तुम्ही जेव्हा बिझनेस लोनसाठी अर्ज करता तेव्हा कर्ज देणारे आधार कार्ड मागतात कारण या क्रमांकाचा वापर करून त्यांना कर्जदाराची सगळी माहिती मिळवणे सोपे होते आणि ते ओळख पत्र म्हणून पण वापरता येते.
पण तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल किंवा हरवला असेल तर लोनसाठी अर्ज करणे अवघड होईल. यूआयडीएआय यांनी ‘इ-आधार’ सुविधा प्रदान केली आहे, म्हणजेच आधार कार्डचे इलेक्ट्रॉनिक रूप जे डाऊनलोड करून प्रिंट करता येते. मूळ आधार कार्ड सारखेच इ-आधार वापरता येते.
व्यावसायिक लोनसाठी डुप्लीकेट आधार कसा मिळू शकतो?
तुम्हाला डुप्लीकेट आधार कार्ड हवे असेल तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक (यूआयडी) माहिती असला पाहिजे. आधार क्रमांकाशी जोडलेला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक तुमच्याकडे असला पाहिजे (आधारसाठी अर्ज करताना दिलेला मोबाइल क्रमांक) कारण याच क्रमांकावर तुम्हाला ओटीपी पाठवण्यात येईल.
एकदा तुम्हाला तुमचा यूआयडी माहिती झाला की तुमच्या संगणकावर अडोबी रीडर इंस्टॉल केलेले आहे याची खात्री करा कारण तुम्ही जे डुप्लीकेट आधार डाऊनलोड करणार आहात ते फक्त अडोबी रीडर वापरुन उघडता येते.
एकदा हे सगळे झाले की तुम्ही डुप्लीकेट आधारसाठी अर्ज करू शकता.
डुप्लीकेट आधार मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:
-
-
आधारच्या संकेतस्थळाला भेट द्या https://eaadhaar.uidai.gov.in/ आणि डुप्लीकेट आधार कार्ड डाऊनलोड करा.
-
‘एनरोलमेंट आयडी/आधार क्रमांक’ बॉक्सच्या वरच्या बाजूला असलेले ‘माझ्याकडे आधार क्रमांक आहे’ पर्याय निवडा.
-
तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक आणि पिन कोड प्रविष्ट करावा लागेल.
-
-
-
तुम्ही सर्व माहिती प्रविष्ट केली की एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) निर्माण होतो. ‘गेट वन टाइम पासवर्ड’ वर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डची माहिती सुरक्षित राहावी म्हणून हा ओटीपी तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठवला जातो.
-
वन टाइम पासवर्ड मिळाला की ‘एंटर ओटीपी’ बॉक्समध्ये प्रविष्ट करा आणि ‘वॅलिडेट अँड डाऊनलोड’ क्लिक करा. तुमचा डुप्लीकेट आधार किंवा इ-आधार तुमच्या संगणकावर पीडीएफ रूपात डाऊनलोड होईल.
-
पीडीएफ उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल जे तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि त्यानंतर तुमचे जन्मसाल असे असेल.
-
चांगला दर्जाचा कागद किंवा फोटो पेपरवर आधार कार्ड प्रिंट करून घ्या. प्रिंट केल्यानंतर काळजीपूर्वक कापायची चिन्हे असतील तिथे कात्रीने कापा. आता आधार कार्डचे आयुष्य वाढवण्यासाठी तुम्ही त्याला लॅमिनेट पण करू शकता.
-
तुम्हाला विना तारण लोन हवे असल्यास कृपया ग्रोमोरला भेट द्या. ग्रोमोरची अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे, आणि ३ दिवस किंवा त्यापेक्षा कमी अवधीत १० लाखापर्यंत लोन मिळू शकते!