लघु उद्योजक आपले व्यावसायिक खाते प्रामुख्याने सहकारी बँकेत उघडतात ज्या नेट बँकिंग सुविधा देत नाहीत.
ग्राहकांना आपल्या घरी/ऑफिसमध्ये सोयीनुसार बँकेच्या उलाढाली करता याव्या म्हणून बँका नेट बँकिंग सुविधा प्रदान करतात. या व्यतिरिक्त नेट बँकिंगचे इतरही अनेक फायदे आहेत.
तुमच्या व्यवसायासाठी नेट बँकिंग वापरण्याचे खालील फायदे आहेत:
सुविधा
नेट बँकिंग किंवा ऑनलाइन बँकिंग वापरुन तुम्ही कधीही बॅलेन्स तपासू शकता, ऑनलाइन पेमेंट करू शकता आणि पैसे पाठवू शकता. बँक शाखेला भेट देण्याची कोणतीही आवश्यकता नसते.
सुरक्षितता
इंटरनेट बँकिंग अतिशय सुरक्षित असते कारण तुमच्या कंपनीची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेने सुरक्षेचे अनेक थर स्थापित केले असतात. पासवर्ड नियमितपणे बदलायचे लक्षात ठेवा आणि नेट बँकिंग वापरताना आवश्यक असलेल्या सुरक्षा सूचनांसाठी बँकेच्या संपर्कात रहा.
जलद प्रक्रिया
नेट बँकिंगमुळे उलाढाली त्वरित होतात. उदा: तुम्हाला उपकरणे ऑनलाइन पद्धतीने विकत घेण्यासाठी त्वरित पैसे हवे असतील तर ते शक्य होते. तुमचे सप्लायर पण ऑनलाइन बँकिंग वापरत असतील तर त्यांना पण ऑनलाइन पैसे पाठवता येतात.
तुमच्याकडे अनेक बँक खाती असतील आणि तुम्हाला लवकरात लवकर एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवायचे असतील तर ते नेट बँकिंग वापरुन शक्य असते.
कॅश फ्लो वाढतो
सर्व उत्पादने/ सेवा यांची डिलीवरी झाली की पैसे त्वरित ग्राहकाच्या खात्यातून तुमच्या कंपनीच्या खात्यात जमा होतात. अशामुळे तुमच्या व्यवसायाच्या कॅश फ्लोमध्ये वृद्धी होते.
आर्थिक अभिलेख लवकर सापडतात
भूतकाळातील व्यावसायिक उलाढालींचे अभिलेख (म्हणजेच तुमच्या कंपनीच्या आर्थिक उलाढाली) तुम्हाला पटकन शोधता येतात.
तुम्हाला लोनसाठी अर्ज करायचा असल्यास ईमेल वर बँक स्टेटमेंट यायची वाट पहावी लागत नाही. नेट बँकिंग वर ते त्वरित करता येते.
हे सर्व लाभ असल्यामुळे लघु उद्योजकांसाठी नेट बँकिंग हा आकर्षक पर्याय असतो. म्हणूनच प्रत्येक लघु उद्योजकाने ही सुविधा प्रदान करणार्या बँकेत व्यावसायिक खाते उघडायला हवे.
तुम्ही लघु उद्योजक असाल आणि तुम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा. ग्रोमोर आकर्षक व्याज दरावर तारण न ठेवता लघु उद्योगांना बिझनेस लोन देते आणि लोनची रक्कम ३ दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत दिली जाते.