतफेड केल्यास लोन देणार्या कंपनीला व्याजाचे पैसे मिळत नाही, म्हणून मुदतीपूर्व परतफेड करण्यास त्या तुम्हाला परावृत्त करतात आणि तरी तुम्ही केलेच तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
मुदतीपूर्व परतफेड केल्यामुळे जे व्याजाचे पैसे वाचतात ते दंडाच्या स्वरुपात भरावे लागू शकतात.
मुदतीपूर्व परतफेड करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती नीट वाचा. लोन घेण्यापूर्वी मुदतीपूर्व परतफेड केल्यास किती दंड भरावा लागेल याबाबत लोन देणार्या कंपनीशी वाटाघाटी करू शकता.
२. यामुळे कॅश फ्लोमध्ये समस्या येऊ शकते
मुदतीपूर्व परतफेड केल्यास ज्या महिन्यात परतफेड केली जाते त्या महिन्यात कॅश फ्लोमध्ये समस्या येऊ शकते.
याचा काळजीपूर्वक विचार करा आणि आधीच्या लोनची परतफेड करण्यासाठी नवीन लोन घेऊ नका. काळजी घ्या की मुदतीपूर्व परतफेड केल्यामुळे तुमच्याकडे पर्याप्त निधी नाही असे होणार नाही.
३. रोख रकमेच्या वापराबाबत माहिती करून घ्या
बिझनेस लोनची मुदतीपूर्व परतफेड केलीच पाहिजे असे आवश्यक नसते. प्रत्येक वेळेला रोख रकमेचा वापर तपासून पहावा.
तुम्ही मुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेतलाच असेल तर खात्री करून घ्या की अशी कोणतीही महत्वाची गोष्ट नाही जिथे रोख रक्कम आवश्यक असेल. साधन किंवा मशीन विकत घेणे, इनवेंटरी, इतर पेमेंट, हंगामी तोटा भरून काढण्यासाठी इ. रोख रक्कम आवश्यक नाही याची खात्री करा.
४. कर भरणे
तुमच्या लोनसाठी तुम्ही जे व्याज भरता त्यावर तुम्हाला आयकरात सूट मिळते.
तुम्ही मुदतीत परतफेड केल्यास तुमचा नफा कमी दिसतो. मात्र मुदतीपूर्व परतफेड केल्यास नफा अधिक दिसतो आणि तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागेल.
लघु उद्योगासाठी हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.
५. क्रेडिट स्कोअर
लघु उद्योगाला बिझनेस लोन हवे असल्यास पात्रता निकष म्हणून क्रेडिट स्कोअर अत्यंत महत्वाचा असतो.
ज्या लोन देणार्या कंपन्या क्रेडिट ब्यूरोकडे अहवाल देतात त्यांच्याकडून लोन घेणे चांगले. तुमच्या परतफेडीचा इतिहास त्या क्रेडिट ब्यूरोला कळवतात ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी सुधारते जी भविष्यात उपयोगी ठरू शकते.
तुम्ही नियमितपणे हप्ते भरत असाल तर तुम्हाला भविष्यात पण लोन मिळणे सोपे जाईल.
बिझनेस लोनची मुदतीपूर्व परतफेड केली की लोन देणार्या कंपनीचा तोटा होतो, आणि लोन देणारी कंपनी ब्यूरोला कळवताना असमाधानकारक परतफेड केल्याचा अहवाल पाठवू शकते, ज्याचा दुष्प्रभाव क्रेडिट स्कोअर वर होतो. हे टाळण्यासाठी लोन देणार्या कंपनीशी आधीच चर्चा करा आणि अशी कंपनी निवडा जी अप्रामाणिकपणे वागणार नाही.
लोनची मुदतीपूर्व परतफेड करणे चांगला पर्याय वाटत असला तरी सर्व लाभ आणि तोटे यांचा विचार करून निर्णय घ्यावा.
तुम्ही जेव्हा परतफेड करत असता तेव्हा त्यासाठी वेळापत्रक ठरवणे केव्हाही चांगले म्हणजे तुम्ही एकही हप्ता विसरत नाही.
बिझनेस लोनची वेळेवर परतफेड होईल याची खात्री कशी करावी
बिझनेस लोनची परतफेड करताना उशीर होऊ नये यासाठी खालील करावे:
१. परतफेड करण्याचे नियोजन करून वेळापत्रक निर्माण करा
परतफेडीचे नियोजन करण्यासाठी सर्व बिले, विद्यमान लोनचे तपशील, किती हप्ते भरले, किती दंड भरायचा आहे, किती व्याज आहे इ. माहिती एकत्रित करा.
वरील माहितीच्या मदतीने किती रक्कम परत केली आहे, आणि किती अजून उरली आहे हे कळेल. आता तुम्ही मासिक खर्चासाठी नवीन बजेट निर्माण करा आणि त्यानुसार लोनची परतफेड करा.
२. अधिक व्याज दर असलेल्या लोनची प्रथम परतफेड करा
एकदा तुम्हाला तुमच्या सर्व लोनबाबत माहिती झाली की सर्वप्रथम सर्वाधिक व्याज दर असलेल्या लोनची परतफेड करा. असे केल्याने ओझे थोडे कमी होईल आणि उरलेल्या लोनची पण परतफेड करता येईल. म्हणून लोन घेताना अधिक व्याज दर असलेले लोन न निवडता कमी व्याज दर असलेले लोन निवडावे.
३. रोजचा खर्च कमी करा
अनावश्यक खर्च कमी करणे अत्यंत महत्वाचे असते. सर्वप्रथम अनावश्यक खर्चाची यादी करा आणि ते खर्च करणे बंद करा. असे केल्याने उगाच होणारे खर्च कमी होतात.
यामुळे जी बचत होईल त्याचा वापर परतफेड करण्यासाठी करता येईल.
४. अटी आणि शर्ती बदलून घेण्याचा प्रयत्न करा
लोन देणार्या कंपनीशी अटी आणि शर्तींबाबत परत वाटाघाटी करून पहा, म्हणजे परवडणारे व्याज दर आकारण्याचा निर्णय होऊ शकतो आणि हप्त्याचे नियोजन बदलता येऊ शकते. असे केल्याने हप्ते किंवा व्याज दर कमी होऊ शकते.
परतफेड किती करायची हे शोधण्यासाठी तुम्ही ईएमआय कॅल्कुलेटर वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला बजेटचे नियोजन करणे सोपे होईल.
लोनची परतफेड कशी करावी याचे नियोजन करता ती कोणत्या पद्धतीन करायची हे पण ठरवावे लागते.
बिझनेस लोनची परतफेड करण्याच्या ३ पद्धती
१. स्टँडिंग इन्सट्रक्शन
तुमचे बचत खाते असेल व त्यातून हप्ते भरायचे असतील तर ते आपोआप होण्यासाठी स्टँडिंग इन्सट्रक्शन देता येतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि प्रत्येक महिन्यात होते.
लोन देणार्या कंपनीला हप्त्याची तारीख कळवता येते, व त्या तारखेला खात्यात पर्याप्त पैसे आहेत याची खात्री करावी म्हणजे कोणताही हप्ता भरायचा राहून जात नाही.
२. पोस्ट डेटेड चेक
पोस्ट डेटेड चेक लोन देणार्या कंपनीला दिले जातात व ती कंपनी निर्धारित तारखेला ते चेक बँकमध्ये जमा करते.
स्टँडिंग इन्सट्रक्शन इलेक्ट्रॉनिक रूपाने कंपनीला दिले जातात व त्याच्या विपरीत चेक बँकमध्ये नेऊन भरावा लागतो.
३. इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्विस
लोन देणार्या कंपनीच्या बँकमध्ये तुमचे खाते नसेल तर तुम्हाला हा पर्याय वापरता येतो.
या सेवेत कर्जदार लोन देणार्या कंपनीला खात्यातून हप्ता काढून घेण्याचे अधिकार देतो. लोन देणारी कंपनी तुमच्या बँकला संमती पत्र, सही केलेला पण कॅन्सल केलेला चेक देते व बँक तुमच्या खात्यातून हप्ता काढून घेण्याची परवानगी देते.
तुम्ही हप्ते नीट भरत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही ते नीट मोजत आहात याची खात्री करा.
बिझनेस लोनचे हप्ते कसे मोजले जातात?
मूळ लोनची रक्कम, व्याज दर, लोनचा अवधी या आधारावर हप्ते मोजले जातात.
किती लोन घेतले आहे आणि किती व्याज दर आहे या प्रमाणात हप्ता वाढतो. म्हणजे लोनची रक्कम जास्त असेल तर हप्ता जास्त असेल आणि रक्कम कमी असेल तर हप्ता पण कमी असेल.
व्याज दराचा पण हप्त्यावर परिणाम होतो. दोन प्रकारचे व्याज दर असतात: निश्चित दर आणि बदलते दर. निश्चित दर असलेल्या लोनचे हप्ते संपूर्ण अवधीसाठी सारखेच असतील. बदलते व्याज दर असल्यास बाजारातील दराप्रमाणे हप्ते पण बदलतील.
ईएमआय कॅल्कुलेटर कसा वापरावा?
लोनचा हप्ता मोजण्यासाठी ईएमआय कॅल्कुलेटर सोईस्कर पर्याय असतो.
प्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा आहे हे शोधून काढण्यासाठी ईएमआय कॅल्कुलेटर वापरता येतो.
लोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर हे तीन घटक त्यात प्रविष्ट करा आणि तुम्हाला हप्त्याची रक्कम दिसेल.
वापरलेले सूत्र E = P x r x (1+r)^n/ ((1+r)^n-1) आहे, ज्यात E हप्ता आहे, P लोनची मूळ रक्कम, R व्याज दर जो दर महिन्याचा असतो. व तो शोधण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते: r = (वार्षिक व्याज दर/12) x 100. आणि N हा लोनचा महिन्यात अवधी असतो.
ईएमआय कॅल्कुलेटर वापरण्याचे काही फायदे:
१. वापरायला सोपे
ईएमआय शोधून काढण्यासाठी फक्त तीन आकडे आवश्यक असतात: लोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर. हे प्रविष्ट केले की हप्त्याची रक्कम दिसते. म्हणून हे वापरायला अत्यंत सोपे आहे.
२. चुका होत नाहीत
हाताने कॅल्कुलेट करताना चुका होऊ शकतात, आणि नंतर त्या चुका दुरूस्त करण्यात वेळ वाया जातो. हाच वेळ इतर महत्वाच्या कामासाठी वापरता येतो.
३. वेळ वाचतो
प्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा हे नक्की माहिती असल्यामुळे वेळ वाचतो. लोनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला घराबाहेर पडण्याची आवश्यकता नसते कारण व्याज दर आणि हप्ते तुम्हाला आधीच माहिती असतात.
४. खर्च कमी होतो
तुमचे हप्ते काय असायला हवे हे ठरवायला कोणतेही मध्यस्थ आवश्यक नसतात. तुम्ही सोप्या पद्धतीने स्वतःच हे करू शकता आणि त्याला पैसे खर्च करावे लागत नाही. अनेक वेबसाइट वर ही सेवा निशुल्क उपलब्ध असते.
म्हणून ईएमआय कॅल्कुलेटर वापरुन तुम्हाला लोनची परतफेड करता येईल का हे कळण्यात खूप मदत होते.
तर मग तुम्हाला बिझनेस लोन मिळाले, तुम्ही ते नीट वापरले आणि वेळेत त्याची परतफेड पण केली. पण भविष्यात तुम्हाला परत लोन घेण्याची गरज भासू शकते. व्यवसाय कायम वाढत असतो, आणि वेळेनुसार बदलतो. तुम्हाला दुसर्यांदा बिझनेस लोन हवे असेल तर तुम्हाला खालील करावे लागेल.
तुम्हाला तुमचा हप्ता शोधून काढायचा आहे का? या लिंकवर एक कॅल्कुलेटर उपलब्ध आहे.
अजून एकदा बिझनेस लोन हवे आहे? तुम्हाला हे करावे लागेल!
परत एकदा बिझनेस लोन घ्यायचे असल्यास तुम्हाला थोडी माहिती आधीच असल्यामुळे तुम्ही थोडे वेगळे करायचे ठरवू शकता. तुम्हाला पुढील पाऊले उचलावी लागतील:
१. लोन देणार्या कंपनीबाबत संशोधन करा
सर्वप्रथम कोणत्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे ते ठरवा. मागच्या वेळेला ज्याच्याकडून लोन घेतले होते त्याच्याकडेच परत जाणार आहात की नवीन कंपनीकडे ते ठरवा. जुन्या कंपनीकडे गेलात तर वेळ वाचेल कारण तुमची सर्व केवायसी कागदपत्रे त्यांच्याकडे आधीच असतात. नव्याने तुम्हाला फक्त आयकर रिटर्न आणि बँक स्टेटमेंट द्यावे लागेल.
मात्र, नवीन कंपनीकडे गेलात तर कदाचित कमी व्याज दरावर लोन मिळू शकते.
२. तुमची पात्रता तपासून पहा
तुम्ही जुन्या कंपनीकडेच परत गेलात तरीही तुमची पात्रता परत तपासली जाईल कारण व्यवसायाची आर्थिक स्थिती बदलत असते.
३. बिझनेस लोन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे
प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला लोन देणार्या कंपनीच्या अटी आणि शर्ती मान्य आहेत का ते तपासून पहा.
तुमची पात्रता आणि अटी व शर्ती तपासून पाहिल्यानंतर तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता. अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील भरावे लागतील.
अर्ज भरल्यानंतर, पुढचे पाऊल म्हणजे सर्व कागदपत्रे पीडीएफ रूपात किंवा लोन देणार्या कंपनीला जसे हवे तसे, अपलोड करावे.
४. बिझनेस लोन मंजूरी आणि रक्कम प्राप्त करणे
बिझनेस लोन अर्ज भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर लोन देणारी कंपनी सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासून पाहते. अर्ज मंजूर झाला तर काही दिवसात तुम्हाला लोनची रक्कम मिळते.
लोन देणारी कंपनी तुम्हाला करारावर सही करायला सांगू शकते. सही करण्यापूर्वी करार काळजीपूर्वक वाचायला विसरू नका.
अगदी खरंच गरज असेल तरच दुसर्यांदा बिझनेस लोन घ्या.
जेव्हा व्यवसायाला पैशांची गरज असते तेव्हा लोन घेणे महत्वाचे असते, पण त्याची परतफेड करणे पण तेवढेच महत्वाचे असते. असे केल्याने भविष्यात परत लोन घेताना अडचण येत नाही.
पण तुम्ही बिझनेस लोनची परतफेड केली नाही, तर काय होते?
बिझनेस लोनची परतफेड केली नाही तर खालील होऊ शकते…
बिझनेस लोनची परतफेड केली नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि नावलौकिकावर दुष्प्रभाव पडतोच पण त्याच बरोबर त्याचे दीर्घकालीन परिणाम पण होतात. भविष्यात तुम्हाला बिझनेस लोन घेण्यात अडचण येऊ शकते. त्या शिवाय खालील परिस्थिती उद्भवू शकते…
१. बँक किंवा एनबीएफसी कडून नोटिस/स्मरण पत्र
साधारणपणे सर्व बँक आणि एनबीएफसी यांना एक किंवा दोन हप्ते उशिरा दिले तर चालतात. मात्र सतत ३ महिने हप्ते भरले नाही तर बँक कर्जदाराला नोटिस पाठवते आणि त्याला लवकरात लवकर हप्ता भरायला सांगते.
९० दिवसापेक्षा अधिक काळ हप्ते भरले नाही, तर कर्जदाराला नॉन-परफॉर्मिंग असेट असे घोषित केले जाते. आणि नॉन-परफॉर्मिंग असेट असे घोषित झाले तर भविष्यात कधीची लोन घेता येत नाही.
२. कायदेशीर कारवाई
बँक किंवा एनबीएफसी यांनी पाठवलेल्या नोटिस किंवा स्मरणपत्राला कर्जदाराने उत्तर दिले नाही, तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
सर्वप्रथम कर्जदाराला कायदेशीर नोटिस पाठवली जाईल. तरीही कर्जदाराने प्रतिसाद दिला नाही तर तारण ठेवलेल्या मालमत्तेवर दावा केला जातो.
३. दंड
उशीरा हप्ता भरल्यास किंवा हप्ता भरला नाही तर अनेक बँक आणि एनबीएफसी दंड आकारतात. मात्र हे फक्त विना तारण लोन असल्यास केले जाते कारण लोन देणार्या कंपनीला दावा करण्यासाठी मालमत्ता तारण ठेवलेली नसते. आकारलेल्या दंडाबाबत वाटाघाटी करता येतात.
४. तारण म्हणून ठेवलेल्या मालमत्तेवर प्रभाव पडतो
कायदेशीर नोटिस पाठवल्यानंतर सुद्धा कर्जदाराला लोनची परतफेड करता आली नाही, तर लोनची रक्कम परत मिळवण्यासाठी शेवटचा पर्याय असतो तारण ठेवलेली मालमत्ता.
तारण असलेल्या लोनमध्ये जी मालमत्ता तारण ठेवली आहे त्याची मालकी लोन देणार्या कंपनीकडे हस्तांतरित होते. मग कंपनी ती मालमत्ता विकून लोनची रक्कम परत मिळवू शकते.
बिझनेस लोन घेणे तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा तुम्ही त्याचा वापर ज्या कारणासाठी लोन घेतले त्यासाठी करता. त्या व्यतिरिक्त, तुम्ही त्याची परतफेड पण वेळेत केली पाहिजे म्हणजे भविष्यात तुम्हाला परत लोन हवे असल्यास अडचण येत नाही. तुम्हाला कधीही बिझनेस लोन घ्यायचे असल्यास ही मार्गदर्शक पुस्तिका जवळ ठेवा म्हणजे सर्व मुद्दे तुम्ही विचारात घेतले आहेत याची खात्री करता येईल.
तुम्हाला विना तारण बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा व वाजवी व्याज दरावर त्वरित लोन मिळवा! तुम्ही पात्र असाल, आणि सर्व संबंधित कागदपत्रे उपलब्ध असतील तर आम्ही रु १० लाखापर्यंत बिझनेस लोन देतो.