कस्टम ड्यूटी म्हणजे काय?
भारतात आयात होणार्या सर्व मालावर आणि निर्यात होणार्या काही विशिष्ट मालावर कस्टम ड्यूटी लागू होते.
आयात होणार्या मालावर लागू होणार्या ड्यूटीला इम्पोर्ट ड्यूटी म्हणतात, आणि निर्यात होणार्या मालावर लागू होणार्या ड्यूटीला एक्सपोर्ट ड्यूटी म्हणतात.
महसूल वाढवण्यासाठी आणि इतर देशातील स्पर्धकांना परावृत्त करण्यासाठी ही कस्टम ड्यूटी आकारली जाते.
मालाची किंमत, वजन इत्यादी वर कस्टम ड्यूटी अवलंबून असते. मालाच्या किंमतीवर आधारित ड्यूटीला वॅलोरेम ड्यूटी म्हणतात, आणि मालाच्या वजनावर आधारित ड्यूटीला स्पेसिफिक ड्यूटी म्हणतात.
भारतातील कस्टम ड्यूटी
कस्टम अॅक्ट 1962 प्रमाणे भारतात सेंट्रल बोर्ड ऑफ एक्ससाइझ अँड कस्टमस (सीबीईसी) अंतर्गत कस्टम ड्यूटी येते. यामुळे सरकारला आयात आणि निर्यात होणार्या मालावर ड्यूटी लागू करता येते, काही विशिष्ट माल आयात किंवा निर्यात होण्यापासून निषिद्ध करता येते, दंड वसूल करता येतो इत्यादी.
कस्टम ड्यूटी आकारणे, कस्टम ड्यूटी न दिल्यास करायची कार्यवाही, तस्करी थांबवणे आणि कस्टम संबंधी इतर प्रशासकीय निर्णय आणि धोरण निर्माण करण्याचे काम सीबीईसी यांचे असते.
भारतात कस्टम ड्यूटीचे प्रकार
भारतात आयात होणार्या सर्व मालावर कस्टम ड्यूटी आकारली जाते. एक्सपोर्ट ड्यूटी आणि इम्पोर्ट ड्यूटी काही विशिष्ट मालावर आकारली जाते.
इम्पोर्ट ड्यूटीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते: बेसिक ड्यूटी, अतिरिक्त कस्टम ड्यूटी, ट्रू काऊंटरवेलिंग ड्यूटी, प्रोटेक्टिव्ह ड्यूटी, एड्युकेशन सेस आणि सेफगार्ड ड्यूटी.
कस्टम ड्यूटी कशी आकारली जाते?
कस्टम वॅल्यूएशन नियम क्रमांक 3 प्रमाणे मालाच्या किंमतीवर कस्टम ड्यूटी आकारली जाते.
जर वॅल्यूएशन निकष पूर्ण झाले नाही आणि मालाच्या किंमतीबाबत काही शंका असेल तर खालील प्रमाणे उतरत्या क्रमाने इतर प्रकारे मालाची किंमत ठरवली जाते.
-
कॉम्पेरेटिव्ह वॅल्यू मेथड (समान मालाच्या उलाढालीशी तुलना)
-
डिडक्टिव्ह वॅल्यू मेथड (आयात करणार्या देशात त्या मालाची असलेली किंमत वापरली जाते)
-
कॉम्प्युटेड वॅल्यू मेथड (माल निर्मिती व त्याला लागणारे साहित्य यांची किंमत, निर्मिती होणार्या देशात झालेला नफा इत्यादी वापरले जाते)
-
फॉलबॅक मेथड (अतिरिक्त लवचिकता वापरत वरील पद्धती)
आयसीईगेट पोर्टल वर कस्टम ड्यूटी कॅल्कुलेट करता येते. कॅल्कुलेटर सुरू करून जो माल आयात करणार आहे त्याचा एचएस (सीटीएच कोड) प्रविष्ट करा. 30 अक्षरात त्याचे वर्णन प्रविष्ट करा आणि कोणत्या देशातून आयात करणार आहे ते निवडा. आता “सर्च” क्लिक करा, आणि तुम्हाला मालाची यादी दिसेल. त्यापैकी एक निवडले की त्याच्याशी संबंधित कस्टम ड्यूटीची माहिती पाहू शकता.
ऑनलाइन कस्टम ड्यूटी
ऑनलाइन कस्टम ड्यूटीला आयसीईगेट किंवा इंडियन कस्टम्स इलेक्ट्रॉनिक कॉमर्स/ इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज गेटवे म्हणतात.
हे पोर्टल वापरुन व्यापार आणि कार्गो सेवा देणार्या कंपन्यांना इ-फाइलिंग सेवांचा उपभोग करता येतो.
आयसीईगेट पोर्टलवर शिपिंग बिलचे ऑनलाइन फाइलिंग, कस्टम आणि ट्रेडिंग पार्टनर यांच्यामध्ये ईमेल/एफटीपी/ऑनलाइन अपलोड वापरुन संवाद, इत्यादी सुविधा उपलब्ध असतात.
कस्टम ड्यूटी ऑनलाइन भरण्यासाठी खालील पद्धत वापरावी:
1. आयसीईगेट इ-पेमेंट पोर्टलला भेट द्या.
2. इम्पोर्ट/एक्सपोर्ट कोड प्रविष्ट करा किंवा आयसीईगेट यांनी दिलेली लॉगिन माहिती वापरा
3. इ-पेमेंट क्लिक करा
4. तुमच्या नावाखाली किती थकबाकी आहे ते तुम्हाला पाहता येईल.
5. तुम्हाला ज्या चलनचे पेमेंट करायचे आहे ते निवडा, आणि बँक किंवा पेमेंट पद्धत निवडा
6. त्या बँकच्या पेमेंट गेटवे कडे तुम्हाला नेण्यात येईल.
7. पेमेंट करा.
8. परत आयसीईगेट पोर्टल वर आणले जाईल, आणि तुम्हाला पेमेंट पावतीची प्रत हवी असल्यास प्रिंट क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी विना तारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असेल तर ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला आजच संपर्क करा!