उद्योगाच्या वाढीचे टप्पे मालकासाठी महत्वाचे असतात. एकही चूक झाल्यास उद्योगावर त्याचा प्रभाव पडू शकतो.
लघु उद्योगाची वाढ करताना पर्याप्त निधी उपलब्ध नसल्यामुळे येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्यासाठी बिझनेस लोनची मदत होते. अनेक संस्था उद्योगांना बिझनेस लोन देतात पण सगळ्यांचे वेगवेगळे पात्रता निकष असतात.
विविध बँक, एनबीएफसी आणि सरकारने जाहीर केलेल्या विवध योजनांचा वापर करून लोन घेता येते.
उद्योगाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक उद्योजकाने खालील घटकांचा विचार केला पाहिजे.
१. उद्योग कुठे स्थापित करायचा याचा विचार करा
उद्योग कुठे स्थापित करायचा याचा विचार करा. स्पर्धकांचा करा आणि संभाव्य ग्राहक जिथे असतील तिथे उद्योग सुरु करा.
२. उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन/साधने आणि कर्मचारी यांचे विश्लेषण करा
मशीन व साधनांचे मूल्यांकन करा आणि ते नीट काम करतात याची खात्री करा. दुरुस्ती करायला पाहिजे किंवा नवीन मशीन/साधने विकत घ्यायला पाहिजे का हे ठरवा.
तुमच्या कर्मचाऱ्यांचे विश्लेषण करा. विस्तार करताना विद्यमान कर्मचारी पर्याप्त असतील की नवीन कर्मचारी नियुक्त केले पाहिजे हे ठरवा.
३. संशोधन करा
तुमच्या स्पर्धाकांबाबत माहिती गोळा करा आणि ते कोणत्या सेवा प्रदान करतात हे शोधा. असे केल्याने तुम्ही तुमच्या ग्राहकांना वेगळे काय देऊ शकता याचा विचार तुम्हाला करता येईल.
नवीन टार्गेट ऑडियंसची आवश्यकता आहे का याचे मूल्यांकन करा आणि नवीन आकर्षक मार्केटिंग धोरण तयार करण्याचा प्रयत्न करा.
४. उद्योगासाठी निधीची गरज आहे का हे ठरवा
उद्योगासाठी निधीची खरंच गरज आहे का हे ठरवा. निधी उभे करण्याच्या विविध पर्यायांचा विचार करा आणि तुमच्या उद्योगासाठी सगळ्यात योग्य पर्याय निवडा. तारण ठेवून किंवा विना तारण लोन निवडा आणि वेळेवर त्याची परतफेड करता येईल का याचा विचार करा.
५. स्वॉट विश्लेषण करा
तुमचा उद्योग कुठे सशक्त आहे, कुठे कमकुवत आहे, काय संधी उपलब्ध आहेत आणि कशापासून धोका आहे याची नोंद करा. विस्ताराची योजना अंमलात आणण्यापूर्वी हे महत्वाचे असते. हे विश्लेषण केल्यानंतर तुमच्या उद्योगाची नेमकी परिस्थिती तुम्हाला कळेल.
उद्योगाचा विस्तार करताना अतिरिक्त निधी उभा करण्याची नेहेमीच गरज नसते. या टप्प्यावर सगळ्याच उद्योजकांना लोन घेणे अत्यंत महत्वाचे वाटते. पण योग्य वेळी लोन घेतल्यास तुमच्या उद्योगाला खूप मदत होऊ शकते.
उद्योजकाला कोणत्या प्रकारचे लोन घेता येतात:
१. बँक कडून लोन घेणे
बँक उद्योगांना तारण ठेवून लोन देते, म्हणजेच तारण म्हणून काही मालमत्ता ठेवावी लागते. लोनची रक्कम आणि त्यावरील व्याज पूर्णपणे फेडल्याशिवाय मालमत्ता मुक्त होत नाही.
हप्ता उशीरा दिला किंवा दिलाच नाही तर बँक मालमत्तेचा मालकी हक्क घेऊ शकते.
तुम्हाला कमी व्याज दर हवा असेल आणि परतफेड करण्यासाठी अतिरिक्त अवधी हवा असेल तर या प्रकारचे लोन घेणे चांगले.
२. लघु उद्योगांसाठी सरकारच्या योजना
लघु उद्योगांना बिझनेस लोन हवे असेल तर मुद्रा योजना किंवा स्टँड-अप इंडिया योजना यासारख्या सरकारी योजनांचा लाभ घेता येतो.
सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मुद्रा योजने अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत लोन मिळते.
स्टँड-अप इंडिया योजनेत महिला उद्योजकांना लोन दिले जाते.
या योजनेत रु १० लाखापासून रु १ कोटी पर्यंत लोन दिले जाते.
३. एनबीएफसी कडून विना तारण लोन घेणे
बिझनेस लोन घेण्यासाठी एनबीएफसी पण एक पर्याय असतो. एनबीएफसी म्हणजेच नॉन बँकिंग फायनॅन्शियल कंपन्या विविध उद्योगांना विना तारण लोन देतात आणि त्यांची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असते, बहुतांश वेळी ती ऑनलाइन करता येते.
बँकेच्या अर्ज प्रक्रियेला खूप वेळ लागतो व अनेक नियम आणि अटी असतात. याशिवाय वर नमूद केल्याप्रमाणे बँकेकडून लोन घेताना मालमत्ता तारण ठेवावी लागते. एनबीएफसी कडून लोन घेताना यापैकी काही करावे लागत नाही.
अर्जदाराला केवळ साईटला भेट देऊन अर्ज भरावा लागतो, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात, लोन देणाऱ्या कंपनीचे निकष पूर्ण करावे लागतात आणि चांगला क्रेडिट स्कोर असावा लागतो.
उद्योग वाढवण्यासाठी लोन घेतल्यास खालील क्षेत्रात मदत होऊ शकते:
१. अनुभवी कर्मचारी नियुक्त करणे
उद्योगाचा विस्तार करताना अनुभवी कर्मचारी नियुक्त केल्यास मदत होते. अशा कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामुळे काम अधिक सुरळीत आणि सोपे होते.
पण यासाठी निधीची गरज असते जी लोन घेऊन पूर्ण करता येते.
२. इंवेटरी अपडेट करणे
उद्योग चालवण्यासाठी इंवेटरी योग्य स्थितीत असणे आवश्यक असते. दैनंदिन कामात पण त्याचा उपयोग होतो, जसे मोठी ऑर्डर आल्यास ती पूर्ण करता येते.
इन्वेंटरी अपडेट करण्यासाठी माल किंवा मशीन दुरुस्त कराव्या लागू शकतात किंवा नवीन घ्याव्या लागू शकतात. अशा वेळेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे मशिनरी लोन घेणे.
३. योग्य कॅश फ्लो टिकवून ठेवणे
योग्य कॅश फ्लो टिकवून ठेवणे उद्योगासाठी अत्यंत महत्वाचे असते. उद्योगाचा विस्तार करताना वेंडर, पुरवठादार इत्यादी लोकांना पैसे द्यावे लागतात. कधीकधी ग्राहक वेळेवर पैसे देत नाही म्हणून पैशांची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून बिझनेस लोन घेतले आणि योग्य कॅश फ्लो टिकवून ठेवला तर उद्योगाला मदत होते.
४. मार्केटिंगच्या कार्यासाठी
विशिष्ट रकमेत उत्पादनांची आणि सेवांची मार्केटिंग करायची असेल तर योग्य नियोजन आणि कर्मचारी आवश्यक असतात. उद्योगाची जाहिरात करण्यासाठी आवश्यक मार्केटिंग कार्यासाठी बिझनेस लोन वापरता येते.
५. वर्किंग कॅपिटल
वर्किंग कॅपिटल म्हणजे उद्योगाचे दैनंदिन कार्य, जसे भाडे, विजेची बिले, कर्मचाऱ्यांचे पगार देणे इत्यादीसाठी लागणारी रक्कम. ही रोजची कार्य वेळेवर पूर्ण करणे उद्योगासाठी चांगले असते.
या कार्यात अडथळे येऊ नये म्हणून वर्किंग कॅपिटल लोन घेता येते. योग्य कॅश फ्लो टिकवून ठेवण्यासाठी पण वर्किंग कॅपिटल लोन घेता येते.
तुम्हाला उद्योगाचा विस्तार करायचा असेल तर तुम्हाला खालील करता येईल:
- तुमच्या उद्योगाकडून ग्राहकांच्या अजून काय अपेक्षा आहेत हे त्यांना विचारा. असे केल्याने ग्राहकांच्या काय मागण्या आहेत हे तुम्हाला कळेल.
- तुमच्याकडे कोणती उत्पादने आणि सेवा उपलब्ध आहे हे ग्राहकांना सांगण्यासाठी सोशल मिडिया आणि व्हिडियो वापरा. उत्पादनांवर डिस्काउंट द्या किंवा काही मोफत द्या.
- इतर उद्योगांबरोबर काम करा म्हणजे तुमच्या उत्पादनांची अधिक जाहिरात होईल, आणि दोन्ही उद्योगांचा फायदा होईल.
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी लोन हवे असेल तर वाजवी व्याज दरावर त्वरित विना तारण लोन मिळवण्यासाठी आजच ग्रोमोर फिनान्स कंपनीला संपर्क करा!