बिझनेस लोनसाठी अर्ज करताना आधार कार्ड असणे अतिशय महत्वाचे असते. आधार कार्ड वापरुन अर्जदाराबद्दल सगळी माहिती मिळू शकते व ते ओळखपत्र म्हणून पण वापरता येते. आधार कार्डसाठी अर्ज करायला जवळच्या आधार कार्ड नोंदणी केंद्रात जाऊन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक असते.
यूआयडीएआय यांनी नेमलेले रेजिस्ट्रार व काही अधिकृत खाजगी संस्था आधार कार्ड नोंदणी केंद्र चालवितात.
आधार कार्ड नोंदणी केंद्र कसे शोधावे?
जवळचे आधार कार्ड नोंदणी केंद्र खालील पद्धतीने शोधा:
-
यूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळाला https://uidai.gov.in/ भेट द्या. “लोकेट एनरोलमेंट अँड अपडेट सेंटर” वर क्लिक करा.
-
जवळचे केंद्र शोधण्यासाठी राज्य, पिनकोड प्रविष्ट करा अथवा सर्च पर्याय वापरुन पण शोधता येते.
-
तुमच्या राज्याचे नाव, जिल्हा व परिसर प्रविष्ट करा.
-
वेरिफिकेशन कोड खाली प्रविष्ट करा.
-
तुम्हाला जवळच्या केंद्राबाबत ही माहिती मिळेल – रेजिस्ट्रारचे नाव, एजन्सीचे नाव, सविस्तर पत्ता, जबाबदार व्यक्तीचा संपर्क, मोबाइल क्रमांक आणि केंद्राचा प्रकार.
-
केंद्र “पर्मनंट” अथवा “कॅम्प मोड” असू शकते. अर्जात फक्त पर्मनंट सेंटरची निवड करता येते.
काही राज्य व केंद्रशासित प्रदेश एन-पी-आर (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) यादीत असतात. एन-पी-आर साठी नोंदणी केली की आधारची देखील नोंदणी होते. तुम्ही जर एन-पी-आर राज्य/केंद्रशासित प्रदेशात राहत असाल तर इथे क्लिक करा.
निवडलेल्या केंद्रात जाण्यापूर्वी तिथल्या प्रतिनिधीला फोन करून केंद्र सुरु असल्याची खात्री करा. अनेकदा केंद्र तात्पुरती उघडतात आणि वेबसाईट वर त्यांची वर्तमान स्थिती दर्शवली जात नाही.
बायोमेट्रिक माहिती देण्यासाठी नोंदणी केंद्राची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे शक्य असते. परंतु सध्या उपलब्ध माहितीनुसार आधार ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधा पुढील सुचनेपर्यंत स्थगित केली गेली आहे.
यूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आधार कार्ड नोंदणी केंद्रांचे पत्ते उपलब्ध आहेत.
तुम्हाला त्वरित बिझनेस लोन हवे आहे? ग्रोमोर फायनॅन्स तुम्हाला वाजवी व्याज दरावर ३ दिवस किंवा त्यापेक्षा कमी वेळेत विनातारण बिझनेस लोन देते.