व्यवसाय मालकांसाठी पॅन, जीएसटी, टीआयएन, डीएससी आणि डीआयएन महत्वाचे असतात, आणि प्रत्येक व्यवसाय मालकाला यांच्यातील फरक माहिती असले पाहिजे.
आपण प्रत्येकाबाबत जाणून घेऊ:
१. पॅन
पॅन किंवा पर्सनल अकाउंट नंबर ही एक १० अंकी संख्या असते जी प्रत्येक करदात्याला दिली जाते. आयकर विभाग पॅन क्रमांक जारी करते. ओळखीचा पुरावा म्हणून हा अंक महत्वाचा असतो. भारताच्या नागरिकाला भारतात एलएलपी किंवा प्रोप्रायटरशिप सुरू करायची असेल तर पॅन असणे अनिवार्य असते.
प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक उलाढालीकडे लक्ष ठेवण्यासाठी पॅन वापरले जाते. बिझनेस लोन, मालमत्ता खरेदी इत्यादी सारख्या सर्व उलाढालींसाठी पॅन असणे अनिवार्य असते.
२. जीएसटी
२०१७ साली जीएसटी लागू झाला. टीआयएन आणि वॅट ऐवजी आता जीएसटी वापरले जाते. ज्या व्यवसायांनी टीआयएन किंवा वॅट साठी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना जीएसटी साठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
रु २० लाखापेक्षा अधिक मूल्याची उत्पादने आणि सेवा पुरवठा करणार्या कंपन्यांना जीएसटी साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. जीएसटी साठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्यवसायाला जीएसटी आयडेंटिफिकेशन क्रमांक किंवा जीएसटीआयएन दिले जाते.
३. टीआयएन
टीआयएन म्हणजे टॅक्स आयडेन्टीफिकेशन नंबर. याला वॅल्यू अॅडेड टॅक्स असे पण म्हणतात. राज्य सरकार हा विशिष्ट नंबर जारी करते. वॅट संबंधित उलाढाली करताना ११ अंकी टीआयएन असणे अनिवार्य असते. दोन किंवा अधिक राज्यातील किंवा वॅट साठी रजिस्ट्रेशन केलेल्या डीलरमधील परस्पर विक्री हा नंबर वापरुन ओळखता येते.
दुकानदार, उत्पादन करणारे, डीलर आणि इ-कॉमर्स व्यवसायांसाठी टीआयएन अनिवार्य असते.
४. टीएएन
टीएएन म्हणजे टॅक्स रिडक्शन अँड कलेक्शन अकाऊंट नंबर. ज्या व्यक्ती टीडीएस (टॅक्स अॅट सोर्स) गोळा करतात त्यांना हा १० अंकी नंबर दिला जातो. टीसीएस रिटर्न किंवा टीडीएस भरताना टीएएन आवश्यक असते.
तुमच्याकडे टीएएन असणे आवश्यक असेल, आणि तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. टीएएन मिळाल्यानंतर व्यवसाय मालकाला दर तीन महिन्याने टीडीएस रिटर्न भरावा लागतो.
५. डीएससी
डीएससी किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट एक इलेक्ट्रॉनिक अथॉरायझेशन असते आणि ऑनलाइन उलाढाली करताना ओळखीचा पुरावा म्हणून वापरण्यात येते. साधारणपणे आयकर विभाग, विदेश व्यापार महासंचालक, एमसीए आणि ईपीएफ (कर्मचारी निर्वाह निधी) या संस्था डीएससी वापरतात.
डीएससी तीन वर्गात वर्गीकृत केले जातात, वर्ग १, वर्ग २, आणि वर्ग ३. कंपनी रजिस्टर करताना आणि आयटीआर (आयकर रिटर्न) ऑनलाइन पद्धतीने भरताना वर्ग २ वापरले जाते. इ-टेंडरसाठी वर्ग ३ डीएससी वापरले जाते.
६. डीआयएन
डीआयएन किंवा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर कंपनीच्या विद्यमान किंवा भविष्यातील संचालकांना देण्यात येते.
कंपनी रजिस्टर करताना आणि एलएलपी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) रजिस्टर करताना डीआयएन आवश्यक असते.
जो व्यक्ती संचालक पद स्वीकारणार असतो त्याच्याबद्दल माहिती डीआयएन मध्ये असते. डीआयएन साठी ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, डीएससी देणे आवश्यक असते. म्हणून डीआयएन साठी अर्ज करण्यापूर्वी डीएससी आहे याची खात्री करावी.
तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी विना तारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असेल तर ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला आजच संपर्क करा!