उद्योगाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजकाला निधीची गरज भासते.
बिझनेस लोन घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. बँक, एनबीएफसी, आर्थिक संस्था, एंजेल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपिटलिस्ट, आणि इतर सरकारी योजना यांच्याकडून लोन घेता येते.
एनबीएफसी आणि बँकेतील फरक:
बँकेकडून लोन घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल, बँक मॅनेजरच्या नावाने पत्र लिहावे लागेल, अर्ज भरावा लागेल, अनेक कागदपत्रे द्यावी लागतील आणि मग लोनची रक्कम मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल, ज्याला खूप वेळ लागू शकतो. यासाठी तुम्हाला अनेकदा बँकेला भेट द्यावी लागेल (अर्ज केल्यानंतर, कागदपत्रे सादर करण्यासाठी, लोनची रक्कम घेण्यासाठी)
एनबीएफसी मधून लोन घ्यायचे असल्यास उद्योजकाला परतपरत ऑफिसमध्ये येण्याची गरज नसते. फक्त वेबसाइटला भेट द्या, अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर तुम्हाला फक्त लोन मंजूर होण्याची आणि लोनची रक्कम मिळण्याची वाट पाहावी लागते.
बँकेतून लोन घेतल्यास खालील त्रास होऊ शकतो:
बँकांच्या बाबतीत अर्जदारांना कधीकधी तारण ठेवणे शक्य नसते. लघु उद्योगांना, विशेषकरून जे नुकतेच सुरु झाले आहे, त्यांना मालमत्ता तारण ठेवणे शक्य नसते. तारण ठेवणे शक्य असले तरीही हप्ते भरायला उशीर झाला किंवा भरता आले नाही तर बँक मालमत्तेचा कब्जा घेऊन लोनची रक्कम परत मिळवण्यासाठी ती विकून टाकू शकते.बँकेतून लोन घेण्यात दुसरी समस्या म्हणजे अर्जदाराला अनेकदा बँकेला भेट द्यावी लागते. यामुळे खूप वेळ वाया जातो आणि उद्योगाकडे लक्ष देता येत नाही. याशिवाय बँकेच्या अनेक अटी आणि शर्ती असतात ज्या पूर्ण कराव्या लागतात.
आजकाल उद्योगांना ऑनलाइन लोन देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या पण कार्यरत आहेत. त्यांच्याकडून लोन घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जायची गरज नसते. आजकाल लघु उद्योजकांमध्ये अशा प्रकारचे लोन लोकप्रिय झाले आहेत कारण प्रक्रिया पद्धतशीर असते, अल्पावधीत पूर्ण होते आणि वेळ वाचतो.
एनबीएफसी कंपन्या ऑनलाइन अर्ज स्वीकारत असल्या तरी लोन मंजूर करण्यासाठी त्यांचे विशिष्ट पात्रता निकष असतात.
लघु उद्योजकाला लोन हवे असल्यास एनबीएफसी खालील प्रश्न विचारते:
१. अर्जदाराचे वय
अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
२. उद्योगाचा टर्नओव्हर
वार्षिक टर्नओव्हर (उलाढाल) म्हणजे त्या वर्षात किती विक्री झाली. बिझनेस लोन देण्यासाठी हा एक पात्रता निकष असतो. बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
३. उद्योग किती वर्षांपासून सुरु आहे
बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योग किती वर्ष सुरू आहे हा पण एक निकष असतो. व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
४. क्रेडिट स्कोर
अजून एक महत्वाचा निकष असतो अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोर. बिझनेस लोन मंजूर होण्यापूर्वी याचे मूल्यांकन केले जाते. ७५० – ९०० यामध्ये स्कोर असल्यास तो चांगला मानला जातो. काही लोन देणार्या कंपन्यांची क्रेडिट स्कोअर मोजायची स्वतःची पद्धत असते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जदाराच्या दृष्टीने चांगले असते.
५. लोन मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
मालकाचे पॅन कार्ड, मालकाचे आधार कार्ड, मागच्या १२ महिन्याचे बँक स्टेटमेंट (पीडीएफ रूपात), मागच्या २ वर्षाचे आयकर रिटर्न, नवीनतम बॅलेन्स शीट, जीएसटी रजिस्ट्रेशन तपशील
एनबीएफसी कडून ऑनलाइन लोन घेण्याचे फायदे:
- वेळ वाचतो (परतपरत कंपनीला भेट द्यावी लागत नाही)
- कमीतकमी कागदपत्रे आवश्यक असतात
- कुठूनही अर्ज करता येतो (घर किंवा ऑफिस)
- मालमत्ता तारण ठेवणे आवश्यक नसते
- लोनची रक्कम अल्पावधीत मिळते (काही दिवसात)
मात्र, लोन घेण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटला भेट देण्यापूर्वी, कंपनीबाबत माहिती गोळा करा. कंपनीची सोशल मीडिया पेजेस पहा, त्यांच्याबाबत इतर लघु उद्योजक काय म्हणतात ते वाचा. त्यांच्याबाबत अभिप्राय वाचा आणि प्रश्न किंवा तक्रारी यांना कंपनी कशी उत्तरे देते याचा आढावा घ्या.
ऑनलाइन लोन घेण्यापूर्वी खालील घटकांचा विचार:
- उद्योगाच्या गरजांचे विश्लेषण करा. लोन नेमके कशासाठी हवे आहे याबाबत स्पष्टता असावी, जसे विस्तार करण्यासाठी, नवीन मशीन घेण्यासाठी इ.
- तुमच्या क्रेडिटची काय परिस्थिती आहे याकडे लक्ष ठेवा
- उद्योगाचे आर्थिक अभिलेख नीट ठेवले आहेत याची खात्री करा.
- सर्व कागदपत्रे तयार ठेवा
- बाजारात लोन देणाऱ्या विविध कंपन्यांची माहिती गोळा करा
लघु उद्योगांना विना तारण लोन देणाऱ्या कंपन्यांपैकी एक एनबीएफसी म्हणजे ग्रोमोर फिनान्स. लोनसाठी अर्ज करायला ग्रोमोर फिनान्सची सुरक्षित पद्धत असते. ग्रोमोरचे स्वतःचे पात्रता निकष आणि हप्ता शोधण्यासाठी कॅल्क्युलेटर आहेत. अर्जदाराला लोन मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत की नाही आणि लोन घेतल्यास मासिक हप्ता किती असेल हे शोधून काढता येते.
ग्रोमोर फिनान्सची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:
१. https://gromor.in याला भेट द्या आणि अर्ज भरा.
२. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रांची पडताळणी गोपनीय पद्धतीने केले जाते.
३. लोन मंजूर होण्याची वाट पहा. पूर्ण प्रक्रिया ऑटोमॅटिक असल्यामुळे वेळ कमी लागतो.
४. अर्ज मंजूर झाला की तीन दिवसांच्या आत लोनची रक्कम दिली जाते.
ग्रोमोर फिनान्स कंपनीकडे लोनसाठी अर्ज केल्यास सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पद्धतशीर आणि सुरक्षित असेल याबाबत खात्री ठेवा. लोनची रक्कम अल्पावधीत मिळाल्यास लघु उद्योगांना आपले ध्येय पूर्ण करता येते.
तुम्हाला बिझनेस लोनसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर ग्रोमोर फिनान्स कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन वरील प्रक्रिया पूर्ण करा. ग्रोमोरकडून तुमच्या उद्योगाला त्वरित विनातारण लोन मिळेल.