कोणताही उद्योग सुरू करणे हेच एक मोठे आव्हान असते. त्यापेक्षा अधिक अवघड म्हणजे तो उद्योग वाढवणे व फायदेशीर बनवणे. उद्योगाबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती जवळ ठेवली तर या आव्हानांना तोंड देणे सोपे होते. विविध प्रकारच्या उद्योगांचे यश विविध पद्धतीने मोजले जात असले तरीही प्रत्येक उद्योग फायदेशीर बनवण्यासाठी ७ बाबी महत्त्वाच्या असतात. उद्योग कर्जासाठी अर्ज करताना पण या ७ गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतात.
प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाबद्दल या ७ गोष्टी माहिती असल्याच पाहिजे:
- उत्पन्न (रेवेन्यू): तुमच्या उत्पन्नाकडे तुमचे लक्ष पाहिजे. म्हणजेच तुमच्या व्यवसायाची उत्पादने अथवा सेवा यांची विक्री केल्यामुळे मिळणारी रक्कम.
- उलाढाल (टर्नओवर): वार्षिक उलाढालाची गणना केल्याने तुमचा उद्योग किती लवकर रोख पैसे गोळा करतो हे कळते.
- स्टॉकचा कालावधी: बाजारात किती वेळ तुमचे उत्पादन टिकते आहे हे माहिती असणे आवश्यक असते
- प्रारंभिक गुंतवणूक: उद्योगासाठी प्रारंभिक गुंतवणूक कशी केली हे नेहमीच लक्षात ठेवा. लघु उद्योग कर्जासाठी अर्ज करताना ही माहिती उपयोगी पडते.
- स्थूल नफा (ग्रॉस प्रॉफिट): स्थूल नफ्याची गणना करण्याचा सोपा मार्ग म्हणजे: एकूण विक्रीतून विकलेल्या मालाची किंमत वजा करणे
- निव्वळ नफा (नेट प्रॉफिट): नफ्यातून कर/टॅक्स वजा केला की निव्वळ नफा उरतो. अर्थात, विक्री मधून (मालाची किंमत आणि भरलेला कर यांची बेरीज) वजा करायची. ग्रॉस नफ्यापेक्षा हा नफा अधिक महत्त्वाचा असतो.
- उद्योग वाढवण्याचे ध्येय: दर वर्षी वाढ दराचे (ग्रोथ टार्गेट किंवा जीटी) ध्येय असलेच पाहिजे. तुम्हाला व्यवसाय किती वाढवायचा आहे? ही संख्या निव्वळ नफा अथवा विक्रीच्या रूपात असू शकते.
तुम्हाला तुमचा उद्योग वाढवायचा असेल आणि सर्वोत्तम व्याज दरात, पारदर्शक प्रक्रियेने आणि काहीही तारण न ठेवता अल्पकाळात कर्ज हवे असेल तर आज ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा.