नवीन मशीन विकत घेणे, व्यवसायाचा विस्तार करणे, नवीन आणि अनुभवी कर्मचारी नियुक्त करणे, वर्किंग कॅपिटल उभे करणे, मार्केटिंग क्रिया अशा सर्व कार्यासाठी पैशांची आवश्यकता असते. हे पैसे कमावलेल्या नफ्यातून घेता येतात किंवा व्यवसाय मालक वैयक्तिक लोन घेऊ शकतो.
व्यवसायात गुंतवणुकीची आवश्यकता असेल तेव्हा विश्वसार्ह पर्याय म्हणजे लोन देणार्या कंपनीकडून लोन घेणे.
बँक, एनबीएफसी किंवा इतर संस्थांकडून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी निधी उभा करू शकता.
तारण असलेले किंवा विना तारण लोन पैकी तुम्हाला एक निवडावे लागते.
तारण असलेले लोन बँकेकडून घेता येते. तारण असलेले लोन आणि विना तारण लोन यासाठी आवश्यक कागदपत्रे वेगवेगळी असतात, आणि वितरण दर पण वेगवेगळा असतो.
विना तारण लोनमध्ये नावाप्रमाणे काहीही तारण ठेवावे लागत नाही, कमीतकमी कागदपत्रे आवश्यक असतात आणि काही दिवसातच लोनची रक्कम वितरित होते.
विना तारण लोनबाबत अधिक तपशीलात जाणून घेऊ
विना तारण लोनचे काही लाभ:
- विना तारण बिझनेस लोनमध्ये काहीही तारण ठेवलेले नसल्यामुळे परतफेड करण्यास उशीर झाला किंवा परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही व हा लोन देणार्या कंपनीसाठी धोका ठरू शकतो.
- व्यवसायात त्वरित निधीची आवश्यकता असल्यास विना तारण लोन सर्वोत्तम पर्याय ठरतो.
- विना तारण लोन मिळवणे जास्त सोपे असते कारण बाजारात अनेक अशा कंपन्या आहेत ज्या लघु उद्योगांना ही सेवा प्रदान करतात.
- व्यवसायात कॅश फ्लोमध्ये समस्या असेल किंवा रोजच्या खर्चासाठी पुरेशी संसाधने नसतील तर परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत विना तारण लोन घेता येते.
- विना तारण लोनसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. कर्ज देणार्या कंपनीला अनेकदा भेट देण्यापेक्षा हे सोपे असते.
- ऑनलाइन लोनसाठी तंत्रज्ञान वापरले जाते आणि म्हणून मंजूरी आणि लोन वितरण अतिशय जलद गतीने होते.
- विना तारण लोन घेण्याचे लाभ असले तरीही काही गैरफायदे पण असतात.
विना तारण लोन घेण्याचे गैरफायदे:
- लोन देणार्या कंपनीला तुमच्या मालमत्तेवर दावा करता आला नाही तरी कंपनी तुमच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल करू शकते. अशा वेळी तुम्हाला मूळ लोनची रक्कम, दंड, आणि कोर्टाचा खर्च द्यावा लागेल.
- याचा दुष्प्रभाव तुमच्या क्रेडिट स्कोअर वर होईल आणि भविष्यात तुम्हाला लोन मिळणे अवघड होईल.
- लोन देणारी कंपनी तुमच्याकडून मिळणार्या व्याजातून नफा कमवते. म्हणून हफ्ते वेळेवर भरले नाही, किंवा परतफेड केली नाही, तर कंपनीला तोटा होतो. असे होऊ नये म्हणून कंपनी तुमचे क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहते आणि तुम्हाला किती रकमेचे लोन मिळेल यावर मर्यादा ठरवू शकते.
- विना तारण लोन घेण्याचे ठरवल्यावर लोन देणारी कंपनी निवडण्यापूर्वी कंपनीच्या अटी आणि शर्ती आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचायचे विसरू नका.
विना तारण लोनसाठी पात्रता निकष:
- लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे आणि लोन अवधी संपण्याच्या दिवशी ६५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
- कर्जासाठी पात्र असायला व्यवसायाचे टर्नओवर रु १५ लाख आणि रु १ कोटी यामधील असावे.
- बिझनेस लोनसाठी पात्र असायला व्यवसाय मागील किमान १ वर्ष व कमाल ३ वर्ष सुरू असावा.
- व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा. ७५० व ९०० यामधील स्कोअर असल्यास चांगले. मात्र हे लोन देणार्या कंपनी वर अवलंबून असते. क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास तुम्ही लोनसाठी अर्ज केला तर लोन देणार्या कंपनीचे चांगले मत निर्माण होणार नाही.
- तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिरता तपासून पाहण्यासाठी लोन देणार्या कंपन्या खालील कागदपत्रे मागतात.
विना तारण लोनसाठी आवश्यक कागदपत्रे:
- मालकाचे पॅन कार्ड
- मालकाचा आधार कार्ड
- मागील १२ महिन्याची बँकेची अकाऊंट स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)
- मागील २ वर्षाचे आयकर रिटर्न
- शेवटची बॅलेन्स शीट आणि पी&एल (तात्पुरते/ऑडिट केलेली) – व्यावसायाचे आर्थिक आरोग्य पाहण्यासाठी. अकाऊंटिंग पीरियडच्या शेवटी आणि ऑडिट होण्यापूर्वी तात्पुरते फायनॅन्शियल स्टेटमेंट निर्माण केले जातात.
- शेवटची बॅलेन्स शीट आणि पी&एल – पब्लिक अकाऊंटिंग कंपनीने मंजूर करून सही केल्यावर बॅलेन्स शीट आणि पी&एल यांना ऑडिट केलेले असे म्हणतात.
- गुमास्ता/दुकान आस्थापना परवाना: बृहन्मुंबई महानगर पालिका हा परवाना महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना अधिनियम या खाली सर्व व्यवसायांना देते. या द्वारे तुम्हाला दुकान किंवा ऑफिस येथे तुमचा व्यवसाय चालवण्याची परवानगी मिळते. तसेच स्थानिक प्राधिकरणासाठी इतर विविध प्रकारचे परवाने आवश्यक असू शकतात.
- जीएसटी रजिस्ट्रेशन पावती
- जीएसटी पावती/ चलन
विना तारण लोन हवे असल्यास, खालील करावे:
- लोन देणार्या कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन लोनसाठी अर्ज करा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्जाचे मूल्यांकन होण्याची वाट पहा. लोन देणार्या कंपनीची खात्री झाली की तुमचा अर्ज मंजूर होईल.
- शेवटची पायरी असते लोनच्या रकमेचे वितरण, जे लोन मंजूर झाल्यानंतर त्वरित केले जाते.
तुम्हाला विना तारण लोन हवे आहे? वाजवी व्याज दरावर, आणि त्वरित लोन मिळण्यासाठी ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा!